Kedarnath Helicopter accident : केदारनाथजवळ भाविकांचे हेलिकॉप्टर कोसळलं, 5 जणांचा मृत्यू

गौरीकुंड आणि त्रिजुगीनारायण दरम्यान हा अपघात झाला. हेलिकॉप्टर कोसळण्यामागे खराब हवामान असल्याचं सांगितलं जात आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

उत्तराखंडच्या केदारनाथ धाममध्ये एक मोठी दुर्घटना झाली आहे. रविवारी केदारनाथ मार्गावर हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह एकूण 6 भाविक प्रवास करीत होते. या अपघातात 5 भाविकांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या अहमदाबादमधील विमान अपघातात 275 जणांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असताना केदारनाथमधून आणखी एका दुर्घटनेतं वृत्त समोर आलं आहे. 

हे हेलिकॉप्टर आर्यन कंपनीचा असल्याचं सांगितलं जात आहे. गौरीकुंड आणि त्रिजुगीनारायण जंगलादरम्यान हा अपघात झाला. हेलिकॉप्टर कोसळण्यामागे खराब हवामान असल्याचं सांगितलं जात आहे. या अपघाताबद्दल उत्तराखंड एडीजी लॉ अँड ऑर्डर डॉ. वी मुरुगेशन यांनी यासंदर्भात माहिती दिली. देहरादूनहून केदारनाथच्या दिशेने जाणारं हेलिकॉप्टर गौरीगुंडाजवळ बेपत्ता झालं आहे अशी माहिती त्यांनी दिली होती.  

Advertisement

नक्की वाचा - Air India Plane Crash: टार्गेट अहमदाबाद, उद्देश दहशतवाद? 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही?

यंदाच्या चारधाम यात्रेदरम्याम विविध धामांवर अनेक वेळा हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. याशिवाय अनेकदा आपत्कालिन परिस्थितीत हेलिकॉप्टर  लँड करण्यात आलं आहे. नुकतंच रस्त्यावर हेलिकॉप्टरचं क्रॅश लँडिंग करण्यात आलं होतं. चारधाम यात्रेच्या सुरुवातीलाही एकदा हेलिकॉप्टर क्रॅश झालं होतं. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला होता.