पोटापाण्याची सोय लावण्यासाठी मुंबईला जाण्याच्या नादात एका तरुणाला बायको गमवावी लागली आहे. अवघ्या सहा महिन्यापूर्वी या तरुणाचं लग्न झालं होतं. उत्तर प्रदेशातील संत कबीरनगरमध्ये राहणाऱ्या तरुणासोबत हा प्रकार घडला असून त्याच्या बायकोने दिरासोबतच लग्न केलं. हे ऐकून मुंबईला गेलेल्या तरुणाला आणखीनच मोठा धक्का बसला.
नेमकं काय झालं ते पाहूया, उत्तर प्रदेशातील हरिहरपूरमध्ये राहणाऱ्या कल्लू नावाच्या माणसाचं लग्न गोरखपुरच्या सहजनवा इथे राहणाऱ्या खुशबूशी ठरलं होतं. दोघांनी लग्न केल्यानंतर लग्नाच्या एका महिन्यातच कल्लूने पोटापाण्यासाठी मुंबईला जायचं ठरवलं. कल्लू मुंबईला गेल्यानंतर इथे खुशबू एकटी पडली होती. तिला उदास वाटू लागलं होतं. यावेळी कल्लूचा छोटा भाऊ अमितशी तिची बातचीत वाढू लागली होती. नवऱ्याचा फार सहवास न लाभल्याने अमितशी गप्पा मारणं खुशबूला आवडू लागलं होतं. अमितलाही वहिनी आवडू लागली होती.
नक्की वाचा : 38 वर्षांनंतर अशी दिसते 'मिस्टर इंडिया'ची निरागस टिना, गालावरची खळी पाहून म्हणाल, ही तर...
अखेर व्हायचं तेच झालं अमित आणि खुशबू प्रेमात पडले. कल्लूच्या घरच्यांना ही बाब कळाली. आता आपलं काही खरं नाही, अशी भीती वाटल्याने खुशबू आणि अमित घरातून पळून गेले. या दोघांना शोधून घरी परत आणण्यात आलं. त्यावेळी या दोघांनी ठासून सांगितलं की आम्ही दोघे वेगळे होणार नाही. खुशबूच्या माहेरच्यांनाही ही बाब सांगण्यात आली. त्यांनीही तिला समजावून पाहिलं मात्र ती ऐकायला तयार नव्हती.
नक्की वाचा : खान सरांची पत्नी हिंदू की मुस्लीम? सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांमागचे सत्य काय?
अमित आणि खुशबू ऐकत नाही हे पाहून खुशबूच्या सासरच्यांनी आणि माहेरच्यांनी त्या दोघांचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी हरिहरपूर नगरपंचायतीचे अध्यक्ष रवींद्र प्रताप शाही यांच्या कार्यालयात या दोघांचे लग्न लावून देण्यात आलं. शाही यांनी दिलेल्या माहितीनुसार अमितने खुशबूच्या भांगेत सिंदूर भरला आणि साता जन्मासाठी एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतल्या. कल्लूला जेव्हा हा सगळा प्रकार कळाला तेव्हा तो निराश झाला मात्र त्याने कोणताही अडथळा न आणण्याचं ठरवलं. कल्लू या दोघांच्या लग्नाला हजर नव्हता.