जाहिरात

Jharkhand News : बाथरूममध्ये पडून झारखंडच्या शिक्षणमंत्र्यांचं निधन; राजकीय क्षेत्रावर शोककळा

रामदास सोरेन हे 2 ऑगस्ट रोजी आपल्या घरात बाथरूममध्ये पडले होते. या अपघातानंतर त्यांची प्रकृती गंभीर बनली होती.

Jharkhand News : बाथरूममध्ये पडून झारखंडच्या शिक्षणमंत्र्यांचं निधन; राजकीय क्षेत्रावर शोककळा
  • झारखंड के शिक्षा मंत्री रामदास सोरेन का दिल्ली में इलाज के दौरान निधन हो गया है, वे 62 वर्ष के थे.
  • दो अगस्त को बाथरूम में गिरने के बाद उनकी स्थिति नाजुक हो गई थी और उन्हें दिल्ली एयरलिफ्ट किया गया था.
  • रामदास सोरेन पूर्वी सिंहभूम के घाटशिला से दो बार विधायक चुने गए और झामुमो के बड़े नेता थे.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Jharkhand News :  झारखंडचे शिक्षण मंत्री रामदास सोरेन यांचे दिल्लीत उपचारादरम्यान निधन झाले. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते असलेले सोरेन हे घाटशिला विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या निधनाने झारखंडच्या राजकारणात शोककळा पसरली आहे.

अपघातानंतर गंभीर होती प्रकृती

रामदास सोरेन हे 2 ऑगस्ट रोजी आपल्या घरात बाथरूममध्ये पडले होते. या अपघातानंतर त्यांची प्रकृती गंभीर बनली होती आणि त्यांना तातडीने दिल्लीतील एका रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांचे ब्रेन डेड झाले होते.

(नक्की वाचा-  PM Modi Speech : पंतप्रधान मोदींच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाने महाराष्ट्रातील सरपंच भारावले)

रामदास सोरेन यांचा राजकीय प्रवास

रामदास सोरेन यांचा राजकीय प्रवास झारखंडच्या निर्मिती चळवळीपासून सुरू झाला. ते शिबू सोरेन यांच्यासोबत सक्रिय होते. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी चंपई सोरेन यांनी पक्ष सोडल्यानंतर त्यांना मंत्री बनवण्यात आले होते. 2009 मध्ये ते पहिल्यांदा घाटशिला मतदारसंघातून आमदार बनले होते आणि त्यानंतर 2019 मध्ये ते दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले.

(नक्की वाचा- Maharashtra Rains: मुंबई, रायगडला अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट; गरज असेल तरच घराबाहेर पडा, BMC चं आवाहन)

कोल्हान प्रदेशात रामदास सोरेन यांचे मोठे राजकीय वजन होते. चंपई सोरेन यांच्यानंतर ते झारखंड मुक्ती मोर्चाचे दुसरे सर्वात मोठे नेते मानले जात होते. तसेच, ते सध्या सिंहभूम जिल्ह्याचे अध्यक्ष देखील होते. आदिवासी समाजात त्यांची एक वेगळी ओळख होती. झारखंड सरकारने त्यांना 2024 मध्ये पहिल्यांदा मंत्रीपद दिले होते. त्यांचे निधन हे झारखंड मुक्ती मोर्चासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com