जाहिरात
1 hour ago

तुळजाभवानी मंदिरात आता बोगस व्हीआयपींना थेट दर्शन बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. व्हीआयपी पास वाटपावरून अनेकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या त्या अनुषंगाने मंदीर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मंदिर प्रशासनाकडुन यापूर्वी वेगवेगळ्या क्षेत्रातील ख्यातमान व्यक्तींना पास देण्यात येत होते. मात्र यामध्ये काही राजकीय व्यक्तींच्या नातेवाईकांना देखील पास देण्यात येत असल्याची चर्चा होत्या. तसेच व्हिआएपी दर्शन पासमध्ये भ्रष्टाचार केला जात असल्याच्या तक्रार खा. ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी केली होती. त्यानंतर आता बोगस व्हीआयपींना दर्शन पास न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Live Update : पुणे जिल्ह्यात एक गाव एक पोलीस योजना सुरू

पुणे जिल्ह्यात एक गाव एक पोलीस योजना सुरू 

1 मे पासून प्रत्येक गावात एक पोलीस असणार 

जिल्ह्यात 1 हजार 574 गावांमध्ये प्रभावी पोलिसिंग राबवणार 

गाव पातळीवरचे वाद होवू नयेत यासाठी एक गाव , एक पोलीस पाटील आणि एक पोलीस या योजनेची अंमलबजावणी 

सुरक्षित पुणे ग्रामीण मोबाईल अँप पण सुरु करण्यात आलं आहे

Live Update : 'लाडकी बहीण योजना बंद करा'; संजय राऊत संतापले

Live Update : अजित पवारांकडून जगताप कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

अहिल्यानगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांचे वडील विधान परिषदेचे माजी आमदार अरुण काका जगताप यांचे दोन दिवसापूर्वी निधन झाले. पुणे येथे खाजगी रुग्णालयांमध्ये गेले महिनाभर त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी कुटुंबाची सांत्वन पर भेट दिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  स्वर्गीय माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या आठवणींना उजाळा दिला...

Live Update : 6 मेपर्यंत गोंदिया शहर स्थानकापर्यंत ट्रेन्स जाणार नाहीत

गोंदियाकडे जाणाऱ्या सर्व पॅसेंजर रेल्वे गाड्या रेल्वेट्रॅकवर काम सुरू असल्याने 3 ते 6 मे या कालावधीत हिरडामाली ( गोरेगाव ) याच स्टेशनपर्यंत जातील.

Live Update : माजी मंत्री अब्दुल सत्तारांना न्यायालयाचा आणखी एक दणका

माजी मंत्री अब्दुल सत्तारांना न्यायालयाचा आणखी एक दणका 

सत्तारांविरोधात दाखल फौजदारी प्रकरण चालणार फास्टट्रॅकवर 

प्रत्येक आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सुनावणी घेण्यात येणार

विधानसभा निवडणुकीत सत्तारांनी खोटी माहिती दिल्याचा आरोप प्रकरण

सामाजिक कार्यकर्ता महेश शंकरलाल शंकरपेल्ली यांच्याकडून दाखल करण्यात आले होते फौजदारी प्रकरण

Live Update : NEET परीक्षेच्या आदल्या रात्री मुलीची कोटामध्ये आत्महत्या

Live Update : गोकुळ दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ

गोकुळ दूध संघाने म्हैस व गाय दूध विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. मुंबई व पुण्यात प्रतिलिटर 74 रुपये, तर कोल्हापूरसह इतर ठिकाणी लिटरला 68 रुपये मोजावे लागणार आहेत. संघाने जानेवारीमध्ये म्हैस, तर महिन्यापूर्वी गाय दूध खरेदी दर दोन रुपयांनी वाढवला होता. त्यानंतर आता विक्री दरात वाढ झालीये. दिवसेंदिवस विक्रीमध्ये होत असलेल्या दरवाढीचा ग्राहकांना फटका बसणार आहे. अमूल आणि मदर डेअरीने एक मे पासून दरवाढ केल्यामुळे गोकुळने देखील ही दरवाढ केली आहे

Live Update : उत्तराखंडमधील बद्रिनाथ मंदिराचं दार उघडलं, पाहा Video

Live Update : सिद्धेश्वर धरणाचे चार दरवाजे 0.3 मीटरने उघडले

हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरणांचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. 0.3 मीटरने हे दरवाजे उघडण्यात आले असून 2 हजार 58 क्युसेक पाण्याचा पूर्णा नदी पात्रात विसर्ग करण्यात आला आहे. सिद्धेश्वर धरणातून हिंगोली, औंढा, वसमत, पूर्णा यासारख्या शहरांना पाणीपुरवठा होतो. त्याचबरोबर 23 गावांतील पाणीपुरवठा योजना या धरणावर अवलंबून आहे.. सिद्धेश्वर धरणामधून पूर्ण नदीपात्रामध्ये पाणी सोडलं जात असल्यामुळे परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहराला धरणाचे पाणी मिळणार आहे. तर पुढील 24 तास पाण्याचा विसर्ग सुरू राहणार असून नदीपात्रात पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे. त्याचबरोबर नदीपात्रातून जनावरांची वाहतूक करू नये असे आवाहन पूर्णा पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे..

Live Update : लांजात 7 लाखाचा मद्यसाठा जप्त

लांजा तालुक्यातील कोर्ले बौद्धवाडी फाटा येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून गोवा बनावटीचा 7 लाख 21 हजार 400 रुपयांचा विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. 15 लाख रुपये किंमतीच्या हुंडाई कंपनीच्या क्रेटा कारसह हा साठा जप्त केला. याप्रकरणी सावंतवाडीतील राजीव अंबाजी सावंत व प्रभू साबन्ना कामनेटी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनाही मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी लांजा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

Live Update : ब्रम्ह मुहूर्तावर बद्रीनाथ मंदिराचे दार भाविकांसाठी खुलं

ब्रम्ह मुहूर्तावर बद्रीनाथ मंदिराचे दार भाविकांसाठी खुलं, बद्रीनाथमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर मांदियाळी 

Live Update : विद्यार्थ्यांनी बनवले शेती पिकाचे संरक्षण करणारे यंत्र

नाशिकच्या येवल्यातील मातोश्री पॉलिटेक्निकच्या मेकॅनिकल विभागातील चौघा विद्यार्थ्यांनी शेती पिकाचे पक्षी व प्राण्यापासून संरक्षण करण्यासाठी 'सोलर पीक संरक्षक यंत्र' तयार केले आहे. या यंत्रांमध्ये सायरन बसवण्यात आले असून शेतात पिकांचे पशु पक्षांपासून बचाव करण्यासाठी हे अनोखे  यंत्र उपयोगी ठरणार आहे. 

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: