Helicopter Crash Viral Video : रशियाच्या दागेस्तान राज्यात 7 नोव्हेंबर रोजी एक रशियन KA-226 हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. हा अपघात अची-सू गावाजवळ कॅस्पियन समुद्राच्या परिसरात झाला. पायलटचा हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटलं आणि ते जमिनीवर कोसळले. मृतांमध्ये एकाच इलेक्ट्रो मेकॅनिकल प्लांट (KEMZ) चे चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या दु:खद घटनेची पुष्टी कंपनीने ८ नोव्हेंबर रोजी केली. मृतांमध्ये प्लांटचे डेप्युटी जनरल डायरेक्टर आणि हेलिकॉप्टरचा फ्लाइट मेकॅनिक यांचा समावेश आहे. या अपघातात आणखी दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेलिकॉप्टर अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. प्राथमिक तपासानुसार, रशियन सरकारी मीडियाने सांगितले होते की, हे हेलिकॉप्टर पर्यटकांना घेऊन जात होते, पण नंतर स्पष्ट झाले की त्यामध्ये KEMZ कंपनीचे कर्मचारी प्रवास करत होते. KEMZ ही एक संरक्षण उपकरणे तयार करणारी कंपनी आहे, ज्यावर अमेरिका सरकारने निर्बंध लावले आहेत.
नक्की वाचा >> KBC Video: हुबेहुब चेहरा, तोच अंदाज अन्..'डुप्लिकेट'ला पाहून अमिताभ बच्चनही झाले थक्क, 'असा' प्रश्न विचारला..
इथे पाहा हेलिकॉप्टर अपघाताचा थरारक व्हिडीओ
Full video of the Ka-226 crash in Dagestan.
— Vijesti (@Vijesti11111) November 8, 2025
5 people have died, and 2 more are in intensive care.
A Ka-226 helicopter crashed in Dagestan, Russia. Four people were killed. They were employees of the Kizlyar Electromechanical Plant. pic.twitter.com/CWt1qbMVny
कारण ही कंपनी युक्रेनविरुद्ध रशियाच्या युद्धात सहभागी आहे. KA-226 हे एक ट्विन-इंजिन हेलिकॉप्टर आहे, जे कमाल सात प्रवाशांना वाहून नेण्यास सक्षम आहे. हे हेलिकॉप्टर प्रामुख्याने उंच पर्वतीय भागांमध्ये आणि कठीण परिस्थितींमध्ये कार्य करण्यासाठी ओळखले जाते.
नक्की वाचा >> Salt Consumption : मीठाचं सेवन न केल्यास काय होतं? 1 दिवसात किती प्रमाणात मीठ खावं? जाणून घ्या योग्य पद्धत
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world