3 hours ago

इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार काटेवाडी येथील पवार फॉर्ममधून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेसाठी रवाना झाले आहेत. आज छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक साठी बजावणारा मतदानाचा हक्क बजावणार आहे. 

May 18, 2025 14:16 (IST)

Live Update : बैलगाडा शर्यत बंदी विरोधात 2005 साली झालेल्या दंगलीचा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने

 राज्यात बैलगाडा शर्यतीवर सर्वप्रथम बंदी आल्यानंतर त्या विरोधात तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव व माजी खासदार किसनराव बाणखेले यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2005 साली मंचर येथे सर्वात पहिले व सर्वात मोठे आंदोलन झाले होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागून आंदोलनाचे पर्यावसन दंगलीत झाले होते. या दंगलीला जबाबदार म्हणून पोलिस यंत्रणेने त्यावेळी तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव व माजी खासदार किसनराव बाणखेले यांच्यासह 68 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले होते. वीस वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर न्यायालयाने आढळराव पाटलांसह या सर्व शेतकऱ्यांची नुकतीच निर्दोष मुक्तता केली आहे. केस मधून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर शेतकऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवून निकालाचे स्वागत केले.

May 18, 2025 12:45 (IST)

Live Update : मनोज जरांगे परळीकडे रवाना, तरुणाला मारहाणीप्रकरणी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मनोज जरांगे परळीकडे रवाना, तरुणाला मारहाणीप्रकरणी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर 

परळीतील मारहाणीत जखमी तरुणाची जरांगे भेट घेणार 

जरांगेंसोबत मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक बीडकडे निघाले

May 18, 2025 12:44 (IST)

Live Update : पुण्यातील DP रोडवर हाणामारी, एका बिर्याणी हाऊस बाहेर दोघांमध्ये हाणामारी

पुण्यातील DP रोडवर हाणामारी, एका बिर्याणी हाऊस बाहेर दोघांमध्ये हाणामारी 

किरकोळ कारणावरून दोन तरुणांमध्ये जोरदार राडा 

हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल 

भांडणात एकजण गंभीर जखमी

May 18, 2025 11:19 (IST)

Live Update : चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगली-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक बंद..

अलमटी धरणाच्या उंची वाढीविरोधात कोल्हापूरच्या उदगाव टोलनाका या ठिकाणी सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता सांगली कोल्हापूर मार्गावरील वाहतूक पोलिसांकडून बंद करण्यात आली आहे.  नागपूर आणि सांगली कडून कोल्हापूर कडे जाणारी वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली आहे.कोल्हापूर कडून सांगली व नागपूरकडे जाणारी वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली आहे शि रोळ मिरज मार्गे तसेच कोथळी -हरिपूर मार्गे सध्या वाहतूक करण्यात आली आहे.

Advertisement
May 18, 2025 10:42 (IST)

Live Update : भटक्या कुत्र्यांवर विषप्रयोग करून ठार मारल्याप्रकरणी एकजण अटकेत......

पिंपरी चिंचवड शहरातील महिंद्रा अँथिया सोसायटीमध्ये  13 एप्रिल रोजी भटक्या कुत्र्यांवर विषप्रयोग करून ठार मारल्या प्रकरणी संत तुकाराम नगर पोलिसांनी सोसायटीमधील सदस्य अलौकिक राजू कोटे याला ताब्यात घेतलं आहे,

May 18, 2025 10:05 (IST)

Live Update : नागपुरात भाजपची तिरंगा रॅली...

नागपुरात भाजपची तिरंगा रॅली...

Advertisement
May 18, 2025 09:42 (IST)

Live Update : पुण्यात मध्यरात्री गोळीबार, गाडी घासल्याच्या कारणावरून दोघांकडून हवेत गोळीबार

पुण्यात मध्यरात्री गोळीबार, गाडी घासल्याच्या कारणावरून दोघांकडून हवेत गोळीबार 

पुण्याच्या बिबवेवाडी परिसरातील घटना 

गोळीबार करणाऱ्या २ रेकॉर्ड वरील गुन्हेगारांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

गणेश भालके आणि देवा डोलारे असं गोळीबार करणाऱ्या आरोपींचे नावे 

तर चार आरोपी अजूनही फरार 

रात्री २ वाजण्याच्या सुमारास घडली घटना 

आरोपी आणि फिर्यादी दोघेही दुचाकीवरून जात होते, गाडी चालवत असताना फिर्यादीच्या गाडीचा आरोपीच्या गाडीला धक्का लागला त्याच रागातून या दोघांमध्ये वाद झाला आणि नंतर आरोपीने हवेत गोळीबार केला 

सुदैवाने गोळीबारात कुणीही जखमी नाही

May 18, 2025 08:52 (IST)

Live Update : संभाजीनगरमधील जुना मोंढा परिसरात पाण्याची पाइपलाइन फुटली

संभाजीनगरमधील जुना मोंढा परिसरात पाण्याची पाइपलाइन फुटली 

रात्री 1 वाजता पाण्याची पाइपलाइन फुटल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी घुसले

पाइपलाइन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया

नागरिकांनी काढली रात्र जागून 

एकीकडे शहरात दहा-बारा दिवसांनी पाणी मिळत असतांना ,दुसरीकडे हजारो लिटर पाणी वाया

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या जुन्या झाल्याने सतत फुटतायत

Advertisement
May 18, 2025 08:51 (IST)

Live Update : उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिकच्या कळवण दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिकच्या कळवण दौऱ्यावर

- कळवण पंचायत समिती ईमारत भूमिपूजन, कळवण शिक्षण संस्थेच्या ईमारत भूमीपूजन कार्यक्रमाला अजित पवार राहणार उपस्थित

- ओतूर धरणाची करणार पाहणी

May 18, 2025 07:55 (IST)

Live Update : सांगलीच्या अंकली येथे अलमट्टी धरणाच्या उंची विरोधात सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन

सांगलीच्या अंकली या ठिकाणी अलमट्टी धरणाच्या उंची विरोधात सर्वपक्षीय संघर्ष समितीकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.सांगली-कोल्हापूर व नागपूर-रत्नागिरी मार्गावरील अंकली या ठिकाणी हा चक्काजाम करण्यात येणार आहे. अलमट्टी धरणाची उंची 524 मीटर इतकी  करण्यात येणार आहे,यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्हे जलमय होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे,त्यामुळे कर्नाटक सरकारच्या अलमट्टी धरणाच्या उंचीला विरोध करण्यासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. 

May 18, 2025 07:53 (IST)

Live Update : वाशिम जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई, 199 गावांमध्ये उपाययोजना सुरू

यंदाच्या उन्हाळ्यात वाशिम जिल्ह्यात पाणीटंचाईचं संकट वाढल आहे. एप्रिल महिन्यापासून सुरू झालेली पाण्याची कमतरता आता मे महिन्यात अधिकच तीव्र झाली असून ग्रामीण भागात घोटभर पाण्यासाठी नागरिकांची अक्षरशः धावपळ सुरू झाली आहे.जिल्ह्यातील १९९ गावांमध्ये एकूण २१४ पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यामध्ये विहीर अधिग्रहण व टँकरद्वारे पाणीपुरवठा या दोन प्रमुख उपाययोजनांचा समावेश आहे.सध्या १५३ ठिकाणी विहीर अधिग्रहण, तर ९ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. ग्रामपंचायतींच्या प्रस्तावानुसार उपाययोजना हाती घेतल्या जात असून, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.

May 18, 2025 07:41 (IST)

Live Update : शेगावचे संत श्री गजानन महाराजांच्या पालखी मार्गावर पडल्या भेगा

बुलढाणा जिल्ह्यातील शेगावच्या श्री संत गजानन महाराजांची पालखी पुढील जून महिन्यात संतनगरी शेगाव येथून आषाढी निमित्त पंढरपूरकडे रवाना होणार आहे. पालखीतील वारकऱ्यांसाठी शेगाव ते पंढरपूर हा शेकडो कोटी रुपये खर्च करून पालखी मार्ग तयार करण्यात आला आहे.  मात्र ज्या रस्त्यावरून पालखी सोहळा जात आहे, तो रस्ता अतिशय खराब असून या रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडल्या असून रस्ता ठिकठिकाणी चिरला आहे. मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी या रस्त्याची पाहणी करून संताप व्यक्त केला आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीचे टायर त्या भेगा मध्ये जात असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे .. दरम्यान अनेक जण यात दगावले असून जखमी झाले आहेत  आणि आता पुढील महिन्यात याच मार्गावरून वारकऱ्यांना चालावे लागणार आहे. त्यापूर्वी हा पालखी मार्ग दुरुस्त करणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिक करीत आहे.