जाहिरात

Love Story : प्रियकराला भेटायला शेतात गेली अन् थेट सासरीच पोहोचली; 5 वर्षांच्या मुलासह आईची पाठवणी!

Trending News: 'त्या' दोघांना रंगेहात पकडलं गेल्यावर पुढे जे काही घडलं, त्याची सध्या गावात जोरदार चर्चा सुरू आहे.

Love Story :  प्रियकराला भेटायला शेतात गेली अन् थेट सासरीच पोहोचली; 5 वर्षांच्या मुलासह आईची पाठवणी!
Love Story : गावात पकडून आणल्यानंतर दोघांनीही एकमेकांवर प्रेम असल्याची कबुली दिली.
मुंबई:

Trending News: एका विवाहीत महिलेचं घराबाहेर प्रेमप्रकरण सुरू होतं आणि एके दिवशी ती तिच्या प्रियकराला भेटायला मक्याच्या शेतात जाते. मात्र, तिथे आधीच दबा धरून बसलेल्या गावकऱ्यांच्या नजरेतून ते सुटू शकले नाहीत. रंगेहात पकडलं गेल्यावर पुढे जे काही घडलं, त्याची सध्या गावात जोरदार चर्चा सुरू आहे.

काय आहे प्रकरण?

ही संपूर्ण घटना बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील विभूतिपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या राधोपूर गावात घडली आहे. एक विवाहीत महिला आपल्या प्रेमीला भेटण्यासाठी मक्याच्या शेतात पोहोचली होती. मात्र, गावकऱ्यांना या प्रकाराचा आधीच संशय होता आणि त्यांनी पाळत ठेवली होती. दोघांनाही एकत्र पाहताच गावकऱ्यांनी त्यांना पकडून गावात आणलं. त्यानंतर तिथेच गावाची पंचायत भरली आणि सर्वांच्या संमतीने एक मोठा निर्णय घेण्यात आला.

नवरा 5 वर्षांपासून...

या महिलेचं नाव राधनी असून तिचं वय 30 वर्ष आहे. राधनीचं लग्न 7 वर्षांपूर्वी मनीष कुमारसोबत झालं होतं आणि त्यांना 5 वर्षांचा मुलगाही आहे. लग्न झाल्यावर काही काळानंतर मनीष कामासाठी हरियाणाला गेला होता. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो गेल्या 5 वर्षांपासून एकदाही घरी परतला नाही. तो अधूनमधून आपल्या आई-वडिलांशी फोनवर बोलायचा, पण बायको आणि मुलाशी त्याचा संपर्क पूर्णपणे तुटला होता. नवरा घरी येत नसल्यामुळे राधनी त्यांच्या माहेरी राहत होत्या.

( नक्की वाचा : भारताचा सातवा दरवाजा ते मेक्सिकोचे पाताल लोक; या 7 जागा उघडण्याचं धाडस कोणतंही सरकार का करत नाही? )
 

सोशल मीडियावरून जुळलं प्रेम

माहेरी असतानाच राधनीची ओळख मयंक नावाच्या 25 वर्षीय तरुणाशी झाली. ओळखीचं रूपांतर हळूहळू मैत्रीत आणि नंतर प्रेमात झालं. सोशल मीडिया आणि फोनवरून त्यांच्या गप्पा वाढल्या आणि ते चोरून भेटू लागले. बुधवारी संध्याकाळीही ते अशाच प्रकारे मक्याच्या शेतात भेटले आणि गावकऱ्यांच्या हाती लागले.

पंचायत भरली आणि लावून दिलं लग्न

गावात पकडून आणल्यानंतर दोघांनीही एकमेकांवर प्रेम असल्याची कबुली दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी मयंक आणि राधनीचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. पारंपरिक पद्धतीने गळ्यात वरमाला घालून आणि मयंकने राधनीच्या भांगेत सिंदूर भरून हे लग्न पार पडलं. या अनोख्या लग्नाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत.

( नक्की वाचा : Immortality by 2030 : मृत्यूवर विजय मिळवणं आता शक्य? 2030 पर्यंत माणूस होणार अमर! वाचा काय आहे नवं तंत्रज्ञान )

मुलासह झाली आईची पाठवणी

या लग्नानंतर एक अतिशय भावनिक दृश्य पाहायला मिळालं. राधनीला तिचा 5 वर्षांचा मुलगा आहे. गावकऱ्यांनी लग्नानंतर राधनीला तिच्या मुलासह मयंकच्या घरी सन्मानाने पाठवून दिलं. नवरा जिवंत असतानाही त्याने संपर्क तोडल्यामुळे आणि पत्नीची जबाबदारी न घेतल्यामुळे गावकऱ्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. आता ही महिला तिच्या लहान मुलाला घेऊन नव्या नवऱ्याच्या घरी राहायला गेली आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com