जाहिरात

Tral Encounter Video: हातामध्ये शस्त्र, पण अवस्था भयंकर! काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या चकमकीचा पाहा ड्रोन व्हिडिओ

Tral Encounter Video: जम्मू-कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले. या चकमकीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Tral Encounter Video: हातामध्ये शस्त्र, पण अवस्था भयंकर! काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या चकमकीचा पाहा ड्रोन व्हिडिओ
मुंबई:


Tral Encounter Video: जम्मू-कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले. दक्षिण कश्मीरमधील अवंतीपुराच्या नादेर त्राल भागात ही चकमक झाली. या भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर त्यांनी या परिसराची घेराबंदी केली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

या शोधमेहिमेच्या दरम्यान तिथं लपलेल्या दहशतवाद्यांनी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी केलेल्या प्रत्युत्तरात तीन दहशतवादी मारले गेले. सुरक्षा दल या भागात शोध मोहीम चालवत आहेत. या चकमकीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दहशतवादी कुठे लपले होते?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक दहशतवादी काँक्रीटच्या खांबामागे लपलेला दिसत आहे. त्याच्या हातात असॉल्ट रायफल आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये, जो दूरून चित्रित करण्यात आला आहे, त्यात दहशतवादी एका तुटलेल्या शेडमध्ये लपलेले दिसत आहेत. या तिन्ही दहशतवाद्यांनी एका घरात आश्रय घेतला होता.

अवंतीपुरामध्ये गेल्या 48 तासांमध्ये झालेली ही तिसरी चकमक आहे. यापूर्वी 13 मे रोजी शोपियानमध्ये झालेल्या चकमकीत आणखी तीन दहशतवादी मारले गेले होते. ही चकमक कुलगाममध्ये झाली होती. नंतर ती शोपियानमध्ये सुरू झाली होती. यात चौथ्या दहशतवाद्याच्या असण्याचीही माहिती होती, परंतु त्याची अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही.

( नक्की वाचा : 'बेजबाबदार आणि असभ्य देशाच्या हातात अण्वस्त्र सुरक्षित आहेत?' राजनाथ सिंह यांची IAEA कडं मोठी मागणी )
 

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला

पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 जणांची हत्या केली होती.  या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे.   भ्याड हल्ला  पहलगाम हल्ल्याची जबाबदारी 'दी रेझिस्टन्स फ्रंट' (टीआरएफ) नावाच्या एका संघटनेने घेतली होती. हे संघटन पाकिस्तानमधून चालणाऱ्या लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे. सुरक्षा दलांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सामील असलेल्या चार-पाच दहशतवाद्यांची ओळख पटवली आहे. त्यांच्या शोधासाठी मोहीम सुरु आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com