जाहिरात
This Article is From Apr 14, 2024

सरबजीत सिंहची हत्या करणाऱ्या अमीरचा शेवट; लाहोरमध्ये अज्ञातांकडून गोळीबार 

पाकिस्तानातील तुरुंगात भारतीय नागरिक सरबजीत सिंह यांची हत्या करणारा अंडरवर्ल्ड डॉन अमीर सरफराज याची हत्या करण्यात आली आहे. लाहोरमध्ये अज्ञातांनी त्याच्यावर गोळीबार केला.

सरबजीत सिंहची हत्या करणाऱ्या अमीरचा शेवट; लाहोरमध्ये अज्ञातांकडून गोळीबार 
नवी दिल्ली:

पाकिस्तानातील तुरुंगात भारतीय नागरिक सरबजीत सिंह यांची हत्या करणारा अंडरवर्ल्ड डॉन अमीर सरफराज याची हत्या करण्यात आली आहे. लाहोरमध्ये अज्ञातांनी त्याच्यावर गोळीबार केला. वृत्तसंस्थांनी दिलेल्या बातमीनुसार, अमीर कारने जात असताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. यात त्याचा मृत्यू झाला. अमीरने भारतीय नागरिक सरबजीत यांची धारदार शस्त्राने हत्या केली होती. ISI च्या इशाऱ्यावर अमीरने सरबजीत यांची हत्या केली होती. 

लाहोरच्या तुरुंगात सरबजीत यांची हत्या
भारतीय नागरिक सरबजीत सिंह यांचा मृत्यू 2 मे 2013 मध्ये झाला होता. 1991 मध्ये पाकिस्तानच्या कोर्टाने सरबजीत सिंह यांना लाहोर आणि फैसलाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या आरोपाखाली शिक्षा सुनावली होती. या बॉम्बस्फोटात तब्बल 10 जणांचा मृत्यू झाला होता. मार्च 2006 मध्ये पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने सरबजीत यांची दया याचिका फेटाळत त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. यानंतर लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये काही कैद्यांनी सरबजीतवर हल्ला केला होता. आणि पाच दिवसांनंतर त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. 

चुकून सीमा ओलांडल्यानं पाकिस्तानात पोहोचले...
सरबजीत सिंह हे भारत-पाकिस्तानच्या सीमेवरील तरनतारन जिल्ह्यातल भिखीविंड गावात राहत होते. ते शेतकरी होते. 30 ऑगस्ट 1990 मध्ये ते चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचले होते. येथे त्यांना पाकिस्तानी सैन्याने अटक केली होती. त्यावेळी सरबजीत यांनी चुकून सीमा ओलांडल्याचं सांगितलं होतं.