जाहिरात

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, 2 मंत्री आणि 3 आमदारांच्या घरावर हल्ला

Manipur Violence: मणिपूरमध्ये अद्यापही शांतता प्रस्थापित झाली नसून इथे हिंसाचाराच्या घटना अजूनही सुरू आहेत. आंदोलकांनी आता मंत्री आणि आमदारांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, 2 मंत्री आणि 3 आमदारांच्या घरावर हल्ला
Manipur Violence: या हिंसाचारामुळे मणिपूरमधील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे
नवी दिल्ली:

Manipur Violence: जिरीबाम जिल्ह्यात शनिवारी तीन लोकांची हत्या करणाऱ्यांना तत्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन करणारे इम्फाळमधील दोन मंत्री आणि तीन आमदारांच्या घरात घुसले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्री आणि आमदारांच्या घरांवर जमावाने केलेल्या हल्ल्यामुळे इंफाळ पश्चिम प्रशासनाला जिल्ह्यात अनिश्चित काळासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करावे लागले.  हल्ल्याच्या या घटनेनंतर इंफाळ पश्चिम, पूर्व, बिष्णुपूर, थौबल, काकचिंग, कांगपोकपी आणि चुराचंदपूरमध्ये इंटरनेट आणि मोबाइल डेटा सेवा दोन दिवसांसाठी बंद केली आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की जमावाने लांफेल सनाकीथेल भागात असलेल्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री सपम रंजन यांच्या घरावर हल्ला केला. 
Latest and Breaking News on NDTV

मिळालेल्या माहितीनुसार आंदोलक सगोलबंद भागातील भाजप आमदार आरके इमो यांच्या घराबाहेर जमले होते. आंदोलकांनी सरकारने 3 जणांच्या हत्येप्रकरणी योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी केली.  ही मागणी करतानाच आंदोलकांनी घोषणाबाजीही करायला सुरुवात केली. इमो हे मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचे जावई आहेत. 3 लोकांची हत्या करणाऱ्यांना तत्काळ अटक करा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. 24 तासात ही अटक करावी ही मागणी आंदोलकांनी केली आहे.   

वर्तमानपत्राच्या कार्यालयावर हल्ला

एका अधिकाऱ्याने हिंसाचाराबद्दल अधिक माहिती देताना सांगितले की किशमथोंग मतदारसंघाचे अपक्ष आमदार सपम सिंह यांचं घर टिडीम रोडवर आहे. त्यांच्या घराबाहेरही आंदोलन करण्यात आले. सिंह घरात नाही असे कळाल्यानंतर आंदोलकांनी सिंह यांच्या मालकीच्या वर्तमानपत्राच्या कार्यालयावर हल्ला केला. शुक्रवारी रात्री मणिपूर -आसाम सीमेवरील जिरी आणि बराक नदीच्या संगमावर तीन जणांचे मृतदेह सापडले आहे. हे मृतदेह जिरीबाम जिल्ह्यातील बेपत्ता झालेल्या सहा लोकांपैकी तिघांचे होते. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन मृतदेह लहान मुलांचे तर एक मृतदेह हा महिलेचा होता. मृतदेह सडल्यामुळे फुगले होते. 
Latest and Breaking News on NDTV

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिरीबाममधील बोकोबेरा भागात कुकी दहशतवाद्यांनी एका जमातीतील महिला आणि मुलांचे अपहरण केले होते. याच दहशतवाद्यांच्या दुसऱ्या तुकडीसोबत सीआरपीएफच्या जवानांची चकमक सुरू होती. ही चकमक सुरू असतानाच हे अपहरण करण्यात आले होते. या चकमकीमध्ये 10 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. मणिपूरमध्ये गेल्या वर्षभरापासून हिंदू मैतेई आणि ख्रिस्ती कुकी जमातींमध्ये संघर्ष सुरू आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com