4 months ago

Maharashtra Assembly Elections 2024 Voting LIVE Updates: महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 288 जागांवर मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. 4 हजारांहून अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. दुसरीकडे झारखंडमध्येही विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यासाठी 38 जागांवर मतदान पार पडत आहेत.

महाराष्ट्रामध्ये (Maharashtra Vidhansabha Elections) सध्या भारतीय जनता पक्ष (BJP), शिवसेना (Shiv Sena Eknath Shinde Group) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP Ajit Pawar Group) यांची महायुती  तर शिवसेना (Shiv Sena UBT), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP Sharad Pawar Group) आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी यांच्यात लढत आहे. दुसरीकडे झारखंड निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 38 जागांवर झारखंड मुक्ती मोर्चा (JMM)च्या नेतृत्वाखाली INDIA Alliance आणि NDA यांच्यामध्ये लढत आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू राहणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. निवडणुकीसंदर्भातील सर्व अपडेट एका क्लिकवर जाणून घ्या...

Advertisement

Nov 20, 2024 21:03 (IST)

नांदेडच्या नायगावमध्ये अजूनही मतदान

नांदेड जिल्हयातील नायगाव मतदार संघातील मंगनाळी येथे अजूनही मतदान सुरु आहे . दोन वेळा  कंट्रोल युनिट बंद पडल्याने मतदान प्रक्रिया बंद पडली होती. मतदारांची रांग लागली होती. रात्री साडे आठ वाजेपर्यंत या मतदान केंद्रावर शंभर ते दीडशे मतदार रांगेत होते. रात्री साडे नऊ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पुर्ण होईल असंही सांगण्यात येत आहे.  

Nov 20, 2024 20:53 (IST)

मुख्यमंत्री शिंदेंच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदिवली मतदारसंघात अनधिकृतपणे भेट दिली. शिवाय शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांच्यासाठी रोड शो करून मतदान करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री शिंदे यांची ही कृती आदर्श आचारसंहितेचा भंग करणारी असून मुख्यमंत्री शिंदे व दिलीप लांडेंविरोधात  लेखी तक्रार मविआचे उमेदवार नसीम खान यांचे मुख्य पोलींग एजंट गणेश चव्हाण यांनी केली आहे.

Nov 20, 2024 20:05 (IST)

...तर महायुतीला फायदा होईल- देवेंद्र फडणवीस

मतदानाची टक्केवारी वाढते. त्याचा फायदा भाजपला होतो. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली असेल तर याचा फायदाही महायुतीलाच होईल. असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.  

Nov 20, 2024 19:56 (IST)

धुळे शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात अद्याप मतदान सुरू

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी धुळे शहरात सहा मतदान केंद्रावर, साक्री विधानसभा मतदार संघात दोन तर धुळे ग्रामीण मतदार संघात दोन मतदान केंद्रावर अद्याप मतदान सुरू आहेत. मतदारांची गर्दी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे इथं अजूनही मतदान सुरू आहे. 

Advertisement
Nov 20, 2024 19:41 (IST)

धुळ्यात ईव्हीएम मशीनची गाडी नागरिकांनी फोडली

धुळे शहरातील अभय कॉलेज परिसरात निवडणूक आयोगाच्या एका वाहनात काही ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीन आढळून आल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत माजी आमदार अनिल गोटे यांनी बोगस मतदान टाकण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे गाडीत सापडलेले हे व्हीव्हीपॅट मशीन आणि ईव्हीएम मशीन राखीव असून गैरसमजुतीतून हा प्रकार झाल्याचा दावा संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी केला आहे. यानंतर संबंधित वाहन पोलीस ठाण्यात आणत ते वाहन पुढे धान्य गोडाऊन या ठिकाणी रवाना करण्यात आले.

Nov 20, 2024 19:31 (IST)

शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारा विरोधात गुन्हा दाखल

शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार डॉ. विश्वास वळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वास वळवी बोईसर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रचार बंदी असताना डॉ. वळवी यांचे अवध नगर परिसरात बॅनर लावण्यात आले होते. 

Advertisement
Nov 20, 2024 19:27 (IST)

मतदानानंतर देवेंद्र फडणवीसांची संघ मुख्यालयाला भेट

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली आहे. मतदान पुर्ण झाल्यानंतर त्यांनी भेट दिली. अर्धा तास ते संघ मुख्यालयात होते. 

Nov 20, 2024 19:23 (IST)

सोलापुरात मतदान झाल्यानंतर MIM च्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

सोलापुरात एमआयएमच्या कार्यकर्त्यांचा अतिउत्साह पाहायला मिळाला आहे. मतदान प्रक्रिया पार पडताच, सोलापुरात एमआयएम ऑफिस समोर जल्लोष करण्यात आला. सोलापुरातील किडवाई चौक परिसरात एमआयएम कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. 

Advertisement
Nov 20, 2024 19:21 (IST)

मतदानाची वेळ संपल्यानंतर कोल्हापुरात मतदान केंद्राबाहेर गोंधळ

कोल्हापुरात मतदान केंद्राबाहेर जोरदार राडा झाला आहे. सदर बाजार येथील केंद्राबाहेर मतदानाची वेळ संपताच काही मतदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. दरम्यान यावेळी क्षिरसागर आणि लाटकर दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. मोठ्या संख्येने जमलेल्या जमावामूळे परिसरात तणावाचं वातावरण होत. पोलिसांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र काही कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे काही काळ या परिसरात गोंधळ होता. पोलिसांनी या जमावाला शांत करत पांगवले. सध्या या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Nov 20, 2024 19:14 (IST)

शरद पवार मुंबईत दाखल, पटोलेही मुंबईत येणार

महाविकास आघाडीचे नेते मुंबईत एकत्र येणार आहेत. शरद पवार हे मुंबईत दाखल झाले आहेत. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे उद्या मुंबईत दाखल होती. मविआचे नेत्यांचीही उद्या बैठक होण्याची  शक्यता आहे. त्यांच्याकडूनही प्रत्येक मतदार संघाचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे.

Nov 20, 2024 18:49 (IST)

मतदानानंतर मुंबईत उद्या महायुतीच्या नेत्यांची बैठक

मतदान झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीच्या नेत्यांची बैठक मुंबईत बोलवण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस उद्या मुंबईत येत आहे. या बैठकीत सर्व मतदार संघाचा आढावा घेतला जाणार आहे. अजित पवार आणि सुनिल तटकरे ही उद्या मुंबईत दाखल होणार आहेत. 

Nov 20, 2024 18:28 (IST)

राज्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुमच्या जिल्ह्यात सरासरी किती टक्के मतदान, पाहा आकडेवारी

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली.  सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 58.2 टक्के मतदान झाले आहे.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे 

अहमदनगर -  61.95 टक्के

अकोला -     56.16 टक्के

अमरावती -    58.48  टक्के 

औरंगाबाद-    60.83 टक्के 

बीड -        60.62 टक्के 

भंडारा-       65.88 टक्के 

बुलढाणा-     62.84  टक्के 

चंद्रपूर-       64.48 टक्के

धुळे -        59.75 टक्के 

गडचिरोली-    69.63 टक्के 

गोंदिया -      65.09  टक्के 

हिंगोली -      61.18 टक्के 

जळगाव -     54.69 टक्के 

जालना-      64.17 टक्के 

कोल्हापूर-    67.97 टक्के

लातूर-       61.43 टक्के 

मुंबई शहर-   49.07 टक्के 

मुंबई उपनगर- 51.76  टक्के

नागपूर -     56.06 टक्के

नांदेड -      55.88 टक्के 

नंदुरबार-     63.72  टक्के

नाशिक -     59.85  टक्के 

उस्मानाबाद-   58.59 टक्के 

पालघर-      50.31 टक्के 

परभणी-      62.73 टक्के

पुणे -        54.09 टक्के

रायगड -     61.01 टक्के 

रत्नागिरी-     60.35 टक्के

सांगली -     63.28 टक्के

सातारा -     64.16 टक्के 

सिंधुदुर्ग -     62.06 टक्के

सोलापूर -    57.09 टक्के

ठाणे -      49.67 टक्के 

वर्धा -      63.50 टक्के

वाशिम -    57.42  टक्के

यवतमाळ -  61.22 टक्के 

Nov 20, 2024 17:56 (IST)

मेळघाटातील रंगूबेली गावात एकानंही केलं नाही मतदान

रंगूबेली ग्रामपंचायत मधील सहा गावांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे इथल्या मतदान केंद्रावर शुकशुकाट होता. लोकसभा निवडणुकीतही या गावांनी बहिष्कार केला होता. सहा गावं मिळून 1200 मतदान आहे. मात्र मूलभूत सुविधा मिळत नसल्याने त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता.  

Nov 20, 2024 17:44 (IST)

पाच वाजेपर्यंत राज्यात 58.22 टक्के मतदान, सर्वाधिक मतदान गडचिरोली जिल्ह्यात

पाच वाजेपर्यंत राज्यात सरासरी 58.22 टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान गडचिरोली जिल्ह्यात झाले आहे. गडचिरोलीत 69.63% मतदानाची नोंद झाली आहे. तर सर्वात कमी मतदान हे मुंबई शहरात झाली असून त्याची नोंद 49.07% झाली आहे. 

Nov 20, 2024 17:39 (IST)

मतदान करताना मतदात्याचा जागीच मृत्यू

मतदान करताना हृदयविकाराच्या झटक्याने मतदाराचा मृत्यू झाला आहे. श्याम धायगुडे असं त्यांचे नाव आहे. खंडाळ्यात ही घटना घडली आहे. 

Nov 20, 2024 17:17 (IST)

शिवसेना उमेदवाराच्या गाडीवर अज्ञातांकडून गोळीबार

श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला आहे. अज्ञातांकडून हा गोळीबार करण्यात आला आहे. दोन मोटरसायकल तीन जण आले होते. त्यांनी हा गोळीबार केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.  

Nov 20, 2024 16:59 (IST)

कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपचे उमेदवार राम शिंदेंच्या नातेवाईकांकडून पैसे वाटप

कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपचे उमेदवार राम शिंदेंच्या नातेवाईकांकडून पैसे वाटप केल्याचा दावा केला जात आहे. रोहित पवार समर्थकांनी कर्जत येथील एका हॉटेलमधून संबंधित व्यक्तीला लाखो रुपयांच्या रोकडसह पकडले आहे. खांडेकर नावाच्या व्यक्तीकडे लाखो रुपयांची रोकड आणि काही याद्या मिळून आल्या आहेत. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पैशासह पकडलेल्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

Nov 20, 2024 16:38 (IST)

मतदान केंद्रावरच अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

बीड विधानसभा मतदारसंघातून एक दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावरच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

Nov 20, 2024 16:23 (IST)

आष्टीत मतदान केंद्रावर दोन गटात तुंबळ हाणामारी

आष्टी विधानसभा मतदारसंघातील पाटोदा तालुक्यातील बेदरवाडी येथे भाजपाचे उमेदवार सुरेश धस यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार महेबुब शेख यांचे समर्थकांमध्ये राडा झाला आहे. परळी विधानसभा मतदारसंघ वगळता पाचही मतदार संघामध्ये सुरळीतपणे मतदान प्रक्रिया दुपारपर्यंत पार पडली.

Nov 20, 2024 16:21 (IST)

भाजपा आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांची पोलिसां सोबत बाचाबाची

भाजपा आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांची पोलिसां सोबत बाचाबाची झाली आहे. गर्दी कमी करायला सांगितल्यावरुन लाड- दरेकर संतप्त झाले आहे. हा प्रकार सायन प्रतिक्षानगरमध्ये झाला.

Nov 20, 2024 16:14 (IST)

नवी मुंबईत माजी नगरसेवकाच्या मुलाला मारहाण

कोपरखैरणे सेक्टर 4 मध्ये माजी नगरसेवक शंकर मोरे यांच्या कार्यालयात घुसून त्यांचा मुलगा व कार्यकर्त्यांसोबत मारहाण करण्यात आली. या प्रकरणात शंकर मोरे यांच्यावर पैशांचे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Nov 20, 2024 16:10 (IST)

Live Update : झारखंडमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 61.47 टक्के मतदान

झारखंडमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 61.47 टक्के मतदान झालं आहे. 

Nov 20, 2024 16:07 (IST)

Live Update : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश प्रवक्ता नितेश कराळे मास्तरांना मारहाण

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश प्रवक्ता नितेश कराळे मास्तरांना मारहाण

भाजपा कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची नितेश कराळे यांची माहिती..

कराळे मास्तरांच्या मांडवा गावात मारहाण करण्यात आली आहे. यानंतर कराळे मास्तर सावंगी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत. 

Nov 20, 2024 15:59 (IST)

Live Update : दुपारी 3 वाजेपर्यंत मुंबईत किती टक्के मतदान झालं?

दुपारी 3 वाजेपर्यंत मुंबई शहरातील मतदानाची आकडेवारी 

भायखळा - 40.27

कुलाबा - 33.44

धारावी - 35.53

माहीम - 45.56

मलबार हिल - 42.55

मुंबादेवी - 36.94

शिवडी - 41.76

सायन कोळीवाडा - 37.26

वडाळा - 42.51

वरळी - 39.11

दुपारी 3 वाजेपर्यंत मुंबई उपनगरातील मतदानाची आकडेवारी...

अंधेरी पूर्व - 42.63

अंधेरी पश्चिम - 40.86

अणुशक्ती नगर - 38.62

भांडूप पश्चिम - 48.82

बोरीवली - 45.38

चांदीवली - 31.85

चारकोप - 39.70

चेंबूर - 40.76

दहीसर - 41.91

दिंडोशी - 43.78

घाटकोपर पूर्व - 43.85

घाटकोपर पश्चिम - 45.23

गोरेगाव - 42.59

जोगेश्वरी पूर्व - 45.56

कलिना - 39.08

कांदिवली पूर्व - 41.85

कुर्ला - 38.82

मागाठाणे - 40.20

मालाड पश्चिम - 41.14

मानखुर्द शिवाजी नगर - 36.42

मुलुंड - 39.10

वांद्रे पूर्व - 36.93

वांद्रे पश्चिम - 39.49

वर्सोवा - 37.84

विक्रोळी - 41.50

विलेपार्ले - 43.83

Nov 20, 2024 15:47 (IST)

Live Update : दुपारी 3 वाजेपर्यंत राज्यभरातील मतदानाची आकडेवारी

दुपारी 3 वाजेपर्यंत राज्यभरातील मतदानाची आकडेवारी

सर्वाधिक मतदान गडचिरोली आणि मुंबई शहरात सर्वात कमी मतदान

अहमदनगर - 47.85

अकोला - 44.45

अमरावती - 45.13

औरंगाबाद - 47.05

बीड - 46.15

भंडारा - 51.32

बुलढाणा - 47.48

चंद्रपूर - 49.87

धुळे - 47.62

गडचिरोली - 62.99

गोंदिया - 53.88

हिंगोली - 35.97

जळगाव - 40.62

जालना - 50.14

कोल्हापूर - 54.06

लातूर - 48.34

मुंबई शहर - 39.34

मुंबई उपनगर - 40.89

नागपूर - 44.45

नांदेड - 42.87

नंदूरबार - 51.16

नाशिक - 46.86

उस्मानाबाद - 45.81

पालघर - 46.82

परभणी - 48.84

पुणे - 41.70

रायगड - 48.13

रत्नागिरी - 50.04

सांगली - 48.39

सातारा - 49.82

सिंधुदुर्ग - 51.05

सोलापूर - 43.49

ठाणे - 38.94

वर्धा - 49.68

वाशिम - 43.67

यवतमाळ - 48.81

Nov 20, 2024 14:41 (IST)

Live Update : छगन भुजबळांची नगरसुल येथील मतदान केंद्राला भेट..

