4 days ago

मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या वेगवेगळ्या मागण्यांबाबत छत्रपती संभाजीनगर शहरात आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कायदेशीर व घटनात्मक आरक्षण याविषयावर अभ्यासक महत्त्वपूर्ण मांडणी करणार आहे. तर गोलमेज परिषदेच्या बैठकीनंतर पुढील लढ्यासाठी भूमिका जाहीर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या गोलमेज परिषदेचे आयोजक संजय लाखे पाटील यांच्याकडून मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे आजच्या या गोलमेज परिषदेत नेमकी काय चर्चा होते आणि बैठकीनंतर कोणते निर्णय घेतले जातात हे पाहणं महत्वाचं असणारे आहे

Sep 18, 2025 13:16 (IST)

Live Update : कोथरूड गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट

कोथरूड गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट 

ज्या चार आरोपींने गोळीबार केला, त्याचा चौघांना तिथून पुढे जाऊन एका इसमावर कोयत्याने केला हल्ला 

आधी एकावर किरकोळ कारणावरून गोळीबार केला आणि थोड्याच अंतरावर अजून एका सामान्य नागरिकावर कोयत्याने हल्ला केला 

वैभव साठे या इसमावर त्याच चार जणांकडून दहशद पसरवण्यासाठी हे कृत्य करण्यात आल

मयूर कुंभरे, गणेश राऊत, रोहित आखाडे, आणि मुसा शेख असे आरोपींचे नावं आहेत 

पुणे पोलिसांनी सध्या त्यांना ताब्यात घेऊन पुढील करवाई सुरू केली आहे

Sep 18, 2025 13:16 (IST)

Live Update : कोथरूड गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट

कोथरूड गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट 

ज्या चार आरोपींने गोळीबार केला, त्याचा चौघांना तिथून पुढे जाऊन एका इसमावर कोयत्याने केला हल्ला 

आधी एकावर किरकोळ कारणावरून गोळीबार केला आणि थोड्याच अंतरावर अजून एका सामान्य नागरिकावर कोयत्याने हल्ला केला 

वैभव साठे या इसमावर त्याच चार जणांकडून दहशद पसरवण्यासाठी हे कृत्य करण्यात आल

मयूर कुंभरे, गणेश राऊत, रोहित आखाडे, आणि मुसा शेख असे आरोपींचे नावं आहेत 

पुणे पोलिसांनी सध्या त्यांना ताब्यात घेऊन पुढील करवाई सुरू केली आहे

Sep 18, 2025 12:34 (IST)

Live Update : खड्ड्याचं श्राद्ध घालत नाशिककरांनी निषेध केला व्यक्त....

नाशिक शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झालेत यामुळे आता नागरिक रस्त्यावर उतरताना पाहायला मिळत आहे... याच मुद्द्यावर आज नागरिकांनी मखमलाबाद रोडवर पडलेल्या खड्ड्यांमुळे थेट रास्ता रोको करत खड्ड्यांच श्राद्ध घातल.. हातात पोस्टर घेऊन शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आले.. मखमलाबाद परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी खड्ड्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे तर पडलेल्या रस्त्यांमध्ये खड्ड्यांना माळ घालून आंदोलन केलाय... रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे एका शिक्षकांचा मृत्यू झालाय.... या मुळे या ठिकाणी सिमेंट चा रस्ता तयार करावा अशी मागणी केलीये... मागणी मान्य झाली नाही तर 20 दिवसानी थेट महापालिकेत जाऊन घंटानाद आंदोलन करू असा इशारा दिलाय

Sep 18, 2025 12:31 (IST)

