जाहिरात

सासरवाडीत फेऱ्या वाढल्या, सासूचं सौंदर्य पाहून जावई घायाळ, दोघांनी सर्व मर्यादा ओलांडल्या अन्...

सध्या या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सासरवाडीत फेऱ्या वाढल्या, सासूचं सौंदर्य पाहून जावई घायाळ, दोघांनी सर्व मर्यादा ओलांडल्या अन्...

Wedding of mother-in-law and son-in-law : उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका सासूने आपल्या जावयासोबत लग्नगाठ बांधली. ही संपूर्ण घटना कानपूर जिल्ह्यातील अकबरपूर पोलीस ठाणे हद्दीत घडली. या घटनेवरुन सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. 

जावयाने सुंदर सासूसोबत बांधली लग्नगाठ... 

मिळालेल्या माहितीनुसार, या जावयाची सासरवाडीतील फेऱ्या वाढल्या होत्या. यातच तो सुंदर सासूच्या प्रेमात पडला. धक्कादायक बाब म्हणजे सासूलाही जावई आवडू लागला. त्यानंतरही बराच काळ ते रिलेशनशीपमध्ये होते. शेवटी दोघांनी कुटुंब आणि समाजाची पर्वा न करता एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि कायदेशीर लग्नगाठ बांधली. सध्या या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये दोघं एकमेकांना हार घालताना दिसत आहे. त्यांच्या हातात विवाह नोंदणी प्रमाणपत्रही दिसून येत आहे. यावेळी ते म्हणतात की, आम्ही आमच्या मर्जीने लग्न केलं आहे. ते पुढील आयुष्य एकत्र घालवू इच्छितात. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com