छगन भुजबळांची नगरसुल येथील मतदान केंद्राला भेट..

परस्पर विरोधी उमेदवार मंत्री छगन भुजबळ आणि माणिकराव शिंदे यांची भेट घेतली

हस्तांदोलन करत मंत्री छगन भुजबळांनी विरोधी उमेदवार असलेल्या माणिकरावांची विचारपूस केली..

मंत्री छगन भुजबळ आणि माणिकराव शिंदे यांनी एकमेकांना हस्तांदोलन केलं. 

Nov 20, 2024 14:38 (IST)

Live Update : मेळघाट विधानसभा मतदारसंघात पैसे देऊन मत घेतले जातानाचा धक्कादायक प्रकार

अमरावतीच्या मेळघाट विधानसभा मतदारसंघात पैसे देऊन मत घेतले जातानाचा धक्कादायक प्रकार

मेळघाटमधील खाऱ्या टेम्बरू येथील पैसे वाटतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल..

राजकुमार पटेल यांच्या कार्यकर्त्यांकडून पैसे देऊन राजकुमार पटेल यांना मतदान करण्याची विनंती केली जात असल्याचा आरोप आहे..

एका दुकानाच्या समोर बसून हा कार्यकर्ता पैशाचं वाटप करतानाचा व्हिडिओ पुढे आलाय..

यावर प्रशासन कारवाई करणार का असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय..

Nov 20, 2024 14:33 (IST)

Live Update : कोल्हापुरात मशालचे बटन दाबले तरी धनुष्यबाणला मत, उमेदवार के पी पाटील यांचा आक्षेप

कोल्हापुरात मशालचे बटन दाबले तरी धनुष्यबाणला मत जात असल्याचा आरोप केला जात आहे. राधानगरीमधील बर्गेवाडी गावातून हा प्रकार समोर आला आहे. उमेदवार के पी पाटील यांनी याबाबत आक्षेप घेतला आहे. तांत्रिक चूक दुरुस्त करून मशीन दुरुस्त झाल्यानंतर मतदान पूर्ववत सुरू होईल असंही सांगितलं जात आहे. 

Nov 20, 2024 14:29 (IST)

Live Update : अभिनेत्री गिरीजा ओकने परदेशातून पुण्यात येत बजावला आपला मतदानाचा हक्क.....

अभिनेत्री गिरीजा ओक गोडबोलेने न्यूझीलंडवरून पुण्यात येत मतदानाचा हक्क बजावला. 32 तास प्रवास करत मतदानासाठी पुण्यात पोहोचली. अभिनेत्री गिरीजा ओक गोडबोले यांनी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील बाल शिक्षण मंदिर प्रशालेत मतदान केले आहे. मी 32 ते 36 तास प्रवास करत पोहचले आहे. त्यामुळे कुठंलच कारण न देता मतदान करायलाच हवं असं गिरीजाने आवाहन केलं आहे.

Nov 20, 2024 14:23 (IST)

Live Update : नांदगाव मतदारसंघात मतदारांना पैसे वाटप करणारी गाडी पकडली

नांदगाव मतदारसंघातील साकोऱ्यात मतदारांना पैसे वाटप करणारी गाडी पकडली. साकोऱ्यातील अपक्ष उमेदवार डॉ. रोहन बोरसे समर्थक कार्यकर्त्यांनी गाडी अडवली. कार्यकर्त्यांनी हातात नोटा दाखवल्या. एका उत्साही कार्यकर्त्यांनी तर गाडीच्या टपावर उभे राहून नोटा फाडल्या. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून गाडी कोणाची व पैसे कोणाचे याबाबत चौकशी सुरू आहे. 

Nov 20, 2024 14:21 (IST)

Live Update : मुंबईत कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान?

सकाळी 1 वाजेपर्यंत मुंबई शहरातील मतदानाची आकडेवारी 

भायखळा - 29.49

कुलाबा - 24.16

धारावी - 24.65

माहीम - 33.01

मुंबादेवी - 27.01

शिवडी - 30.05

सायन कोळीवाडा - 19.49

वडाळा - 31.32

वरळी - 26.96

-------

 1 वाजेपर्यंत मुंबई उपनगरातील मतदानाची आकडेवारी...

अंधेरी पूर्व - 32.37

अंधेरी पश्चिम - 31.05

अणुशक्ती नगर - 27.76

भांडूप पश्चिम - 38.75

बोरीवली - 30.01

चांदीवली - 28.52

चारकोप - 27.89

चेंबूर - 29.30

दहीसर - 35.60

दिंडोशी - 33.14

घाटकोपर पूर्व - 33.91

घाटकोपर पश्चिम - 34.03

गोरेगाव - 32.40

जोगेश्वरी पूर्व - 34.78

कलिना - 28.49

कांदिवली पूर्व - 31.46

कुर्ला - 27.60

मागाठाणे - 28.91

मालाड पश्चिम - 27.68

मानखुर्द शिवाजी नगर - 26.22

मुलुंड - 32.40

वांद्रे पूर्व - 25.72

वांद्रे पश्चिम - 25.03

वर्सोवा - 27.33

विक्रोळी - 29.30

विलेपार्ले - 33.23

Nov 20, 2024 14:04 (IST)

Live Update : मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तरुण दुबईवरून ठाण्यात

ठाण्यातील ओमकार भोसले हा दुबईला असलेला मुलगा ताज हॉटेलमध्ये कामानिमित्त गेले अनेक वर्ष आपल्या शहरापासून बाहेर राहतो. परंतु फक्त आणि फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी आणि त्यांना मतदान करण्यासाठी चार दिवसाची सुट्टी काढून ओमकार ठाण्यामध्ये आला आणि मतदान केले. युवा सैनिक यज्ञेश भोईर यांचा अतिशय जवळचा मित्र म्हणून वारंवार यज्ञेशाच्या मागे लागत असे की, मला मतदान करण्यासाठी ठाण्यामध्ये यायचय. मला शिंदे साहेबांना मतदान करायचे. अखेर त्यांनी आज ठाण्यामध्ये येऊन मतदान केले. स्वतः मुख्यमंत्री यांनी त्याची भेट घेतली व त्याचे आभार देखील मानले मी जेव्हा दुबईला येईल तेव्हा नक्की तुला भेटेल असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भोसले याला आश्वासन दिले

Nov 20, 2024 13:54 (IST)

Live Update : पालघर जिल्ह्याची दुपारी 1 वाजेपर्यंतची सरासरी टक्केवारी 33.40%

पालघर जिल्ह्याची दुपारी 1 वाजेपर्यंतची सरासरी टक्केवारी :33.40%

मतदारसंघानुसर टक्केवारी

1)128- डहाणू :40.02 %

2)129-विक्रमगड: 32.1%

3)130-पालघर : 34.22%

4)131-बोईसर :32.5%

5)132-नालासोपारा: 30.35%

6)133-वसई : 34.53%

Nov 20, 2024 13:53 (IST)

Live Update : पुणे जिल्ह्यात 1 वाजेपर्यंत 29.03 टक्के मतदान

 पुणे जिल्ह्यात 1 वाजेपर्यंत 29.03 टक्के मतदान

मतदारसंघनिहाय टक्केवारी

1)पिंपरी- 21.34  

2)चिंचवड- 29.34 

3)भोसरी- 30.41 

4)वडगाव शेरी- 26.68

5)शिवाजी नगर- 23.46

6)कोथरूड- 27.60

7) खडकवासला- 29.05

8) पर्वती- 27.19

9) हडपसर- 24.15

10) कँटनमेंट- 25.40

11) कसबा- 31.67

12) मावळ- 34.17

Nov 20, 2024 13:45 (IST)

Live Update : गेल्या दोन तासात मतदानाचा आकडा वाढला...

2019 मध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत 17.8 टक्के मतदान झाले होते. यंदा 2024 मध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी 32.18 टक्के झालं आहे. 

Nov 20, 2024 13:42 (IST)

Live Update : दुपारी 1 वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी

दुपारी 1 वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी

दुपारी 1 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 32.18 टक्के मतदान झालं आहे. 

सर्वाधिक मतदान गडचिरोली तर सर्वात कमी मतदान मुंबई शहरात झालं आहे

अहमदनगर - 32.90

अकोला - 29.87

अमरावती - 31.32

औरंगाबाद - 33.89

बीड - 32.58

भंडारा - 35.06

बुलढाणा - 32.91

चंद्रपूर - 35.54

धुळे - 34.05

गडचिरोली - 50.89

गोंदिया - 40.46

हिंगोली - 35.97

जळगाव - 27.88

जालना - 36.42

कोल्हापूर - 38.56

लातूर - 33.27

मुंबई शहर - 27.73

मुंबई उपनगर - 30.43

नागपूर - 31.65

नांदेड - 28.15

नंदूरबार - 37.40

नाशिक - 32.30

उस्मानाबाद - 31.75

पालघर - 33.40

परभणी - 33.12

पुणे - 29.03

रायगड - 34.83

रत्नागिरी - 38.52

सांगली - 33.50

सातारा - 34.78

सिंधुदुर्ग - 38.34

सोलापूर - 29.44

ठाणे - 28.35

वर्धा - 34.55

वाशिम - 29.31

यवतमाळ - 34.10

Nov 20, 2024 13:33 (IST)

Live Update : हेमा मालिका यांनी कन्या ईशा देओलसह मतदानाचा हक्क बजावला

Nov 20, 2024 13:24 (IST)

Live Update : अभिनेत्री श्रुती मराठेनी बजावला मतदानाचा हक्क..

Nov 20, 2024 13:12 (IST)

Live Update : अजित पवार गटाकडून युगेंद्र पवार कार्यकर्त्यांना दमदाटी केल्याचा शर्मिला पवार यांचा आरोप

बारामती मध्ये आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे दरम्यान बारामती शहरातील भिगवन चौका नजीक असणाऱ्या महात्मा गांधी बालक मंदिर या ठिकाणच्या मतदान केंद्रावरती अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांना दमबाजी करण्यात आल्याचा आरोप युगेंद्र पवारांच्या आई शर्मिला पवार यांनी केला आहे. यानंतर अजित पवार गटाचे नेते किरण गुजर यांनी हा आरोप खोडून काढला आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः महात्मा गांधी बालेक मंदिर केंद्र या ठिकाणच्या मतदान केंद्रावर दाखल झाले आहेत. त्यांनी स्वतः त्या ठिकाणी केंद्रात जाऊन अधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे. 

Nov 20, 2024 13:01 (IST)

Live Update : मतदान यंत्राची बॅटरी खराब झाल्याने मतदानाला ब्रेक

खामगाव मतदार संघातील गेरू माटरगाव व श्रीधरनगर येथील दोन मतदान केंद्रावरील मतदान यंत्राची बॅटरी खराब झाल्याने मतदान थांबले. गेल्या अर्ध्या तासापासून दोन्ही मतदान केंद्रावरील मतदान यंत्राच्या बॅटरी खराब झाल्याने मतदान थांबलेले आहे. अद्यापही दुसरे मतदान यंत्र या ठिकाणी पोहोचलेले नाही

Nov 20, 2024 12:52 (IST)

Live Update : प्रणिती शिंदे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला झटका, अपक्ष आमदाराला थेट पाठिंबा

सोलापूर दक्षिण मतदारसंघात खासदार प्रणिती शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला झटका दिला असून अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना थेट पाठिंबा देत त्यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी या मतदारसंघातील जनतेला केले आहे. त्यामुळे ऐनवेळी प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या भूमिकेनं ठाकरेंना धक्का बसला आहे. प्रणिती शिंदे यांनी ही मैत्रीपूर्ण लढत असल्याचे काडादी यांना काँग्रेसचा एबी फॉर्म न देत महाआघाडीचा धर्म पाळला   असल्याचा दावा केला आहे.

Nov 20, 2024 12:48 (IST)

Live Update : मला मारण्याची धमकी दिली, पैसे वाटपही केले जात होते; पोलिसांनी सखोल चौकशी करावी - समीर भुजबळ

मला मारण्याची धमकी दिली, पैसे वाटपही तिथे केले जात होते, पोलीसांनी सखोल चौकशी करावी - भुजबळ

बहुचर्चित नाशिकच्या नांदगाव मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे आणि अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्यामध्ये जोरदार राडा झाल्याचे आज बघायला मिळाले. नांदगावच्या रस्त्यावर काही गाड्यांमधून सुहास कांदे मतदारांना घेऊन जात होते. यासोबतच तिथे पैशांचं वाटप केले जात होतं असा आरोप समीर भुजबळ यांनी केला आहे. 

कांदे यांनी मला मारण्याची देखील धमकी दिल्याचं भुजबळ यांनी म्हटलं आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी करावी अशी मागणी समीर भुजबळ यांनी केली असून नांदगावची जनता ही दहशत मोडीत काढेल असाही विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

Nov 20, 2024 12:43 (IST)

Live Update : देवेंद्र फडणवीसांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

Nov 20, 2024 12:40 (IST)

Live Update : उद्धव ठाकरेंसह कुटुंबाने बजावला मतदानाचा अधिकार..

Nov 20, 2024 12:37 (IST)

Live Update : गीतकार गुलजार आणि कन्या मेघना यांनी केलं मतदान

Nov 20, 2024 12:28 (IST)

Live Update : छत्रपती संभाजीनगरमधील आणखी एक धक्कादायक व्हिडिओ

छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड येथील घटाब्री  गावात मतदानावरून हाणामारी झाल्याची घटना ताजी असतानाच, याच गावातील आणखी एक व्हिडिओ आता समोर आला आहे. ज्यात एका उमेदवाराच्या शाळेतील शिक्षक गावात मतदानासाठी पैसे वाटण्यासाठी आल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी त्याला घेरावा घालत जाब विचारला. सोबतच या शिक्षकासोबत गावकऱ्यांनी धक्काबुक्की देखील केल्याचं व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे गावात आता पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे

Nov 20, 2024 12:19 (IST)

Live Update : 103 वयवर्ष असणारे स्वातंत्र्यसैनिक जी.जी. पारिख यांनी मलबार हिल मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला.

103 वयवर्ष असणारे स्वातंत्र्यसैनिक जी.जी. पारिख यांनी मलबार हिल मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला.

Nov 20, 2024 12:12 (IST)

Live Update : धुळ्यामध्ये मतदानाच्या दिवशी कोट्यवधींची चांदी पोलिसांच्या ताब्यात

धुळ्यामध्ये मतदानाच्या दिवशी कोट्यवधींची चांदी पोलिसांच्या ताब्यात

धुळ्यातील थाळनेर परिसरात पोलिसांची कारवाई 

जवळपास 94 कोटी रुपयांची चांदी कंटेनरमध्ये असल्याचा अंदाज 

हा कंटेनर बंगळुरूच्या दिशेने जात होता.

बँकेची चांदी असल्याचा प्राथमिक अंदाज

Nov 20, 2024 12:06 (IST)

Live Update : राणा दाम्पत्य दुचाकीवरुन मतदानाला रवाना

Nov 20, 2024 12:02 (IST)

Live Update : मुंबई उपनगरातील मतदानाची आकडेवारी...

मुंबई उपनगरातील मतदानाची आकडेवारी...

भांडूप पश्चिममध्ये सर्वाधिक मतदान, सर्वात कमी वांद्रे पूर्व

अंधेरी पूर्व - २०.०६

अंधेरी पश्चिम - १८.५१

अणुशक्ती नगर - १६.२६

भांडूप पश्चिम - २३.४२

बोरीवली - १६.११

चांदीवली - १७.००

चारकोप - १६.७९

चेंबूर - १७.४४

दहीसर - २१.४९

दिंडोशी - २०.५८

घाटकोपर पूर्व - २०.४९

घाटकोपर पश्चिम - १९.९१

गोरेगाव - १९.६७

जोगेश्वरी पूर्व - २१.६२

कलिना - १६.८७

कांदिवली पूर्व - १९.३७

कुर्ला - १५.५२

मागाठाणे - १७.१०

मालाड पश्चिम - १७.३९

मानखुर्द शिवाजी नगर - १५.३८

मुलुंड - १५.८०

वांद्रे पूर्व - १३.९८

वांद्रे पश्चिम - १७.०६

वर्सोवा - १५.०५

विक्रोळी - १५.५०

विलेपार्ले - १९.७३

Nov 20, 2024 11:51 (IST)

Live Update : इंदापूर तालुक्यातील लाखेवाडीत अजित पवार गट आणि शरद पवार गटात राडा

आज बारामती इंदापूर मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या मतदान प्रक्रियेसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. परंतु इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी गावामध्ये मतदान करायच्या वेळेस दत्तात्रय भरणे यांच्या पक्षाचे कार्यकर्ते शरद पवार गटाचे कार्यकर्ते एकमेकांस भिडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. 

लाखेवाडी मतदान केंद्रावर संबंध नसलेली व्यक्ती भरणे यांच्या गटाकडून सहभागी झाली असा आरोप या व्हिडिओ मध्ये केल्याचं दिसून येतयं. 

Nov 20, 2024 11:49 (IST)

Live Update : सकाळी 11 वाजेपर्यंत मुंबई शहरातील मतदानाची आकडेवारी

सकाळी ११ वाजेपर्यंत मुंबई शहरातील मतदानाची आकडेवारी

मुंबई शहरात सकाळी ११ वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान माहीम मतदारसंघात झालं तर सर्वात कमी मतदान सायन कोळीवाडा येथे झालं

भायखळा - १६.९८

कुलाबा - १३.०३

धारावी - १३.२८

माहीम - १९.६६

मुंबादेवी - १४.९५

शिवडी - १६.४९

सायन कोळीवाडा - १२.८२

वडाळा - १७.३३

वरळी - १४.५९

Nov 20, 2024 11:41 (IST)

Live Update : 2019 पेक्षा यंदा सकाळी 11 पर्यंत मतदानाची टक्केवारी जास्त

2019मध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 13.2 टक्के मतदान झाले होते. यंदा 2024 मध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 18.14 टक्के मतदान झालं 

Nov 20, 2024 11:38 (IST)

Live Update : सकाळी 11 वाजेपर्यंत महाराष्ट्रात किती टक्के मतदान झालं?

सकाळी ११ वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी...

अहमदनगर - १८.१४

अकोला - १६.३५

अमरावती - १७.४५

औरंगाबाद - १८.९८

बीड - १७.४१

भंडारा - १९.४४

बुलढाणा - १९.२३

चंद्रपूर - २१.५०

धुळे - २०.११

गडचिरोली - ३०.००

गोंदिया - २३.३२

हिंगोली - १९.२०

जळगाव - १५.६२

जालना - २१.२९

कोल्हापूर - २०.५९

लातूर - १८.५५

मुंबई शहर - १५.७८

मुंबई उपनगर - १७.९९

नागपूर - १८.९०

नांदेड - १३.६७

नंदूरबार - २१.६०

नाशिक - १८.७१

उस्मानाबाद - १७.०७

पालघर - १९.४०

परभणी - १८.४९

पुणे - १५.६४

रायगड - २०.४०

रत्नागिरी - २२.९३

सांगली - १८.५५

सातारा - १८.७२

सिंधुदुर्ग - २०.९१

सोलापूर - १५.६४

ठाणे - १६.६३

वर्धा - १८.८६

वाशिम - १६.२२

यवतमाळ - १९.३८

Nov 20, 2024 11:32 (IST)

Live Update : सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी

सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी

जिल्ह्याची टक्केवारी - चार तासांत २०.५२% मतदान

मतदार संघनिहाय टक्केवारी

१) २६३ दापोली - १८.३२ %

२)  २६४ गुहागर - १७.०५%

३)  २६५ चिपळूण- २४.५७%

४)  २६६ रत्नागिरी - १८.६०%

५)  २६७ राजापूर- २४.०७%

Nov 20, 2024 11:30 (IST)

Live Update : माढा मतदारसंघातील उंदरगाव परिसरात बुध कॅप्चरिंग करण्याचा प्रयत्न...

माढा मतदारसंघातील उंदरगाव परिसरात बुध कॅप्चरिंग करण्याचा प्रयत्न...

माढा, माण खटावमध्ये सत्ताधारी आमदार पोलिंग एजंटनाही बसू देत नाहीत...

महाडमध्ये बोगस मतदान : बोटाला शाई लावून मतदारांना केले जात आहे बाहेर...

माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा गंभीर आरोप

निवडणूक आयोगाने उंदरगाव आणि माढा मतदारसंघातील सीसीटीव्ही फुटेज चेक करावेत...

खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Nov 20, 2024 11:15 (IST)

महायुती उत्तर मुंबईतील सर्व सहा जागा जिंकेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केला

Nov 20, 2024 11:13 (IST)

जनतेने आज 100 टक्के मतदान करावे - चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष

Nov 20, 2024 10:57 (IST)

बिटकॉईन घोटाळ्याप्रकरणी योग्य चौकशी झाली पाहिजे. यात खरं काय आहे हे सर्वांसमोर आले पाहिजे. आरोप गंभीर आहेत, त्यामुळे त्याची सखोल चौकशी करून सत्य बाहेर येणे गरजेचे आहे. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

Nov 20, 2024 10:56 (IST)

लोकसभेच्या याद्यांमध्ये घोळ होता. काही प्रमाणात तो कमी झाला आहे. लोकसभेच्या वेळी मतदानाची सिस्टम स्लो होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी होतं तसं ऊन नाही. त्यामुळे यावेळेस मतदानाचा टक्का वाढू शकतो. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

Nov 20, 2024 10:37 (IST)

Live Update : गायक राहुल देशपांडे यांनी पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क

गायक राहुल देशपांडे यांनी बजावला मतदानाचा हक्क

राहुल देशपांडे यांनी आज पुण्यात केलं मतदान

राहुल देशपांडे यांच्यासोबत त्यांची पत्नी नेहा देशपांडे यांनी सुद्धा केलं मतदान

Nov 20, 2024 10:34 (IST)

Live Update : देशाप्रती प्रेम आहे, तर घराबाहेर पडा आणि मतदान करा - विशाल ददलानी, संगीतकार

Nov 20, 2024 10:32 (IST)

Live Update : केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पत्नी आणि मुलासह मतदानाचा हक्क बजावला

Nov 20, 2024 10:30 (IST)

Live Update : करमाळ्यात मतदाराचा व्हिडिओ व्हायरल, विधानसभा मतदानावर जरांगे फॅक्टरचा प्रभाव

Nov 20, 2024 10:28 (IST)

Live Update : नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी बजावला मतदानाचा हक्क

Nov 20, 2024 10:26 (IST)

Live Update : सांगोल्यात मतदानासाठी रांगाच रांगा, पाकिस्तानच्या अटारी बॉर्डरसह , पश्चिम बंगाल, गुजरात मधून आले मतदार

सांगोल्यात मतदानासाठी रांगाच रांगा...

पाकिस्तानच्या अटारी बॉर्डरसह , पश्चिम बंगाल, गुजरात मधून आले मतदार

सांगोला मतदार संघात मतदारांनी आता रांगा लावले आहेत. सांगोला मतदार संघातील स्थलांतरित असणारे गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल , अरुणाचल प्रदेश आणि पाकिस्तानच्या अठारी बॉर्डरवरून नागरिक मतदानाला आले आहेत. नागपंथी डवरी समाजाचे असणारे मतदार हे फिरस्ती वर असतात. असे मतदार आता मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सांगोल्यात दाखल झाले आहे.

Nov 20, 2024 10:25 (IST)

Live Update : राज्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 6.61 टक्के मतदान

राज्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 6.61 टक्के मतदान

विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 साठी सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली असून 9 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 6.61 टक्के मतदान झाले 

राज्यातील जिल्हा निहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे. अहमदनगर - ५.९१ टक्के,अकोला - ६.० टक्के,अमरावती -६.६ टक्के, औरंगाबाद-७.५ टक्के, बीड -६.८८ टक्के, भंडारा- ६.२१ टक्के, बुलढाणा- ६.१६ टक्के, चंद्रपूर-८.५ टक्के,धुळे -६.७९ टक्के, गडचिरोली-१२.३३ टक्के, गोंदिया -७.९४ टक्के, हिंगोली -६.४५ टक्के, जळगाव - ५.८५ टक्के, जालना- ७.५१ टक्के, कोल्हापूर-७.३८ टक्के,लातूर ५.९१ टक्के, मुंबई शहर-६.२५ टक्के, मुंबई उपनगर-७.८८ टक्के,नागपूर -६.८६ टक्के,नांदेड -५.४२ टक्के, नंदुरबार-७.७६ टक्के,नाशिक - ६.८९ टक्के, उस्मानाबाद- ४.८५ टक्के, पालघर-७.३० टक्के, परभणी-६.५९ टक्के,पुणे - ५.५३ टक्के,रायगड - ७.५५ टक्के, रत्नागिरी-९.३० टक्के,सांगली - ६.१४ टक्के,सातारा - ५.१४ टक्के, सिंधुदुर्ग - ८.६१ टक्के,सोलापूर - ५.७,ठाणे ६.६६ टक्के,वर्धा - ५.९३ टक्के,वाशिम - ५.३३ टक्के,यवतमाळ - ७.१७ टक्के मतदान झाले आहे.

Nov 20, 2024 10:23 (IST)

Live Update : पुण्यात 2 तासात जिल्ह्यात 05.53 टक्के मतदान

मतदारसंघनिहाय टक्केवारी

1)पिंपरी- 04.04 

2)चिंचवड- 06.80 

3)भोसरी- 06.21 

4)वडगाव शेरी- 06.37

5)शिवाजी नगर- 05.29

6)कोथरूड- 06.50

7) खडकवासला- 05.44

8) पर्वती- 06.30

9) हडपसर- 04.45

10) कंटेन्मेंट- 05.53

11) कसबा- 07.44

12) मावळ- 06.07

Nov 20, 2024 10:21 (IST)

Live Update : ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत असल्याने राहुल नार्वेकर नाराज

ज्येष्ठ नागरिक मतदानासाठी येतात, पण मदान केंद्रापर्यंत गाडी सोडली जात नसल्याने राहुल नार्वेकरांनी  नाराजी व्यक्त केली आहे. 

पोलीस आधीच गाडी थांबवत असल्याने ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नार्वेकर यांनी निवडणूक अधिकारी थेट फोन करत नाराजी व्सक्त केली

Nov 20, 2024 10:14 (IST)

Live Update : लक्की शर्ट घालून हितेंद्र ठाकूर यांनी बजावला मतदानाचा हक्क

Nov 20, 2024 10:10 (IST)

Live Update : सुहास कांदे आणि छगन भुजबळ समर्थकांमध्ये राडा

नांदगावमध्ये सुहास कांदे आणि छगन भुजबळ समर्थकांमध्ये राडा 

Nov 20, 2024 10:08 (IST)

Live Update : पहिल्यांदाच बॅलेट पेपरवर नाव, बाकी नवीन काही नाही - युगेंद्र पवार

Nov 20, 2024 10:06 (IST)

Live Update : घराबाहेर पडा आणि मतदान करा - सोनू सूद

Nov 20, 2024 10:04 (IST)

Live Update : कोणाचं सरकार येणार, रितेश देशमुख काय म्हणाले?

Nov 20, 2024 10:03 (IST)

Live Update : आज महत्त्वाचा दिवस, घराबाहेर पडा मतदान करा - जेनिलिया डिसुजा

Nov 20, 2024 09:58 (IST)

Live Update : झारखंडमध्ये आज दुसऱ्या टप्प्याचं मतदान, सकाळी 9 वाजेपर्यंत 12.71 टक्के मतदान पार पडलं..

झारखंडमध्ये आज दुसऱ्या टप्प्याचं मतदान, सकाळी 9 वाजेपर्यंत 12.71 टक्के मतदान पार पडलं..

Nov 20, 2024 09:53 (IST)

Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत किती टक्के मतदान पार पडलं?

छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत किती टक्के मतदान पार पडलं?

जिल्ह्याची एकूण टक्केवारी : 7.5 टक्के

सर्वाधिक सिल्लोड 10.20 टक्के मतदान

औरंगाबाद पश्चिम मतदारसंघ :  6.18

औरंगाबाद मध्य मतदारसंघ  : 7.22 

औरंगाबाद पूर्व मतदारसंघ : 8.44 

पैठण विधानसभा मतदारसंघ : 7.06

गंगापूर विधानसभा मतदारसंघात : 4.77

सिल्लोड विधानसभा मतदारसंघ : 10.28

फुलंब्री विधानसभा मतदारसंघ : 7.10

कन्नड विधानसभा मतदारसंघ : 7.23

वैजापूर विधानसभा मतदारसंघ : 5.19

Nov 20, 2024 09:49 (IST)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : सकाळी 9 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी - 6.61, यंदा मतदारांमध्ये मतदानासाठी उत्साह दिसत आहे.

2019मध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 6.5 टक्के मतदान झाले होते. 

Nov 20, 2024 09:47 (IST)

Live Update : सकाळी 9 वाजेपर्यंत धाराशिवमध्ये सर्वात कमी तर गडचिरोलीत सर्वाधिक मतदान

सकाळी 9 वाजेपर्यंत धाराशिवमध्ये सर्वात कमी मतदान

मुंबई शहर आणि उपनगर - 9

गडचिरोली - 12.33

धाराशिव - 4.85

गडचिरोली - 12.33

गोंदिया - 7.94

हिंगोली - 6.45

जळगाव - 5.85

जालना - 7.51

कोल्हापूर - 7.38

लातूर - 5.91

मुंबई शहर - 6.25

मुंबई उपनगर - 7.88

नागपूर - 6.86

नांदेड - 5.03

नंदुरबार - 7.76

नाशिक - 6.89

धाराशिव - 4.85

पालघर - 7.30

परभणी - 6.59

पुणे - 5.53

सांगली - 6.14

सातारा  - 5.14

सिंधुदुर्ग - 8.61

सोलापूर - 5.7

ठाणे - 6.66

वर्धा - 5.93

वाशिम - 5.33

अहमदनगर - 5.91

अकोला - 6.08

अमरावती - 6.06

औरंगाबाद - 7.05

बीड - 6.88

भंडारा - 6.21






Nov 20, 2024 09:24 (IST)

Live Update : 'त्या' व्हायरल ऑडिओ क्लिपवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

मतदानाच्या एक दिवस आधी एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. यामध्ये बिटकॉईन घोटाळ्यात सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचा सहभाग असल्याचा आरोप माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी केला आहे. यावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? 

बिटकॉइन आणि क्रिप्टोवर मीच संसदेत प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे ऑडिओ क्लिपमध्ये माझा आवाज नाही. त्यामुळे या ऑडिओ क्लिप माझा कोणताही संबंध नाही, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे

Nov 20, 2024 09:17 (IST)

Live Update : मनसेचे उमेदवार प्रमोद पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

Nov 20, 2024 09:16 (IST)

Live Update : छगन भुजबळांनी सहकुटुंब मतदान केलं

Nov 20, 2024 09:12 (IST)

Live Update : रमेश बुंदिलेंकडून अभिजीत अडसूळ यांना पाठिंबा दिल्याची खोटी पत्रकं व्हायरल

रमेश बुंदिलेंकडून अभिजीत अडसूळ यांना पाठिंबा दिल्याची खोटी पत्रक अमरावतीच्या दर्यापूर मतदारसंघात वितरित झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अडसूळ समर्थकांकडून हा खोडसाळपणा केल्याचा आरोप आहे. दर्यापूर ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. मी निवडणूक मैदानात कायम असून खोट्या प्रचाराला बळी पडू नये असं स्पष्टीकरण रमेश बुंदलेंकडून देण्यात आलं आहे. 

Nov 20, 2024 09:10 (IST)

Live Update : तुमसरात मतदान यंत्रात बिघाड, एक तास उशीरा मतदान प्रक्रिया सुरू

तुमसर विधानसभेच्या तुमसर शहरांमधील मतदान केंद्र क्रमांक 186 मधील बांगडकर विद्यालयात असलेल्या मतदान ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाला. हीच परिस्थिती तुमसर तालुक्यातील मांडळ येथेही निर्माण झाली. त्यामुळे तब्बल एक तास मतदान प्रक्रिया रखडली. सकाळी मतदान केंद्रावर पोहोचलेल्या मतदारांना ईव्हीएम मशीनचा फटका बसल्याने त्यांना रांगेत ताटकळत उभं राहावं लागलं. तासभरानंतर केंद्र दुरुस्ती केल्याने मतदान प्रक्रिया आता सुरू झालेली आहे.

Nov 20, 2024 09:08 (IST)

Live Update : परभणी विधानसभा ठाकरे गटाचे उमेदवार राहुल पाटील यांनी पत्नी संप्रिया पाटील सोबत बजावला मतदानाचा हक्क!

परभणी विधानसभेचे शिवसेना (उभाठा) उमेदवार राहुल पाटील यांनी पत्नी संप्रिया पाटील सोबत बजावला मतदानाचा हक्क!

Nov 20, 2024 09:06 (IST)

Live Update : शरद पवार बारामतीत मतदान केंद्रावर दाखल...

Nov 20, 2024 09:00 (IST)

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने बजावला मतदानाचा हक्क

Nov 20, 2024 08:55 (IST)

मतदान करताना आज पहिल्यांदा वडील सोबत नाहीत. वडील बाबा सिद्दीकींच्या आठवणीने झीशान सिद्दीकी भावुक 

Nov 20, 2024 08:51 (IST)

भांडुपकरांचा कसा आहे मतदानासाठीचा उत्साह

Nov 20, 2024 08:44 (IST)

Live Update : मास्टरब्लास्टरने कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क...

Nov 20, 2024 08:41 (IST)

Live Update : कलाकारांनी बजावला मतदानाचा अधिकार...

Nov 20, 2024 08:37 (IST)

Live Update : अजित पवारांनी सोशल मीडियावर आईसोबतचा फोटो केला शेअर

अजित पवारांनी सोशल मीडियावर आईसोबतचा फोटो केला शेअर

Nov 20, 2024 08:34 (IST)

Live Update : मुरबाडमध्ये किसन कथोरे यांनी बजावला मतदानाचा हक्क

मुरबाड विधानसभेतील महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांनी आज सकाळी मतदानाचा हक्क बजावला. बदलापूर जवळील असनोली गावात कथोरे यांनी मतदान केलं. ग्रामस्थांच्या वतीने त्यांना पहिल्या मतदानाचा मान देण्यात आला. यावेळी कुठल्याही जाती धर्माला पाहून मतदान न करता विकासाला आपलं मत द्यावं, असं आवाहन किसान कथोरे यांनी केलं.

Nov 20, 2024 08:31 (IST)

Live Update : सुप्रिया सुळेंनी बजावला मतदानाचा हक्क

Nov 20, 2024 08:28 (IST)

Live Update : अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी मतदानाचा हक्क बजावला

Nov 20, 2024 08:27 (IST)

Live Update : आज पहिल्यांदाच वडील नसताना मतदान करतोय - झिशान सिद्दीकी

आज पहिल्यांदाच वडील नसताना मतदान करत आहे. सकाळी उठल्यावर आधी कब्रिस्तानात जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. जरी आज ते नसले तरी माझ्या हृदयात ते नेहमीच असतील. निवडणूक आयोग त्यांच्या त्यांच्या पद्धतीने सगळ्याच गोष्टींवर कारवाई करत आहे. मोठ्या संख्येने मतदारांनी येऊन मतदान करणे आवश्यक आहे. 

