राज्यातील उन्हाच्या तडाख्यामुळे वळिवाच्या पावसामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळत असला तरी 13 मे रोजी घडलेल्या घटनांमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. वळिवाच्या पावसानंतर आता नागरिकांना मान्सूनचे वेध लागले आहेत. दरम्यान नैऋत्य मोसमी वारे दक्षिण अंदमान आणि निकोबार बेटांवर येत्या काही दिवसात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला जात आहे. येत्या 19 मे रोजी मोसमी वारे अंदमानात दाखल होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सर्वसाधारणपणे 22 मे रोजी मोसमी वारे अंदमानात दाखल होतात. गेल्यावर्षी अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा जोर कमी झाला होता. यंदा दक्षिण हिंद महासागरात वाऱ्याची प्रती चक्रीय स्थिती निर्माण होऊन वारे उत्तरेला वाटचाल करतात. विषुववृत्त पार केल्यानंतर वाऱ्याची वाटचाल नैऋत्य दिशेने सुरू होते. या वाऱ्यांमुळे ढगं तयार होतात आणि पाऊस पडतो. अंदमानात साधारण चोवीस तास पाऊस झाल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे अंदमानमध्ये दाखल झाल्याचं सांगितलं जातं.
नक्की वाचा - मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात अचानक वातावरण का बदललं? काय आहे कारण...
सर्वसाधारणपणे मोसमी वारे सरासरी 22 मे रोजी अंदमानात दाखल दाखल होतात आणि त्यानंतर एक आठवड्यात 1 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होता. दरम्यान बंगालच्या उपसागरातील वाटचालीवर मोसमी वाऱ्याची वाटचाल अवलंबून असते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world