जाहिरात

Honeymoon Case : राजा-सोनम रघुवंशी हनिमून मर्डर केसमध्ये मेघालय कोर्टाचा सर्वात मोठा निर्णय! पुढे काय होणार?

Raja Raghuvanshi Murder Case : राजा रघुवंशी-सोनम रघुवंशी हनिमून मर्डर केसमध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. या हत्याप्रकरणातील 5 आरोपींविरोधात आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

Honeymoon Case : राजा-सोनम रघुवंशी हनिमून मर्डर केसमध्ये मेघालय कोर्टाचा सर्वात मोठा निर्णय! पुढे काय होणार?
Raja Raghuvanshi Murder Case
मुंबई:

Raja Raghuvanshi Murder Case : राजा रघुवंशी-सोनम रघुवंशी हनिमून मर्डर केसमध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. या हत्याप्रकरणातील 5 आरोपींविरोधात आरोप निश्चित करण्यात आले आहेत. मेघालयातील ईस्ट खासी हिल्स जिल्हा न्यायालयाने हे आरोप निश्चित केले आहेत. राजाची मे महिन्यात सोहरा (चेरापूंजी) मध्ये हनिमून दरम्यान निर्घृण हत्या करण्यात आली होती. आरोपींमध्ये राजाची पत्नी सोनम रघुवंशी, तिचा प्रियकर राज कुशवाह आणि तीन सुपारी किलर-विशाल चौहान, आकाश राजपूत आणि आनंदचा समावेश आहे. सर्व आरोपी मध्य प्रदेशचे रहिवासी आहेत.

न्यायालयाने या पाच जणांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 103 (1),238 (a) (पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न) आणि 61(2) अंतर्गत आरोप निश्चिती करण्यात आली आहे. सर्वांनी स्वत: निर्दोष असल्याचं न्यायालयात म्हटलं आहे. पोलिसांनी म्हटलंय की,आता आणखी तीन जण- सिलॉम जेम्स, लोकेन्द्र तोमर आणि बलबीर अहिरवार यांच्या विरोधातही आरोपपत्र तयार करण्यात आलं आहे. त्यांच्यावर पुरावे नष्ट करण्याचा आरोप करण्यात आला आहे.

राजा-सोनम शिलाँगला हनिमूनसाठी गेले अन् होत्याचं नव्हतं झालं

हे प्रकरण मेघालयच्या सर्वात धक्कादायक हत्या प्रकरणांपैकी एक आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम 21 मे रोजी हनिमून सेलिब्रेट करण्यासाठी शिलाँगला गेले होते. तिथून दोघेही 26 मे रोजी सोहरा (चेरापूंजी) येथे फिरायला गेले होते. त्याचदिवशी दोघेही बेपत्ता झाले होते. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक पोलिसांनी मोठं सर्च ऑपरेशन राबवलं होतं. जवळपास एका आठवड्यानंतर 2 जून रोजी राजाचा मृतदेह सोहरा येथील मशहूर वेई सादोंग फॉल्सच्या एका खोल दरीत सापडला.

नक्की वाचा >> गोलंदाजांची आता खैर नाही! अनाया बांगर या नावाने उतरणार क्रिकेटच्या मैदानात, GYM चा व्हिडीओ शेअर करत म्हणाली..

तपासादरम्यान,पोलिसांना माहित झालं की, सोनमने तिचा प्रियकर राज कुशवाहसोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचला होता. राजाची हत्या करण्यासाठी त्यांनी तीन सुपारी किलरला मध्यप्रदेशमधून बोलावलं होतं. पोलिसांनी दावा केला की, हत्येच्या घटनेवेळी सोनम तिथे हजर होती. सर्व पाच आरोपींना एका आठवड्याच्या आत अटक केली होती.

709 पानांची चार्जशीट, आता होईल ट्रायल

पोलिसांनी 5 सप्टेंबरला न्यायालयात 790 पानांची चार्जशीट दाखल केली होती. मंगळवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने म्हटलं की, ट्रायल सुरू करण्यासाठी पर्यायी पुरावे उपलब्ध आहेत. आता या प्रकरणी ट्रायल लवकरच सुरु होईल.

नक्की वाचा >> स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये VVPAT चा वापर? राज्य निवडणूक आयोगाने दिली सर्वात महत्त्वाची माहिती

Listen to the latest songs, only on JioSaavn.com