राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील मोहनगडमधून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथे बोअर खोदत असताना अचानक जमिनीतून आवाज झाला आणि पाण्याचं भलंमोठं कारंज उडू लागलं. या खड्ड्यातून वेगाने पाणी वर येत होतं. धक्कादायक बाब म्हणजे खोदकामाची उपकरणं आणि ट्रकदेखील या खड्ड्यात गेला. या घटनेनंतर मोहनगडमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. वाळवंटी भागात अचानक पाण्याचं कारंज आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम सिंह भाटी यांच्या शेतात बोअरवेलचं खोदकाम सुरू होतं. त्यानंतर अचानक जमीन फाटली आणि दबावाने पाणी, गॅस बाहेर येऊ लागला. याबाबत माहिती मिळताच जिल्हाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर 500 मीटरपर्यंतचा परिसर रिकामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जवळपास 850 फुटापर्यंत बोअरवेल खोदण्यात आली होती. पाण्याचा शोध सुरू असताना अचानक जमिनीवरून मोठ्या प्रेशरनं पाणी बाहेर येऊ लागलं. यावेळी मशिनीसह ट्रकही जमिनीत गाडला गेला आणि पाण्याचे 10 फूट उंच कारंजे उडू लागले. पाण्याच्या कारंज्यासह गॅसही बाहेर येऊ लागला.
नक्की वाचा - BJP Annamalai: पाठीवर चाबकाचे फटके मारत घेतली मोठी शपथ, राजकारणातली नवी स्टाईल
गॅस बाहेर येऊ लागल्याने गावकऱ्यांसह प्रशासनामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. हा गॅस कसला आहे, याचा शोध घेण्यासाठी ओएनजीसी, केअरन एनर्जी, ऑईल इंडियाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पाण्याच्या प्रवाहामुळे आजूबाजूचा 500 मीटरहून अधिकच्या परिसराला तलावाचं रूप आलं होतं. वाळवंटात पाण्याचे झरे वाहू लागल्याने अनेक अफवा देखील पसरू लागल्या. याठिकाणाहून आधी सरस्वती नदी वाहत होती आणि याच प्राचीन सरस्वती नदीचा पुन्हा उगम झाल्याचा दावा केला जात आहे. यानंतर एनडीटीव्हीची टीम घटनास्थळावर पोहोचली. भूजल वैज्ञानिक नारायण दास यांच्याशी संबंधित घटनेबाबत चर्चा केली. यावेळी ते म्हणाले, हा चमत्कार नसून भूगर्भातील परिस्थितीमुळे पाणी प्रेशरमुळे बाहेर येतंय.
ज्याठिकाणी बोअरवेलचं काम सुरू होतं तो मोहनगढचा परिसरातील भूगर्भ हा खडकांचा आहे. बोअर खोदताना जमिनीत असलेल्या पाण्याला वाट मिळते आणि जमिनीत दबून राहिलेलं पाणी प्रेशरमुळे बाहेर येतं. हे प्रेशर इतकं असतं की समुद्रांच्या लाटांसारखं पाणी उसळतं. कधीकधी पाण्याचं कारंज 8 ते 10 फूट उंचही उडतात. शनिवारपासून वाहणारं पाण्याचं कारंजं आता थांबलय. वैज्ञानिकांसह गॅस कंपन्यांकडून पाण्याबरोबर येणारी माती इतर गोष्टींचा शोध सुरू आहे. त्यानंतर याबाबतची अधिकची माहिती समोर येईल.
सोशल मीडियावर मात्र लुप्त झालेली सरस्वती नदी प्रकटल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world