Kashmir terror attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात पाठविण्याची तयारी सुरू आहे. केंद्र सरकारच्या आदेशाचं पालन करीत अनेक राज्य सरकारांनी त्यांच्या राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना पुन्हा त्यांच्या घरी पाठविण्याची तयारी सुरू आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
केंद्र सरकारच्या निर्णयानुसार, भारताकडून पाकिस्तानी नागरिकांना दिलेल्या सर्व वैध्य व्हिजा 27 एप्रिलपासून रद्द मानले जातील. याशिवाय, पाकिस्तानी नागरिकांना दिले जाणारे वैद्यकीय व्हिसा फक्त 29 एप्रिलपर्यंत वैध असतील. अशा परिस्थितीत, भारतात उपस्थित असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना ताबडतोब पाकिस्तानात परत जाण्यास सांगण्यात आले आहे.
450 हून अधिक नागरिक पाकिस्तानातून परतले..
- वाघा सीमेवर गेल्या तीन दिवसात 450 हून अधिक भारतीय पाकिस्तानातून परतले.
- पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उद्भवलेल्या स्थितीमुळे व्हिजा रद्द झाल्याने लोक आपल्या देशात परतले.
- शनिवारी परतणाऱ्यांमध्ये 23 भारतीयांचा समावेश आहे. ते पीएसएल (पाकिस्तान सुपर लीग) 2025 च्या प्रसारण कंपनीचा भाग होते.
- शनिवारी सीमा पार करणाऱ्या भारतीयांची संख्या लवकरच समोर येईल.
- अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी साधारण 300 भारतीय आणि गुरुवारी 100 भारतीय या मार्गातून स्वदेशात परतले.
- त्यांनी सांगितलं की, यासोबतच 200 पाकिस्तानी नागरिक भारतातून स्वदेशी परतले आहेत.
नक्की वाचा - CM Devendra Fadnavis : 'राज्यात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दणका
उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्या राज्यातील उपस्थिती सर्व पाकिस्तानी नागरिकांना पुन्हा पाकिस्तानात पाठवलं आहे. डीजीपी प्रशांत कुमार यांनी स्पष्ट केलं की, भारत सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारने सूचनांनुसार वेगवेगळ्या श्रेणीतील पाकिस्तानी व्हिसावर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना हद्दपार करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ते पुढे म्हणाले, एक पाकिस्तानी नागरिक अजूनही शिल्लक आहे. तो 30 एप्रिल रोजी पाकिस्तानला परत जाईल.
बिहारच्या विविध जिल्ह्यांमध्ये पर्यटन व्हिजावर आलेले 19 पाकिस्तानी नागरिक 25 एप्रिलपूर्वीच राज्य सोडून निघून गेले आहेत. महाराष्ट्राचे मंत्री योगेश कदम यांनी शनिवारी सांगितलं की, राज्यात पाच हजार पाकिस्तानी नागरिक राहत आहेत. ज्यात एक हजार अल्प मुदतीच्या व्हिजावर आहे. त्यांना केंद्राच्या सूचनेनुसार देश सोडण्यास सांगण्यात आलं आहे. कदम पुढे म्हणाले, माझ्या अंदाजे चार हजार दीर्घकालीन व्हिसाधारक असू शकतात. ज्यात एक हजार व्हिसा धारक आहेत. जे चित्रपट, पत्रकारिताक, वैयक्तिक कामासाठी राज्यात आले आहेत. या व्हिसा धारकांना 27 एप्रिलपर्यंत देश सोडण्यास सांगण्यात आलं आहे. तर वैद्यकीय कारणांसाठी आलेल्या नागरिकांना दोन दिवसांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे.