जाहिरात
15 minutes ago

Maharashtra Assembly Elections 2024 Voting LIVE Updates: महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 288 जागांवर मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. 4 हजारांहून अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. दुसरीकडे झारखंडमध्येही विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यासाठी 38 जागांवर मतदान पार पडत आहेत.

महाराष्ट्रामध्ये (Maharashtra Vidhansabha Elections) सध्या भारतीय जनता पक्ष (BJP), शिवसेना (Shiv Sena Eknath Shinde Group) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP Ajit Pawar Group) यांची महायुती  तर शिवसेना (Shiv Sena UBT), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP Sharad Pawar Group) आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी यांच्यात लढत आहे. दुसरीकडे झारखंड निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 38 जागांवर झारखंड मुक्ती मोर्चा (JMM)च्या नेतृत्वाखाली INDIA Alliance आणि NDA यांच्यामध्ये लढत आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू राहणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. निवडणुकीसंदर्भातील सर्व अपडेट एका क्लिकवर जाणून घ्या...

बिटकॉईन घोटळ्याप्रकरणी योग्य चौकशी झाली पाहिजे. यात खरं काय आहे हे सर्वांसमोर आले पाहिजे. आरोप गंभीर आहेत, त्यामुळे त्याची सखोल चौकशी करून सत्य बाहेर येणे गरजेचे आहे. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

लोकसभेच्या याद्यांमध्ये घोळ होता. काही प्रमाणात तो कमी झाला आहे. लोकसभेच्या वेळी मतदानाची सिस्टम स्लो होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी होतं तसं ऊन नाही. त्यामुळे यावेळेस मतदानाचा टक्का वाढू शकतो. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

Live Update : गायक राहुल देशपांडे यांनी पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क

गायक राहुल देशपांडे यांनी बजावला मतदानाचा हक्क

राहुल देशपांडे यांनी आज पुण्यात केलं मतदान

राहुल देशपांडे यांच्यासोबत त्यांची पत्नी नेहा देशपांडे यांनी सुद्धा केलं मतदान

Live Update : देशाप्रती प्रेम आहे, तर घराबाहेर पडा आणि मतदान करा - विशाल ददलानी, संगीतकार

Live Update : केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पत्नी आणि मुलासह मतदानाचा हक्क बजावला

Live Update : करमाळ्यात मतदाराचा व्हिडिओ व्हायरल, विधानसभा मतदानावर जरांगे फॅक्टरचा प्रभाव

Live Update : नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी बजावला मतदानाचा हक्क

Live Update : सांगोल्यात मतदानासाठी रांगाच रांगा, पाकिस्तानच्या अटारी बॉर्डरसह , पश्चिम बंगाल, गुजरात मधून आले मतदार

सांगोल्यात मतदानासाठी रांगाच रांगा...

पाकिस्तानच्या अटारी बॉर्डरसह , पश्चिम बंगाल, गुजरात मधून आले मतदार

सांगोला मतदार संघात मतदारांनी आता रांगा लावले आहेत. सांगोला मतदार संघातील स्थलांतरित असणारे गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल , अरुणाचल प्रदेश आणि पाकिस्तानच्या अठारी बॉर्डरवरून नागरिक मतदानाला आले आहेत. नागपंथी डवरी समाजाचे असणारे मतदार हे फिरस्ती वर असतात. असे मतदार आता मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सांगोल्यात दाखल झाले आहे.

Live Update : राज्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 6.61 टक्के मतदान

राज्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 6.61 टक्के मतदान

विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 साठी सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली असून 9 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 6.61 टक्के मतदान झाले 

राज्यातील जिल्हा निहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे. अहमदनगर - ५.९१ टक्के,अकोला - ६.० टक्के,अमरावती -६.६ टक्के, औरंगाबाद-७.५ टक्के, बीड -६.८८ टक्के, भंडारा- ६.२१ टक्के, बुलढाणा- ६.१६ टक्के, चंद्रपूर-८.५ टक्के,धुळे -६.७९ टक्के, गडचिरोली-१२.३३ टक्के, गोंदिया -७.९४ टक्के, हिंगोली -६.४५ टक्के, जळगाव - ५.८५ टक्के, जालना- ७.५१ टक्के, कोल्हापूर-७.३८ टक्के,लातूर ५.९१ टक्के, मुंबई शहर-६.२५ टक्के, मुंबई उपनगर-७.८८ टक्के,नागपूर -६.८६ टक्के,नांदेड -५.४२ टक्के, नंदुरबार-७.७६ टक्के,नाशिक - ६.८९ टक्के, उस्मानाबाद- ४.८५ टक्के, पालघर-७.३० टक्के, परभणी-६.५९ टक्के,पुणे - ५.५३ टक्के,रायगड - ७.५५ टक्के, रत्नागिरी-९.३० टक्के,सांगली - ६.१४ टक्के,सातारा - ५.१४ टक्के, सिंधुदुर्ग - ८.६१ टक्के,सोलापूर - ५.७,ठाणे ६.६६ टक्के,वर्धा - ५.९३ टक्के,वाशिम - ५.३३ टक्के,यवतमाळ - ७.१७ टक्के मतदान झाले आहे.

Live Update : पुण्यात 2 तासात जिल्ह्यात 05.53 टक्के मतदान

मतदारसंघनिहाय टक्केवारी

1)पिंपरी- 04.04 

2)चिंचवड- 06.80 

3)भोसरी- 06.21 

4)वडगाव शेरी- 06.37

5)शिवाजी नगर- 05.29

6)कोथरूड- 06.50

7) खडकवासला- 05.44

8) पर्वती- 06.30

9) हडपसर- 04.45

10) कंटेन्मेंट- 05.53

11) कसबा- 07.44

12) मावळ- 06.07

Live Update : ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत असल्याने राहुल नार्वेकर नाराज

ज्येष्ठ नागरिक मतदानासाठी येतात, पण मदान केंद्रापर्यंत गाडी सोडली जात नसल्याने राहुल नार्वेकरांनी  नाराजी व्यक्त केली आहे. 

पोलीस आधीच गाडी थांबवत असल्याने ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नार्वेकर यांनी निवडणूक अधिकारी थेट फोन करत नाराजी व्सक्त केली

Live Update : लक्की शर्ट घालून हितेंद्र ठाकूर यांनी बजावला मतदानाचा हक्क

Live Update : सुहास कांदे आणि छगन भुजबळ समर्थकांमध्ये राडा

नांदगावमध्ये सुहास कांदे आणि छगन भुजबळ समर्थकांमध्ये राडा 

Live Update : पहिल्यांदाच बॅलेट पेपरवर नाव, बाकी नवीन काही नाही - युगेंद्र पवार

Live Update : घराबाहेर पडा आणि मतदान करा - सोनू सूद

Live Update : कोणाचं सरकार येणार, रितेश देशमुख काय म्हणाले?

Live Update : आज महत्त्वाचा दिवस, घराबाहेर पडा मतदान करा - जेनिलिया डिसुजा

Live Update : झारखंडमध्ये आज दुसऱ्या टप्प्याचं मतदान, सकाळी 9 वाजेपर्यंत 12.71 टक्के मतदान पार पडलं..

झारखंडमध्ये आज दुसऱ्या टप्प्याचं मतदान, सकाळी 9 वाजेपर्यंत 12.71 टक्के मतदान पार पडलं..

Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत किती टक्के मतदान पार पडलं?

छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत किती टक्के मतदान पार पडलं?

जिल्ह्याची एकूण टक्केवारी : 7.5 टक्के

सर्वाधिक सिल्लोड 10.20 टक्के मतदान

औरंगाबाद पश्चिम मतदारसंघ :  6.18

औरंगाबाद मध्य मतदारसंघ  : 7.22 

औरंगाबाद पूर्व मतदारसंघ : 8.44 

पैठण विधानसभा मतदारसंघ : 7.06

गंगापूर विधानसभा मतदारसंघात : 4.77

सिल्लोड विधानसभा मतदारसंघ : 10.28

फुलंब्री विधानसभा मतदारसंघ : 7.10

कन्नड विधानसभा मतदारसंघ : 7.23

वैजापूर विधानसभा मतदारसंघ : 5.19

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : सकाळी 9 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी - 6.61, यंदा मतदारांमध्ये मतदानासाठी उत्साह दिसत आहे.

2019मध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 6.5 टक्के मतदान झाले होते. 

Live Update : सकाळी 9 वाजेपर्यंत धाराशिवमध्ये सर्वात कमी तर गडचिरोलीत सर्वाधिक मतदान

सकाळी 9 वाजेपर्यंत धाराशिवमध्ये सर्वात कमी मतदान

मुंबई शहर आणि उपनगर - 9

गडचिरोली - 12.33

धाराशिव - 4.85

गडचिरोली - 12.33

गोंदिया - 7.94

हिंगोली - 6.45

जळगाव - 5.85

जालना - 7.51

कोल्हापूर - 7.38

लातूर - 5.91

मुंबई शहर - 6.25

मुंबई उपनगर - 7.88

नागपूर - 6.86

नांदेड - 5.03

नंदुरबार - 7.76

नाशिक - 6.89

धाराशिव - 4.85

पालघर - 7.30

परभणी - 6.59

पुणे - 5.53

सांगली - 6.14

सातारा  - 5.14

सिंधुदुर्ग - 8.61

सोलापूर - 5.7

ठाणे - 6.66

वर्धा - 5.93

वाशिम - 5.33

अहमदनगर - 5.91

अकोला - 6.08

अमरावती - 6.06

औरंगाबाद - 7.05

बीड - 6.88

भंडारा - 6.21






Live Update : 'त्या' व्हायरल ऑडिओ क्लिपवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

मतदानाच्या एक दिवस आधी एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. यामध्ये बिटकॉईन घोटाळ्यात सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचा सहभाग असल्याचा आरोप माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी केला आहे. यावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? 

बिटकॉइन आणि क्रिप्टोवर मीच संसदेत प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे ऑडिओ क्लिपमध्ये माझा आवाज नाही. त्यामुळे या ऑडिओ क्लिप माझा कोणताही संबंध नाही, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे

Live Update : मनसेचे उमेदवार प्रमोद पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

Live Update : छगन भुजबळांनी सहकुटुंब मतदान केलं

Live Update : रमेश बुंदिलेंकडून अभिजीत अडसूळ यांना पाठिंबा दिल्याची खोटी पत्रकं व्हायरल

रमेश बुंदिलेंकडून अभिजीत अडसूळ यांना पाठिंबा दिल्याची खोटी पत्रक अमरावतीच्या दर्यापूर मतदारसंघात वितरित झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अडसूळ समर्थकांकडून हा खोडसाळपणा केल्याचा आरोप आहे. दर्यापूर ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. मी निवडणूक मैदानात कायम असून खोट्या प्रचाराला बळी पडू नये असं स्पष्टीकरण रमेश बुंदलेंकडून देण्यात आलं आहे. 

Live Update : तुमसरात मतदान यंत्रात बिघाड, एक तास उशीरा मतदान प्रक्रिया सुरू

तुमसर विधानसभेच्या तुमसर शहरांमधील मतदान केंद्र क्रमांक 186 मधील बांगडकर विद्यालयात असलेल्या मतदान ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाला. हीच परिस्थिती तुमसर तालुक्यातील मांडळ येथेही निर्माण झाली. त्यामुळे तब्बल एक तास मतदान प्रक्रिया रखडली. सकाळी मतदान केंद्रावर पोहोचलेल्या मतदारांना ईव्हीएम मशीनचा फटका बसल्याने त्यांना रांगेत ताटकळत उभं राहावं लागलं. तासभरानंतर केंद्र दुरुस्ती केल्याने मतदान प्रक्रिया आता सुरू झालेली आहे.

Live Update : परभणी विधानसभा ठाकरे गटाचे उमेदवार राहुल पाटील यांनी पत्नी संप्रिया पाटील सोबत बजावला मतदानाचा हक्क!

परभणी विधानसभेचे शिवसेना (उभाठा) उमेदवार राहुल पाटील यांनी पत्नी संप्रिया पाटील सोबत बजावला मतदानाचा हक्क!

