जाहिरात
2 hours ago

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे एका 16 महिन्यांच्या चिमुकल्याचा बळी गेल्याची दुर्दैवी, संतापजनक तितकीच काळीज पिळवटून टाकणारी घटना  घडली होती  त्या बातमीची दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून आज सकाळी 10 वाजता  पाहणी करणार आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर  यांनी जत विधानसभा मतदारसंघात बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याविरोधात वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दांमुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. आज सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी नागपुरातील संविधान चौकात आंदोलन करण्यात येणार आहे.  
 

Nashik News: धक्कादायक! त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना बेदम मारहाण

* नॅशनल इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या पत्रकारांना त्र्यंबकेश्वरमध्ये गुंडांकडून बेदम मारहाण 

* स्वामी समर्थ केंद्राच्या कमानी जवळ वाहनांच्या प्रवेशाची पावती घेणाऱ्या गुंडांकडून मारहाण 

- त्र्यंबकेश्वरला साधू महंतांच्या बैठकीच्या कव्हरेजला जात असताना घडली घटना

* पुढारी न्यूजचे किरण ताजणे गंभीर जखमी 

- झी 24 तासचे योगेश खरे, साम टिव्हीचे अभिजीत सोनवणे यांनाही मारहाण

* त्र्यंबकेश्वरच्या शासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू 

* पोलिसांनी तिन आरोपींना घेतले ताब्यात

LIVE Update: कांदा बाजारभाव प्रश्नी प्रहार संघटना आक्रमक

- कांदा बाजारभाव प्रश्नी प्रहार संघटना आक्रमक...

- नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर रस्ता रोको आंदोलन...

- येवला तालुक्यातील एरंडगाव येथे रस्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचा सहभाग..

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो जेसीपी ला अडकवत घातल्या सडक्या कांद्याच्या माळा...

- तर काही शेतकऱ्यांनी डोक्यावर काळा कपडा बांधून गळ्यात कांद्याच्या माळा घालत केला निषेध...

- कांद्याला एक हजार रुपये अनुदान द्या...

- कांद्याला बाजार भाव द्या नाहीतर इच्छा मारण्याची परवानगी द्या...

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटो खाली मागणीचे घोषवाक्य...

- या रस्ता रोको आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी टायर जाळून केला निषेध...

LIVE Updates: अमरावती सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील 60 पेक्षा अधिक डॉक्टर 25 दिवसांपासून संपावर

अमरावती सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील 60 पेक्षा अधिक डॉक्टर 25 दिवसांपासून संपावर...

200 पेक्षा अधिक रुग्णांच्या शस्त्रक्रिया रखडल्या; डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे प्रचंड हाल...

शासनाने अजूनही कुठलाही तोडगा न काढल्याने काँग्रेस आक्रमक सुपर स्पेशालिटी रुग्णालयासमोर आंदोलन सुरू.

सरकारकडे डॉक्टरांचे नऊ कोटी रुपयांचे मानधन थकल्याने डॉक्टर गेले संपावर....

डॉक्टरांच्या संपावर सरकारने तोडगा काढण्याची रुग्णांची आणि काँग्रेसची मागणी..

LIVE Update: पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव बायपासला गँस ची मोठी गळती

पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव बायपासला गँस ची मोठी गळती 

गँस वाहतुक करणा-या गाडीतुनच महामार्गावर गँस गळती

गँस गळतीची हवा सर्वत्र पसरली

अचानक गँस गळती सुरु झाल्याने नारायणगाव परिसरात घबराहट 

पुणे नाशिक मार्गावर वाहतुक सुरु असतानाच गँस गळती सुरु होती 

काही वेळात गँस गळतीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले मात्र गँस गळती सुरु असताना सुरक्षेच्या कुठल्याही उपाययोजना उपलब्ध नसल्याने प्रवाशांसह स्थानिक नागरिक भिती च्या छायेखाली होते 

गँस गळतीचे कारण मात्र अस्पष्ट

LIVE Update: आसाम रायफल्सच्या वाहनावर हल्ला

आसाम रायफल्सच्या वाहनावर हल्ला

मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यात अज्ञात हल्लेखोरांचा हल्ला

दोन जवान शहीद तर चार जण जखमी

दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मणिपूर दौरा झाला होता 

पोलिस आणि स्थानिकांनी जखमींना रिम्स रुग्णालयात केले दाखल.

घटनेनंतर परिसरात शोध मोहीम सुरू

आसाम रायफल्सचे जवान इंफाळहून बिष्णुपूरला जात असताना नंबोल सबल लाईकाई परिसरात आज सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. 

हल्लेखोरांनी जवांनाच्या गाडीवर  अंदाधुंद गोळीबार केला.

LIVE Update: शासनाकडून कुंभमेळा शिखर समितीची स्थापना

- शासनाकडून कुंभमेळा शिखर समितीची स्थापना

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिखर समितीचे अध्यक्ष

- समितीमध्ये छगन भुजबळ, दादा भुसे, उदय सामंत शिवेंद्रराजे भोसले, माणिकराव कोकाटे आणि जयकुमार रावल सदस्यपदी

- कुंभमेळा शिखर समितीमध्ये मंत्रिमंडळातील अनेक मंत्री असणार सदस्य

- तर वेगवेगळ्या विभागाचे सचिव आणि अधिकाऱ्यांना देखील असणार समितीचे सदस्य 

- या आधी कुंभमेळा प्राधिकरणाची देखील झाली होती स्थापना

Live Update : लातूर जिल्ह्यात 5 हजार लाडक्या बहिणींचा पत्ता कट

लातूर जिल्ह्यात लाडकी बहिण योजनेच्या पाच लाख 67 हजार लाभार्थी आहेत. पात्र लाभार्थींना दीड हजाराचे 13 हप्ते मिळाले आहेत. म्हणजे प्रत्येक पात्र महिलेला एकुन 19500 रुपयांचा लाभ आतापर्यंत मिळाला आहे. मात्र  दिड महिण्यात 68 हजार महिलांची पुनर्तपासणी करण्यात आल्यानंतर जवळपास 5 हजार लाडक्या बहिणींचा पत्ता कट झाला आहे. ज्यामध्ये एका कुटुंबात दोघींना लाभ मिळण्याची अट असतानाही तीघी चौघी लाभ घेत असल्याचे निदर्शणास आल्यामुळे 3211 महिला अपात्र ठरविण्यात आल्या आहेत. तर 65 पेक्षा अधिक वय असल्यामुळे 1616 महिला अपात्र ठरल्या आहेत.

Live Update : टाटा कन्स्ट्रक्शनला पुणे महापालिकेचा 15 लाखांचा दंड

टाटा कन्स्ट्रक्शनला पुणे महापालिकेचा 15 लाखांचा दंड

मेट्रोच काम सुरू असलेल्या ठिकाणी राडारोडा रस्त्यावर टाकल्याने महापालिकेची टाटा कन्स्ट्रक्शनवर कारवाई 

बालेवाडी हायस्ट्रीटसमोरील मोकळ्या जागेत पीएमआरडीएकडून उभारण्यात येत असलेल्या मेट्रो मार्ग क्रमांक ३ प्रकल्पातील उत्खननाचा राडारोडा अनधिकृतपणे टाकण्यात आले रस्त्यावर 

२ दिवसांत दंड न भरल्यास कायदेशीर कारवाईचा पुणे महानगरपालिकेचा टाटा कन्स्ट्रक्शनला  इशारा

तब्बल ५० ते ७० ट्रक राडारोडा बेकादेशीरपणे टाकण्यात आला रस्त्यावर

Live Update : भाजपच्या माजी नगरसेवकांकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांना साहित्याचं वाटप

भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आणि सेवा पंधरवडा निमित्त रत्नागिरीतील माजी नगरसेवकांकडून आज रत्नागिरी नगर पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना स्वच्छता साहित्याचं वाटप करण्यात आलं. यामध्ये फावडं, गमबूट, हँडग्लोज, घमेलं, खुरपं आदी साहित्याचं वाटप करण्यात आलं. तसेच यावेळी कर्मचाऱ्यांना अल्पोपहार देखील देण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक उमेश कुळकर्णी, मुन्ना चवंडे, राजू तोडणकर, समीर तीवरेकर, मानसी करमरकर, माजी शहराध्यक्ष अण्णा करमरकर आदी उपस्थित होते..

Live Update : कोल्हापुरी चप्पल क्लस्टरतर्फे आज दुपारी 12 वाजता महत्त्वाच्या पत्रकार परिषदेचं आयोजन

कोल्हापुरी चप्पल क्लस्टरतर्फे आज दुपारी १२ वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत प्राडा चप्पलसह काही गंभीर मुद्यांवर चर्चा होणार असून, कोल्हापुरी चप्पल उद्योगावरील संभाव्य धोके आणि राजकीय दबावामुळे या परंपरागत उद्योगाची जागा बळकावण्याचा षड्यंत्र सुरु असल्याची माहिती यामधून देण्यात येणार आहे. 

Live Update : येवला येथे कांद्याला योग्य हमीभाव मिळावा यासाठी प्रहार संघटनेतर्फे भव्य रस्ता रोको

येवला येथे कांद्याला योग्य हमीभाव मिळावा, या मागणीसाठी प्रहार संघटनेतर्फे भव्य रस्ता रोको आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. हे आंदोलन  सकाळी 8.30 वाजता होणार आहे.असून मालेगाव–सुरत महामार्गावरील वडनेर खाकुर्डी येथे शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, कांदा भावातील सातत्याने होत असलेल्या घसरणीचा निषेध नोंदवत रास्ता रोको करणार आहेत.  

Live Update : मीनाताई ठाकरे यांच्या अर्धाकृती पुतळ्यावर लाल रंग फासण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला आज कोर्टात हजर करणार

दादरमधील शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या अर्धाकृती पुतळ्यावर लाल रंग फासण्याचा प्रयत्न करणारा आरोपी उपेंद्र पावसकर याला अटक करण्यात आली असून, 20 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली , आज त्याची पोलिस कोठडी संपणार आहे सकाळी 11 वाजता त्याला कोर्टात हजर करणार आहे 

Live Update : गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यावरुन राजकीय वादंग, राज्यातील अनेक भागात शरद पवार गटाकडून आंदोलन

भाजप आमदार गोपीचंद पडळकर  यांनी जत विधानसभा मतदारसंघात बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील  यांच्याविरोधात वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दांमुळे राजकीय वाद निर्माण झाला.. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विविध जिल्ह्यांमध्ये कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या निषेधार्थ आंदोलन केलं असून, आजही राज्यात या वादाचा मोठा राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून माफीची मागणी करण्यात आली असून, वातावरण चिघळण्याची चिन्हं आहेत.

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com