Live Update : चाकुर तालुका कृषी कार्यालयाचा सहकार मंत्र्यांनी केला पंचनामा

लातूर जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती आणि शेतीपिकांचं नुकसान झाले असल्याने शेतकरी अडचणीत असताना चाकुर तालुका कार्यालयातील कर्मचाऱ्यांना याचं गांभीर्य नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी तालुका कृषी कार्यालयाला सरप्राईज व्हिजीट दिली असता 11:30 वाजेपर्यंत कार्यालयात कर्मचारी उपस्थित राहत नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सहकार मंत्र्यांनी तत्काळ जिल्हाधिकारी आणि कृषी अधिक्षकांना फोन करून संबंधीत कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Advertisement
Sep 18, 2025 10:23 (IST)

Live Update : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर 22 तास खुले राहणार

शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर 22 तास खुले राहणार 

शारदीय नवरात्र उत्सव काळात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर संस्थांनचा निर्णय

नवरात्रौत्सव काळात चरण तीर्थ पहाटे एक वाजता होणार

20 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबर पर्यंत नवरात्र उत्सव काळात मंदिर भक्तांसाठी राहणार 22 तास खुले 

सात व आठ ऑक्टोबर रोजी देखील कोजागिरीनिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर बावीस तास खुले राहणार

Sep 18, 2025 10:03 (IST)

Live Update : अक्कलकोटमधील मुसळधार पावसामुळे अक्कलकोट - वागदरी रस्ता बंद

अक्कलकोटमधील मुसळधार पावसामुळे अक्कलकोट - वागदरी रस्ता बंद 

अक्कलकोटच्या शिरसी येथील पुलावरून ३ ते ४ फूट पाणी आल्याने रस्ता बंद 

अक्कलकोट - वागदरी रस्ता बंद असल्याने वाहतूक झाली ठप्प

गेली चार दिवसापासून अक्कलकोट तालुक्यात सुरू आहे मुसळधार पाऊस 

अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पावसामुळे ओढ़े- नाले भरले तुडुंब

खरीप हंगामातील शेती पिकांचे मोठे नुकसान

Advertisement
Sep 18, 2025 10:03 (IST)

Live Update : अक्कलकोटमधील मुसळधार पावसामुळे अक्कलकोट - वागदरी रस्ता बंद

अक्कलकोटमधील मुसळधार पावसामुळे अक्कलकोट - वागदरी रस्ता बंद 

अक्कलकोटच्या शिरसी येथील पुलावरून ३ ते ४ फूट पाणी आल्याने रस्ता बंद 

अक्कलकोट - वागदरी रस्ता बंद असल्याने वाहतूक झाली ठप्प

गेली चार दिवसापासून अक्कलकोट तालुक्यात सुरू आहे मुसळधार पाऊस 

अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पावसामुळे ओढ़े- नाले भरले तुडुंब

खरीप हंगामातील शेती पिकांचे मोठे नुकसान

Sep 18, 2025 09:17 (IST)

Live Update : दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याची झाली दैना

दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याची झाली दैना,शेतांना प्राप्त झाले तळ्याचे स्वरूप 

हातातोंडांशी आलेल खरीप पिक पूर्णतः गेलं पाण्याखाली,त्यामुळे शेतकऱ्याच अतोनात नुकसान 

उडीद,तूर,सोयाबीन,मूग सततच्या पावसामुळे पाण्याखाली असल्याने पिक लागले सडायला,शेतात साचले गुडगाभर पाणी 

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप,निंबर्गी,कंदलगाव,तिऱ्हे,पाथरी,पा कणी,तेरामैल, परिसरातील शेतकऱ्यांना बसला फटका 

त्यामुळे या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतोय 

Advertisement
Sep 18, 2025 09:16 (IST)

Live Update : रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज पावसाचा यल्लो अलर्ट

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने रात्री काहीसा जोर पकडला होता. काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी सरींवर पाऊस बरसत होता. पण आज सकाळपासून मात्र ढगाळ वातावरण आहे. नद्यांच्या पाण्यात वाढ झाली असली, तरी पाणी पातळी मात्र स्थिर आहे. पुढचे दोन ते तीन दिवस कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. आज रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.. दरम्यान गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 26.24 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस हा गुहागर आणि रत्नागिरी तालुक्यात पडला आहे.. गुहागरमध्ये गेल्या 24 तासांत 53.40 मिलिमीटर तर रत्नागिरीमध्ये 48.66 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे..

