जाहिरात

Egg Prices Record: संडे हो या मंडे, कसे खाणार अंडे? दरांमध्ये झाली विक्रमी वाढ; एका डझनचा भाव किती?

नववर्षाच्या निमित्ताने वाढलेली केक-पेस्ट्रीची मागणी, उत्तर भारतातील थंडीची लाट आणि उत्पादनातील घट यामुळे ही दरवाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

Egg Prices Record: संडे हो या मंडे, कसे खाणार अंडे? दरांमध्ये झाली विक्रमी वाढ; एका डझनचा भाव किती?

Mumbai Egg Price Record:  सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना मुंबईकरांच्या खिशाला मोठी कात्री बसली आहे. मुंबईच्या किरकोळ बाजारपेठेत अंड्यांच्या दराने आजवरचा उच्चांक गाठला असून, एका डझनासाठी ग्राहकांना १०८ ते ११० रुपये मोजावे लागत आहेत. ख्रिसमस आणि नववर्षाच्या निमित्ताने वाढलेली केक-पेस्ट्रीची मागणी, उत्तर भारतातील थंडीची लाट आणि उत्पादनातील घट यामुळे ही दरवाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

अंड्याच्या दराचा नवा रेकॉर्ड...

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ​अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये अंड्यांचा दर ११० रुपयांवर पोहोचला असून, दादर, वांद्रे आणि खारमध्ये हा दर १०८ रुपये आहे. विशेष म्हणजे, अवघ्या महिन्याभरापूर्वीच अंड्यांनी शंभर रुपयांचा टप्पा ओलांडला होता. प्रसिद्ध अभिनेते खुर्शेद लॉयर यांनीही या दरवाढीवर ट्विट करत आश्चर्य व्यक्त केले आहे. "भारतात ठिकठिकाणी पोल्ट्री फार्म्स असताना आणि आधुनिक पद्धतीने उत्पादन होत असताना दर इतके का वाढले आहेत, हे अनाकलनीय आहे," असे त्यांनी म्हटले आहे.

Gold Silver Price : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोनं-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, लेटेस्ट दर पाहा

तसेच लॉयर यांनी बुधवारी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला सांगितले की, "मी दादरमध्ये राहतो आणि अंडी प्रति डझन १०० रुपयांच्या पुढे गेल्याचे पाहून मला धक्का बसला. आता ती १०८ रुपयांना विकली जात आहेत. मला बाजारात अंड्यांची आवक कमी झालेली दिसली नाही. दुकानांची शेल्फ अंड्यांनी भरलेली आहेत, तरीही ही भाववाढ पाहून आश्चर्य वाटले, असं ते म्हणाले. 

चिकन- मटणही महागले

दरम्यान, ​केवळ अंडीच नव्हे, तर चिकन आणि मटणाचे दरही कडाडले आहेत. एकेकाळी १७५-१८० रुपये किलो मिळणारे चिकन आता २८० ते ३२० रुपयांवर गेले आहे. तर मटणाचे दर ८५० ते १००० रुपयांच्या घरात असून बोनलेस मटण १४०० रुपये किलोने विकले जात आहे. वाढत्या जिम संस्कृतीमुळे आणि आरोग्याप्रती जागरूकतेमुळे अंड्यांचा वापर वाढला असला, तरी या महागाईने मध्यमवर्गीयांचे बजेट कोलमडले आहे.

नक्की वाचा - Silver : ऐतिहासिक झेप! चांदी 2.50 लाखांच्या पार; अचानक कशी झाली वाढ? पुढे चांदी गडगडणार की....

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com