Nov 20, 2024 08:25 (IST)

Live Update : शिंदे गटाचे पदाधिकारी सुदेश चौधरी यांना मारहाण प्रकरणी आमदार क्षितिज ठाकूर यांच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल

विरारच्या विवांत हॉटेलमध्ये राडा प्रकरण : शिंदे गटाचे पदाधिकारी सुदेश चौधरी यांना मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार क्षितिज ठाकूर यांच्यासह 7 जणांवर तूलिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विरारच्या विवांत हॉटेलमध्ये पैसे वाढल्याच्या आरोपावरून झालेल्या राड्या प्रकरणी बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून शिंदे गटाचे पदाधिकारी सुदेश चौधरी यांना मारहाण करण्यात आली होती. या  मारहाण प्रकरणी रात्री उशिरा आमदार क्षितिज ठाकूर यांच्या सह 7 जणांवर तूलिंज पोलीस ठाण्यात मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल आहे.

Nov 20, 2024 08:23 (IST)

Live Update : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी बजावला मतदानाचा हक्क

मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर रक्षा खडसे यांनी बजावला मतदानाचा हक्क

Nov 20, 2024 08:20 (IST)

Live Update : सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सह पत्नी मतदानाचा हक्क बजावला

Nov 20, 2024 08:19 (IST)

Live Update : अतिरिक्त बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी बजावला मतदानाचा अधिकार

अतिरिक्त बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त  तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी (मुंबई शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी बजावला मतदानाचा अधिकार

Nov 20, 2024 08:09 (IST)

Live Update : नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार अॅड राहुल ढिकले यांनी केलं मतदान

Nov 20, 2024 08:08 (IST)

Live Update : मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि मनोज सौनिक मतदार केंद्रावर

मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि मनोज सौनिक या कुलाबा मतदारसंघातील केंद्रावर मतदान करण्यासाठी पोहचल्या..

Nov 20, 2024 08:02 (IST)

Live Update : शायना एनसीने मुलीसोबत मुंबादेवी मतदारसंघात मतदान केलं.

Nov 20, 2024 07:58 (IST)

Live Update : अभिनेत्री गौतमी कपूरने बजावला मतदानाचा हक्क

Nov 20, 2024 07:55 (IST)

Live Update : जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्यावर प्राणघातक हल्ला...

जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्यावर प्राणघातक हल्ला...

परिवर्तन महाशक्ती स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत डिक्कर गंभीर जखमी...

गाडीचं ही मोठं नुकसान झालं असून शेगावच्या कालखेड गावाजवळील घटना घडली आहे. 

Nov 20, 2024 07:52 (IST)

Live Update : 2019मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत किती टक्के मतदान झालं होतं?

2019मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत एकूण 61.4 टक्के मतदान झाले होते.

Nov 20, 2024 07:50 (IST)

Live Update : मतदारसंघात EVM मशीन बंद

शिवडी-लालबाग विधानसभा मतदारसंघातील आर एम भट शाळेतील मतदान केंद्र EVM क्रमांक 41 नंबरची मशिन बंद झाली आहे. तर प्रबोधनकार ठाकरे उद्यान येथील मतदान केंद्रावर विद्युत पुरवठा अपूरा असल्यामुळे EVM मशीन सुरू झाल्या आहेत. 

Nov 20, 2024 07:47 (IST)

Live Update : राजापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांनी केलं मतदान

राजापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांनी केलं मतदान

Nov 20, 2024 07:44 (IST)

Live Update : बोचऱ्या थंडीत अंगात स्वेटर, कानटोपी घालत कुडकुडत मतदार राजा मतदान केंद्रांवर

आठवडाभरापासून तापमानाच्या पाऱ्यामध्ये चांगलीच घसरण होते आहे. निफाडमध्ये तर पारा दहा अंशापर्यंत येऊन पोहोचलाय मात्र या बोचऱ्या थंडीत अंगात स्वेटर, कानटोपी घालत कुडकुडत मतदार राजा मतदान केंद्रांवर येऊन पोहोचत असून मतदानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद बघायला मिळतोय. थंडी असली म्हणून काय झालं मतदान हे आपले कर्तव्य आहे आणि ते आपण बजवायलाच हवे अशी प्रतिक्रिया वयस्कर मंडळींनी दिली आहे.

Nov 20, 2024 07:42 (IST)

Live Update : जामनेर येथील मतदान केंद्रावर EVM मशीन सुरू होत नसल्याने मतदानाला 15 ते 20 मिनिटं विलंब

जळगावच्या जामनेर येथील न्यू इंग्लिश स्कूल येथील मतदान केंद्रावर EVM मशीन सुरू होत नसल्यामुळे मतदानाला पंधरा ते वीस मिनिटं विलंब झाला. कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांच्या वतीने मशीन सुरू करण्यासाठी तांत्रिक कर्मचाऱ्यांचे मदत घेण्यात आले. पंधरा ते वीस मिनिटानंतर मशीन सुरू झाल्यानंतर त्याला सील करण्यात येवून मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मशीन सुरू होईपर्यंत मतदानासाठी आलेले नागरिक व महिला बाहेर थांबून होत्या. 

Nov 20, 2024 07:22 (IST)

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी बजावला मतदानाचा हक्क

Nov 20, 2024 07:20 (IST)

आधी मतदानाचे काम आणि यानंतर अन्य सर्व काम. मतदान हे नागरिकांचे कर्तव्य आहे आणि प्रत्येकाने मतदान केले पाहिजे - सरसंघचालक मोहन भागवत 

Nov 20, 2024 07:18 (IST)

बारामतीतील लोक मला चांगल्या मतांनी विजय मिळवून देतील, असा मला विश्वास आहे - अजित पवार, उपमुख्यमंत्री

Nov 20, 2024 07:16 (IST)

महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी नागरिकांना मतदान करण्याचे केले आवाहन 

Nov 20, 2024 07:13 (IST)

मतदान केंद्रावर पोहोचण्यापूर्वी महिलांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे औक्षण केले

Nov 20, 2024 07:12 (IST)

 महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले मतदान  

Nov 20, 2024 07:10 (IST)

सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदानाचा हक्क बजावला 

Nov 20, 2024 07:04 (IST)

उपमुख्यमंत्री अजित पवार मतदानासाठी मतदान केंद्रावर दाखल 

Nov 20, 2024 06:48 (IST)

झारखंडच्या नागरिकांना आज परिवर्तनासाठी मतदान करण्याची संधी आहे - बाबूलाल मरांडी, भाजप झारखंड अध्यक्ष 

Nov 20, 2024 06:44 (IST)

मुंबादेवी मतदारसंघातील शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवार शायना एनसी यांनी मतदानापूर्वी मुंबादेवी मंदिराचे दर्शन घेतले. 

Nov 20, 2024 06:36 (IST)

झारखंड - जामतारा : मतदान केंद्रावरील अंतिम तयार  

Nov 20, 2024 06:35 (IST)

ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावरील अंतिम तयारी 

Nov 20, 2024 06:33 (IST)

4 हजारहून अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात 

Nov 20, 2024 06:32 (IST)

लातूर शहरातील मतदान केंद्रावरील मतदानाची अंतिम तयारी सुरू. सकाळी 7 वाजता  मतदानाला होणार सुरुवात.

Nov 20, 2024 06:30 (IST)

थोड्याच वेळात मतदानाला होणार सुरुवात 

Nov 20, 2024 06:29 (IST)

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 288 जागांसाठी आज मतदान