Live Update : शरद पवार बारामतीत मतदान केंद्रावर दाखल...

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने बजावला मतदानाचा हक्क

मतदान करताना आज पहिल्यांदा वडील सोबत नाहीत. वडील बाबा सिद्दीकींच्या आठवणीने झीशान सिद्दीकी भावुक 

भांडुपकरांचा कसा आहे मतदानासाठीचा उत्साह

Live Update : मास्टरब्लास्टरने कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क...

Live Update : कलाकारांनी बजावला मतदानाचा अधिकार...

Live Update : अजित पवारांनी सोशल मीडियावर आईसोबतचा फोटो केला शेअर

अजित पवारांनी सोशल मीडियावर आईसोबतचा फोटो केला शेअर

Live Update : मुरबाडमध्ये किसन कथोरे यांनी बजावला मतदानाचा हक्क

मुरबाड विधानसभेतील महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांनी आज सकाळी मतदानाचा हक्क बजावला. बदलापूर जवळील असनोली गावात कथोरे यांनी मतदान केलं. ग्रामस्थांच्या वतीने त्यांना पहिल्या मतदानाचा मान देण्यात आला. यावेळी कुठल्याही जाती धर्माला पाहून मतदान न करता विकासाला आपलं मत द्यावं, असं आवाहन किसान कथोरे यांनी केलं.

Live Update : सुप्रिया सुळेंनी बजावला मतदानाचा हक्क

Live Update : अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी मतदानाचा हक्क बजावला

Live Update : आज पहिल्यांदाच वडील नसताना मतदान करतोय - झिशान सिद्दीकी

आज पहिल्यांदाच वडील नसताना मतदान करत आहे. सकाळी उठल्यावर आधी कब्रिस्तानात जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. जरी आज ते नसले तरी माझ्या हृदयात ते नेहमीच असतील. निवडणूक आयोग त्यांच्या त्यांच्या पद्धतीने सगळ्याच गोष्टींवर कारवाई करत आहे. मोठ्या संख्येने मतदारांनी येऊन मतदान करणे आवश्यक आहे. 

Live Update : शिंदे गटाचे पदाधिकारी सुदेश चौधरी यांना मारहाण प्रकरणी आमदार क्षितिज ठाकूर यांच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल

विरारच्या विवांत हॉटेलमध्ये राडा प्रकरण : शिंदे गटाचे पदाधिकारी सुदेश चौधरी यांना मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार क्षितिज ठाकूर यांच्यासह 7 जणांवर तूलिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विरारच्या विवांत हॉटेलमध्ये पैसे वाढल्याच्या आरोपावरून झालेल्या राड्या प्रकरणी बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून शिंदे गटाचे पदाधिकारी सुदेश चौधरी यांना मारहाण करण्यात आली होती. या  मारहाण प्रकरणी रात्री उशिरा आमदार क्षितिज ठाकूर यांच्या सह 7 जणांवर तूलिंज पोलीस ठाण्यात मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल आहे.

Live Update : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी बजावला मतदानाचा हक्क

मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर रक्षा खडसे यांनी बजावला मतदानाचा हक्क

Live Update : सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सह पत्नी मतदानाचा हक्क बजावला

Live Update : अतिरिक्त बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी बजावला मतदानाचा अधिकार

अतिरिक्त बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त  तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी (मुंबई शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी बजावला मतदानाचा अधिकार

Live Update : नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार अॅड राहुल ढिकले यांनी केलं मतदान

Live Update : मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि मनोज सौनिक मतदार केंद्रावर

मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि मनोज सौनिक या कुलाबा मतदारसंघातील केंद्रावर मतदान करण्यासाठी पोहचल्या..

Live Update : शायना एनसीने मुलीसोबत मुंबादेवी मतदारसंघात मतदान केलं.

Live Update : अभिनेत्री गौतमी कपूरने बजावला मतदानाचा हक्क

Live Update : जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्यावर प्राणघातक हल्ला...

जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्यावर प्राणघातक हल्ला...

परिवर्तन महाशक्ती स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत डिक्कर गंभीर जखमी...

