जाहिरात

पक्षाच्या कार्यालयासमोर महिला आमदारासोबत नेत्याचं धक्कादायक कृत्य; Video व्हायरल होताच खळबळ

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी फिलिप यांच्या वागणुकीवर आक्षेप नोंदवला आहे.

पक्षाच्या कार्यालयासमोर महिला आमदारासोबत नेत्याचं धक्कादायक कृत्य; Video व्हायरल होताच खळबळ

Congress MLA Bindu Krishna : काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफने केरळ विधानसभा निवडणूक जिंकली आहे. निकालानंतर केरळमच्या तिरुवनंतपुरममधील पक्षाच्या मुख्यालयात सेलिब्रेशन करण्यात आलं. यादरम्यान एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामुळे नव्या चर्चेला उधाण आलं आहे. केरळ विधानसभा निवडणुकीत बिंदू कृष्णा यांनी कोल्लममध्ये विजय मिळवला आहे. विधानसभेत विजय मिळाल्यानंतर त्या पक्षाच्या कार्यालयात पोहोचल्या. येथे त्यांच्याच पक्षाच्या नेत्याच्या वागणुकीमुळे त्या अस्वस्थ झाल्या आहेत. 

सोशल मीडियावरील एका व्हिडिओनुसार, ७१ वर्षीय काँग्रेस नेता चेरियन फिलिप यांनी कोल्लमच्या नवनिर्वाचित आमदार बिंदू कृष्णा यांना जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला. महिला आमदारला हे आवडलं नसल्याचं तिच्या हावभावावरुन दिसत आहे. मात्र तरिही चेरियन फिलिप त्यांना मिठी मारण्याचा प्रयत्न करीत असल्याचं दिसत आहे. फिलिपच्या या कृत्यावर लोक विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. 

नक्की वाचा - BJP State List : 5 पैकी 3 राज्यात 'कमळ'राज; आता देशातील किती राज्यांमध्ये भाजपची सत्ता? ही आहे संपूर्ण यादी

काय आहे संपूर्ण प्रकरण?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेता चेरियन फिलिपने तिरुवनंतपुरमस्थित केरळ प्रदेश काँग्रेसच्या प्रांगणात महिला सहकारी बिंदू कृष्णा यांना जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला. विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर पक्षाच्या मुख्यालयावर कृष्णा यांचं स्वागत केलं जात होतं. यासाठी स्थानिक मिडिया आणि इतर मंडळीही जमा झाल्या होत्या. यादरम्यान कृष्णा लोकांना हात जोडून अभिवादन करीत होती. यादरम्यान चेरियन फिलिप यांनीही त्यांना पाहिलं आणि कृष्णा यांनी त्यांना हात मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र फिलिप यांनी याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांना मिठी मारण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान कृष्णा अस्वस्थ झाल्या. त्या फिलिप यांना दूर सारण्याचा प्रयत्न करीत होत्या. यानंतर कृष्णा यांनी फिलिप यांना धक्का देत दूर झाल्या. यानंतर अन्य लोकांना अभिवादन करीत त्या पुढे निघून गेल्या. 

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी फिलिप यांच्या वागणुकीवर आक्षेप नोंदवला आहे. महिलेची इच्छा नसताना मिठी मारण्याचा प्रयत्न करणं चुकीचं असल्याची प्रतिक्रिया आली आहे. 


  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com