मणिपूरमध्ये (Manipur News) तीन महिला आणि तीन मुलांचे मृतदेह मिळाल्यानंतर हिंसाचार भडकल्याचं चित्र आहे. शनिवारी 16 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री बिरेन सिंह आणि पक्षाच्या आमदारांच्या घरावर हल्ला झाला. आंदोलनकर्त्यांनी आमदारांची घरंही जाळली. परिस्थिती बिघडत असल्याने मणिपूरचे मुख्य सचिव विनीत जोशी यांनी इन्फाल पश्चिम, इन्फाल पूर्व, विष्णुपूर, थौबल, काकचिंग, कांगपोकपी आणि चुराचांदपूरच्या भागात दोन दिवसांसाठी इंटरनेट आणि मोबाइल डेटा सेवा अनिश्चित काळासाठी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मणिपूर हिंसाचाराचे महत्त्वाचे अपडेट...
- मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात मैतेई समाजाच्या मदत शिबिरात राहणाऱ्या लैशाराम हिरोजीतच्या कुटुंबाची हत्या करण्यात आली. त्यांच्या कुटुंबातील दोन मुलं, पत्नी, सासू, पत्नीची बहीण आणि त्यांच्या मुलाची हत्या करण्यात आली. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला संशयास्पद कुकी समाजातील जहाल गटाने सोमवारी आसाम सीमेजवळील शहरातून ओलीस ठेवले.
- पोलिसांनी रविवारी 17 नोव्हेंबर 2024 रोजी सांगितलं की, हिरोजीतची सासू आणि त्यांच्या अडीच वर्षांच्या मुलाचा मृतदेह जिरीबामजवळील नदीत तरंगताना दिसला. मुलाच्या मृतदेहाचं डोकं कापलेल्या अवस्थेत होतं. मुलाच्या मृतदेहाचे हातही कापण्यात आले होते. हिरोजीतच्या सासूचा अर्धनग्न मृतदेह नदीच्या पात्रात दिसलं.
नक्की वाचा - मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, 2 मंत्री आणि 3 आमदारांच्या घरावर हल्ला
- मणिपूर हिंसाचार वाढल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नागपुरातील चार निवडणूक रॅली रद्द करून दिल्लीला परतले आणि राज्याच्या सुरक्षेसाठी समीक्षा बैठक घेतली. आज सोमवारी हिंसाचारावरुन बैठक बोलावण्यात आली आहे.
- या हिंसाचारादरम्यान मणिपूरमध्ये भाजप सरकारमध्ये सामील नॅशनल पिपल्स पार्टीने आपला पाठिंबा मागे घेतल्याची घोषणा केली आहे. मणिपूरमध्ये 60 विधानसभा आहेत, ज्यात सात सदस्य नॅशनल पिपल्स पक्षाचे आहेत, ज्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world