जाहिरात

Monsoon in Andaman 2026 : अखेर तो आला! मान्सून अंदमानात दाखल; कोकण किनारपट्टीवर कधीपर्यंत धडकणार? 

गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची प्रतीक्षा केली जात होती, तो अखेर अंदमानात दाखल झाला आहे.

Monsoon in Andaman 2026 : अखेर तो आला! मान्सून अंदमानात दाखल; कोकण किनारपट्टीवर कधीपर्यंत धडकणार? 

Monsoon in Andaman 2026 : गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची प्रतीक्षा केली जात होती, तो अखेर अंदमानात दाखल झाला आहे. मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. यंदा वेळेपूर्वीच मान्सूनचं अंदमानात आगमन झालं आहे. 

नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला वेग आला असून मान्सूनने आज अंदमान-निकोबार बेटांमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १ जूनच्या जवळपास केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील चार दिवसात ५ जूननंतर महाराष्ट्राच्या कोकण भागात पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.  

कधी-कुठे धडकणार मान्सून? 

अंदमान - आज १६ मे

श्रीलंका - २६ मे

केरळ, तामिळनाडू - १ जून

गोवा, कर्नाटक - ५ जून

महाराष्ट्र - १० जून

संपूर्ण भारत - १५ ते २५ जून

Latest and Breaking News on NDTV

पावसाबाबत आनंदाची बातमी...

अंदमानमध्ये मान्सून दाखल झाल्याची माहिती पुणे हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. अंदमानामध्ये मान्सून सरासरी तारखेच्या 6 दिवस अगोदर दाखल झाला आहे. तर केरळमध्ये लवकर मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज आहे. १ जूनच्या आसपास केरळमध्ये मान्सून दाखल होण्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे. पुणे हवामान शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी यासंदर्भात माहिती दिली. 

१० वर्षातील मान्सूनची आकडेवारी काय सांगते?

वर्ष        अंदाज काय?  दाखल कधी?

2016     7 जून        8 जून
2017     30 मे        5 जून
2018     29 मे        29 मे
2019    6 जून        8 जून
2020    5 जून        1 जून
2021    31 मे        30 जून
2022    27 मे        29 मे
2023    4 जून        8 जून
2024    31 मे        30 मे
2025    27 मे        24 मे


दरम्यान, यंदा एल-निनोच्या प्रभावामुळे पावसाचं स्वरुप संमिश्र राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जूनमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे तर जुलै-ऑगस्टमध्ये पाऊस कमी राहील असा अंदाज यापूर्वीच वर्तवण्यात आला आहे. एकंदरित अंदमानात दाखल झालेला मान्सून विनाअडथळा आणि वेगाने पुढे सरकत महाराष्ट्रात पोहोचेल अशी अपेक्षा आहे. यंदा मान्सून वेळेआधी दिलासा देणार असला तरी त्यासोबतच्या आव्हानांनाही प्रशासनाला तयार राहावं लागणार हे निश्चित. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com