गाडीचं ही मोठं नुकसान झालं असून शेगावच्या कालखेड गावाजवळील घटना घडली आहे. 

Live Update : 2019मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत किती टक्के मतदान झालं होतं?

2019मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत एकूण 61.4 टक्के मतदान झाले होते.

Live Update : मतदारसंघात EVM मशीन बंद

शिवडी-लालबाग विधानसभा मतदारसंघातील आर एम भट शाळेतील मतदान केंद्र EVM क्रमांक 41 नंबरची मशिन बंद झाली आहे. तर प्रबोधनकार ठाकरे उद्यान येथील मतदान केंद्रावर विद्युत पुरवठा अपूरा असल्यामुळे EVM मशीन सुरू झाल्या आहेत. 

Live Update : राजापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांनी केलं मतदान

राजापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांनी केलं मतदान

Live Update : बोचऱ्या थंडीत अंगात स्वेटर, कानटोपी घालत कुडकुडत मतदार राजा मतदान केंद्रांवर

आठवडाभरापासून तापमानाच्या पाऱ्यामध्ये चांगलीच घसरण होते आहे. निफाडमध्ये तर पारा दहा अंशापर्यंत येऊन पोहोचलाय मात्र या बोचऱ्या थंडीत अंगात स्वेटर, कानटोपी घालत कुडकुडत मतदार राजा मतदान केंद्रांवर येऊन पोहोचत असून मतदानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद बघायला मिळतोय. थंडी असली म्हणून काय झालं मतदान हे आपले कर्तव्य आहे आणि ते आपण बजवायलाच हवे अशी प्रतिक्रिया वयस्कर मंडळींनी दिली आहे.

Live Update : जामनेर येथील मतदान केंद्रावर EVM मशीन सुरू होत नसल्याने मतदानाला 15 ते 20 मिनिटं विलंब

जळगावच्या जामनेर येथील न्यू इंग्लिश स्कूल येथील मतदान केंद्रावर EVM मशीन सुरू होत नसल्यामुळे मतदानाला पंधरा ते वीस मिनिटं विलंब झाला. कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांच्या वतीने मशीन सुरू करण्यासाठी तांत्रिक कर्मचाऱ्यांचे मदत घेण्यात आले. पंधरा ते वीस मिनिटानंतर मशीन सुरू झाल्यानंतर त्याला सील करण्यात येवून मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मशीन सुरू होईपर्यंत मतदानासाठी आलेले नागरिक व महिला बाहेर थांबून होत्या. 

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी बजावला मतदानाचा हक्क

आधी मतदानाचे काम आणि यानंतर अन्य सर्व काम. मतदान हे नागरिकांचे कर्तव्य आहे आणि प्रत्येकाने मतदान केले पाहिजे - सरसंघचालक मोहन भागवत 

बारामतीतील लोक मला चांगल्या मतांनी विजय मिळवून देतील, असा मला विश्वास आहे - अजित पवार, उपमुख्यमंत्री

महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी नागरिकांना मतदान करण्याचे केले आवाहन 

मतदान केंद्रावर पोहोचण्यापूर्वी महिलांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे औक्षण केले

 महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले मतदान  

सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदानाचा हक्क बजावला 

उपमुख्यमंत्री अजित पवार मतदानासाठी मतदान केंद्रावर दाखल 

झारखंडच्या नागरिकांना आज परिवर्तनासाठी मतदान करण्याची संधी आहे - बाबूलाल मरांडी, भाजप झारखंड अध्यक्ष 

मुंबादेवी मतदारसंघातील शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवार शायना एनसी यांनी मतदानापूर्वी मुंबादेवी मंदिराचे दर्शन घेतले. 

झारखंड - जामतारा : मतदान केंद्रावरील अंतिम तयार  

ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावरील अंतिम तयारी 

4 हजारहून अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात 

लातूर शहरातील मतदान केंद्रावरील मतदानाची अंतिम तयारी सुरू. सकाळी 7 वाजता  मतदानाला होणार सुरुवात.

थोड्याच वेळात मतदानाला होणार सुरुवात 

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 288 जागांसाठी आज मतदान 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com