जम्मू काश्मीरमध्ये बस दरीत कोसळली, 21 भाविकांचा मृत्यू तर 40 जण जखमी

तीर्थयात्रेला निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. अखनूर येथे बस दरीत कोसळून झालेल्या अपघतात 21 भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर 40 भाविक जखमी झाले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

जम्मू काश्मीरमध्ये बस दरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. तीर्थयात्रेला निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. अखनूर येथे बस दरीत कोसळून झालेल्या अपघतात 21 भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर 40 भाविक जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच प्रशासन घटनास्थळी दाखल झालं असून बचावकार्य सुरु आहे. जखमींना जवळील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये एकूण 50 प्रवाशी प्रवास करत होते. बसमधील बहुतेक प्रवासी हे उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा येथील होते. सर्वजण रायसी जिल्ह्यातील प्रसिद्ध शिव खोरी मंदिराकडे जात होते.

(नक्की वाचा - Youtube वर अनेक व्हिडीओ पाहिले अन् 40 सेकंदात मृत्यूचा मार्ग निवडला; भोपाळच्या तरुणाने उचललं टोकाचं पाऊल)

अधिकाऱ्यांनी सांगितले की, बस जम्मू-पूंछ महामार्गावरून जात असताना अचानक अनियंत्रित होऊन दरीत कोसळली. बस दरीत कोसळल्यानंतर आजूबाजूला राहणारे लोक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरु केले.

Advertisement

(नक्की वाचा: गोळीबारच्या घटनेमुळे भुसावळ हादरलं, माजी नगरसेवकासह दोघांची हत्या)

त्यानंतर प्रशासन काही वेळाने घटनास्थळी दाखल झालं. लष्कर आणि प्रशासनाने संयुक्तपणे बचावकार्य सुरु करत जखमींना लवकरात लवकर वैद्यकीय मदत पुरवली. या अपघातात काही प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
 

Topics mentioned in this article