जाहिरात

Extra Marital Affair: सर्वाधिक विवाहबाह्य संबंध असणाऱ्या शहरांची यादी जाहीर, मुंबई कितव्या स्थानी?

Extramarital Affairs List: देशाची राजधानी दिल्ली अ‍ॅशली मॅडिसनच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Extra Marital Affair: सर्वाधिक विवाहबाह्य संबंध असणाऱ्या शहरांची यादी जाहीर, मुंबई कितव्या स्थानी?
Ashley Madison Report: मुंबई या यादीत कितव्या स्थानी असेल याबाबत अनेक तर्क बांधले जात होते (फोटो- Gemini AI)
मुंबई:

अ‍ॅशली मॅडिसन नावाचे एक अ‍ॅप आहे. या अ‍ॅपवर विवाहीतांना विवाहबाह्य संबंध निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. या अ‍ॅपने भारतातील सर्वाधिक विवाहबाह्य संबंध असलेली शहरे कोणती याची एक यादी जाहीर केली आहे. इडली आणि साडीसाठी प्रसिद्ध असलेल्या तमिळनाडूतील कांचीपुरमने या यादीत पहिला क्रमांक मिळवला आहे, गेल्या वर्षीहेच कांचीपुरम या यादीमध्ये 17 व्या स्थानावर होते. 17 व्या स्थानावरून कांचीपुरमने पहिल्या स्थानी झेप घेतल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. कांचीपुरमची 17 व्या स्थानावरून पहिल्या स्थानावरील झेप नेमकी कोणत्या कारणांमुळे झाली आहे याचे कारण मात्र सांगण्यात आलेले नाही.

(नक्की वाचा: भगवान शंकराच्या मंदिरावरून दोन देशांत वाद, सुरू झाले भीषण युद्ध )

अ‍ॅशली मॅडिसनच्या यादीत दिल्ली कितव्या स्थानी?

देशाची राजधानी दिल्ली अ‍ॅशली मॅडिसनच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीतील 6 जिल्हे आणि एनसीआरचे तीन जिल्हे असे सगळे 9 जिल्हे विवाहबाह्य संबंधांच्या बाबतीत आघाडीवर असल्याचे सांगण्यात आले आहे.पहिल्या वीस शहरांमध्ये या दोन शहरांव्यतिरिक्त  जयपूर, चंदीगड, रायगड आणि कामरूप या शहरांचाही समावेश आहे. मोठ्या शहरांच्या तुलनेत छोट्या शहरांमध्ये किंवा निमशहरी भागांमध्ये विवाहबाह्य संबंधांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. 

मुंबईचा नंबर कितवा?

अनेकांना उत्सुकता होती की या यादीमध्ये मुंबई कितव्या स्थानावर आहे. मुंबईने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला असून मुंबई या यादीत पहिल्या 20 मध्ये देखील नाहीये. भारताबाबत बोलायचे झाल्यास भारताचा क्रमांक जागतिक क्रमवारीमध्ये सहाव्या नंबरवर आहे. वर्षाच्या शेवटापर्यंत भारत या यादीत आणखी वर सरकलेला दिसेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

( नक्की वाचा: एका व्हिडिओने अख्खं आयुष्यं उद्ध्वस्त; ॲस्ट्रॉनॉमर चे CEO अँडी बायरन यांचा पदावरुन राजीनामा  )

तुमचा साथीदार अथवा पती/पत्नी तुमच्यासोबत प्रतारणा करत असल्याचे कळणे थोडे कठीण आहे मात्र त्यांच्या सवयीतील बदल पाहिल्यास याबद्दलचा अंदाज लागू शकतो. हे बदल साधारणपणे कोणते असतात ते पाहूयात.

1. सवयींमध्ये बदल
जर तुमच्या साथीदाराचे वागणे अचानक बदलले तर त्यातून तुम्हाला विवाहबाह्य संबंधांची कुणकुण लागू शकते. असा बदल जाणवल्यास तुम्ही तुमच्या साथीदाराशी शांतपणे बसून बोलणं गरजेचं आहे. त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्यासारखं त्याच्याशी न वागता शांतपणे बोलून त्याच्या मनातल्या गोष्टी तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करू शकता.  

2. सततची चिड-चिड
अनेकदा असे दिसून येते की, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या पत्नीला किंवा पतीला धोका देत असते, तेव्हा ते तापट बनलेले असतात. विवाहबाह्य संबंधांत गुंतलेल्या व्यक्ती आपल्या साथीदाराने केलेल्या लहानसहान चुकांवरही भयंकर रागावतात. असं जर तुमच्या साथीदारासोबत होत असेल तर तुम्ही सावध होण्याची गरज आहे.  

3.  फोन लपवणे
तुम्ही अचानक समोर आल्यानंतर फोनचा वापर करणारा तुमचा पार्टनर जर दचकत असेल किंवा तो तुम्ही शेजारी बसलेले असतानाही फोन लपवत असेल अथवा फोनचा ब्राइटनेस कमी करून चॅटींग करत असेल तर हा देखील एक 'रेड अलर्ट' ठरू शकतो.

4. फोन कॉल न उचलणे
अनेकदा असे दिसून आले आहे की विवाहबाह्य संबंधांमध्ये गुंतलेली व्यक्ती तिच्या साथीदाराचा फोन घेणं टाळायला लागलते. तुम्ही फोन करत असाल आणि तुमचा पार्टनर तो घेत नसेल किंवा त्याचा ोन सतत बिझी येत असेल तर ही देखील तुमच्यासाठी सतर्कतेची घंटा ठरू शकते.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com