Mahakumbh Viral Girl Monalisa: प्रयागराजच्या महाकुंभमधून चर्चेत आलेली व्हायरल गर्ल मोनालिसा सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. आता तिने 'द डायरी ऑफ मणिपूर'चे दिग्दर्शक सनोज मिश्रावर गंभीर आरोप लावले आहेत. मोनालिसाचं म्हणणं आहे की, सनोज मिश्राने अनेकदा मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता. मात्र मला काहीच मदत केली नसल्याचा आरोप मोनासिलाने कुटुंबावर केला आहे.
मोनालिसाने नुकतच केरळमध्ये राहणाऱ्या आपला प्रियकर फरमान खान याच्यासोबत लग्न केलं. ती सध्या कोचीमध्ये राहते. तिने मंगळवारी कोचीमध्ये पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले होते आणि यादरम्यान ती भावुक झाल्याचंही पाहायला मिळालं.
सनोज मिश्रा चांगला माणूस नाही - मोनालिसा
मोनालिसा पत्रकार परिषदेत म्हणाली, समोज मिश्रा चांगला माणूस नाही. त्याने चित्रपटादरम्यान अनेकदा मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. मी कुटुंबालाही याबाबत सांगितलं, मात्र कुटुंबाने मला मदत केली नाही. माझ्यासोबत अन्याय झालाय, मला न्याय हवायं. सनोज मिश्राने मला दोन वेळा चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. कुटुंबाला सांगितलं तर त्यांनी मला पहिला चित्रपट असल्याचं म्हणाले. पहिल्या चित्रपटासाठी माझा बलात्कार करायला लावाल का?
सनोज मिश्राने आरोप फेटाळले...
मोनालिसाच्या पत्रकार परिषदेनंतर सनोज मिश्राचं स्पष्टीकरण आलं आहे. त्याने आरोप केला आहे की, माझ्याविरोधान कट-कारस्थान करण्यात येत आहे. मोनालिसाला माझ्याविरुद्ध खोटे बोलण्यासाठी फूस लावली जात आहे. माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. मी मोनालिसाला माझी बहीण मानतो. ती नेहमीच माझ्याबद्दल चांगल्या गोष्टी बोलायची, पण रातोरात असं काय घडलं की ती माझ्याविरुद्ध बोलू लागली?
११ मार्चला केलं लग्न...
मोनालिसाने केरळमधील तिचा प्रियकर फरमान खानसोबत ११ मार्च रोजी तिरुअनंतपुरम येथील एका मंदिरात हिंदू पद्धतीत लग्न केलं होतं. यानंतर दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. तिने आपल्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला, ज्यामुळे तिने हे टोकाचं पाऊल उचललं. तिने सांगितलं की, वडील माझं लग्न त्यांच्या नातेवाईकांमध्ये करू इच्छित होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world