Sep 18, 2025 09:15 (IST)

Live Update : आमदार अभिजीत पाटलांची थेट ग्रामसभांना हजेरी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे पंढरपूर तालुक्यातील प्रारंभ तुंगत, पांढरेवाडी, देवडे या गावांमध्ये झाला यावेळी गावातील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांमध्ये आमदार अभिजीत पाटील यांनी हजेरी लावून गावातील नागरिकांच्या अडचणी सोडवले आहेत तसेच मुख्यमंत्री समृद्ध अभियानाचा वापर हा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी होईल असा विश्वास यावेळी आमदार पाटील यांनी व्यक्त केला.

Sep 18, 2025 08:47 (IST)

Live Update : महादेवी हत्तीणीसाठी आज हायपॉवर कमिटीकडे याचिका

महादेवी हत्तीणीसाठी आज हायपॉवर कमिटीकडे याचिका 

नांदणी मठ, सरकार आणि वनतारा एकत्रित हायपॉवर कमिटीकडे दाखल करणार याचिका

सर्वोच्च न्यायालयाने हायपॉवरकडे सोपवलेला निर्णय

Sep 18, 2025 07:52 (IST)

Live Update : संगमेश्वर तालुक्यातील साडवली वनविभागाने जखमी बिबट्याला केलं जेरबंद

संगमेश्वर तालुक्यातील साडवली कासारवाडी येथे एका जखमी बिबट्याला वन विभागाने सुरक्षितपणे जेरबंद केलं आहे.  राजेंद्र धने यांच्या घराच्या मागील बाजूस बिबट्या अडकलेला असल्याची माहिती मिळताच, वन विभागाचे सर्व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि खात्री केली असता, बिबट हा वन्यप्राणी एकाच ठिकाणी बसलेला आढळून आला. त्याला कोणताही त्रास होऊ न देता, सुरक्षितरीत्या ताब्यात घेण्यात आलं. या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. हा बिबट्या नर बिबट्या असून, त्याचे वय अंदाजे तीन ते चार वर्षे आहे. त्याच्या मागील डाव्या पायाच्या मांडीला जखम असल्याचं आढळून आलं, त्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी जागेवरच तात्काळ उपचार केले.

Sep 18, 2025 07:45 (IST)

Live Update : अखेर पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत

काल पालघर जवळील केळवे रेल्वे स्थानकावर मुंबईहून गुजरात कडे जाणाऱ्या वलसाड एक्सप्रेसच्या इंजिनला लागली होती आग

वलसाड एक्सप्रेसच्या इंजिनला आग  लागल्याने गुजरातकडे जाणारी वाहतूक झाली होती ठप्प

सर्व लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक कोळमंडले होते

लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या पहाटेपासून वेळेवर धावत आहेत

Sep 18, 2025 06:51 (IST)

Live Update : बॅनर लावण्याचा वादातून भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले

भाजपचे पदाधिकारी मोहन कोणकर यांना शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली मारहाण 

तर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते मुकेश कोट यांना भाजप कार्यकर्त्यांनी केली मारहाण

Sep 18, 2025 06:49 (IST)

Live Update : राज्य सकाणू समितीच्या सहअध्यक्ष पदी राज्यमंत्री पंकज भोयर यांची नियुक्ती

राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची गुणवत्तापूर्ण व प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सकाणू समितीच्या सहअध्यक्ष पदी शालेय शिक्षण मंत्री तथा वर्धा व भंडाराचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.तसा शासन आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उप सचिव तुषार महाजन यांनी 16 सप्टेंबर 2025 रोजी निर्गमित केला आहे.