जाहिरात

गावात वृक्षारोपण करणाऱ्या महिला सरपंचाची ओढणी खेचली..शिविगाळ करून मारहाण केली, संतापजनक व्हिडीओ व्हायरल 

मंडला जिल्ह्यातील अहमदपूर गावात वृक्षारोपण करत असताना महिला सरपंचासोबत धक्कादायक प्रकार घडल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

गावात वृक्षारोपण करणाऱ्या महिला सरपंचाची ओढणी खेचली..शिविगाळ करून मारहाण केली, संतापजनक व्हिडीओ व्हायरल 
Woman Shocking Video Viral

Woman Shocking Video Viral :  मंडला जिल्ह्यातील अहमदपूर गावात वृक्षारोपण करत असताना महिला सरपंचासोबत धक्कादायक प्रकार घडल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. गावातील काही लोकांनी या महिलेसोबत गैरवर्तन करून तिला मारहाण केली. इतकच नव्हे तर या नराधमांनी शिविगाळ करून महिलेची ओढणी खेचण्याचाही प्रयत्न केला. या संतापजनक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

मंडला जिल्ह्यातील एका महिला सरपंचांवर झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये गावातील काही व्यक्ती महिला सरपंचांला शिवीगाळ करताना आणि मारहाण करताना दिसत आहेत. व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून या गंभीर प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील अंजनिया पोलीस स्टेशन हद्दीतील अहमदपूर ग्रामपंचायतच्या महिला सरपंच शासकीय जमिनीवर वृक्षारोपणाचं काम करत होत्या. 

नक्की वाचा >> GK News : कसं करायचं वंदे भारत ट्रेनचं तिकीट बुकिंग? IRCTC मध्ये किती तिकीट बुक करू शकता? अनेकांना माहितच नाही

व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीसोबतही घातला वाद 

याच दरम्यान गावातील दोन व्यक्ती तेथे पोहोचले आणि वृक्षारोपणाला विरोध करू लागले. शासकीय जमिनीवर वृक्षारोपण थांबवण्याच्या बहाण्याने आरोपींनी महिला सरपंचाशी गैरवर्तन केलं. आरोपींनी महिलेची ओढणी खेचली आणि तिला मारहाण केली.ही संपूर्ण घटना एका व्यक्तीने मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली. व्हिडिओमध्ये आरोपी महिला सरपंचाला मारहाण करताना स्पष्टपणे दिसत आहेत,तसेच एक आरोपी व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीसोबत वाद घालत असल्याचंही पाहायला मिळत आहे. व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे आणि लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल,असं पोलिसांनी म्हटलं आहे. 

नक्की वाचा >> ट्रेनमध्ये रात्रीच्या वेळी 5 मुलींच्या गप्पा रंगल्या..बाजूला बसलेल्या प्रवाशाची नियत फिरली, घाणेरड्या नजरेनं..

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com