Air India Logbook Viral : एअर इंडिया कंपनी विविध कारणांमुळे चर्चेत असते. यंदा एअर इंडिया चर्चेत आल्याचं कारण वेगळं आहे. यंदा कारण ठरलं आहे एक झुरळाचं. कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने विमानाच्या लॉगबुकमध्ये लिहिलेल्या एका नोंदीमुळे एअर इंडिया विमान पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. याचं छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
लॉगबुकमध्ये नोंद चर्चेत...
तर झालं असं की, २४ ऑक्टोबरला एअर इंडियाच्या दिल्ली ते दुबई या विमान प्रवासावेळी एका प्रवासाला विमानात झुरळ दिसलं. त्याने ही बाब केबिन क्रूला सांगितली. केबिन क्रूने ते झुरळ पकडलं. झुरळामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे कर्मचाऱ्याने लॉगबुकमध्ये या झुरळाबद्दल नोंद केली आहे. प्रवासादरम्यान विमानात ज्या काही घटना होतात त्याची नोंद लॉगबुकमध्ये केली जाते. कर्मचाऱ्याने झुरळाबाबतची नोंद लॉगबुकमध्ये केली आहे. केबिन क्रूने अनोख्या पद्धती ही नोंद केली आहे. त्याने लिहिलंय, विमानात प्रवाशाला एक जिवंत झुरळ सापडलं. अखेर त्या झुरळाला मरेपर्यंत फाशी देण्यात आली असं त्याने लॉगबुकमध्ये म्हटलं आहे.
An entry in Air India's cabin defect log recorded that a live cockroach was discovered by a passenger. The rectification note wryly mentioned that the matter was dealt with… conclusively.
— Jagriti Chandra (@jagritichandra) October 25, 2025
Khalaas, Dubai style pic.twitter.com/sifW6NNtG5
दरम्यान यासंदर्भात एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अनेकांनी यावर विविध प्रकारच्या कमेंट केल्या आहेत. यावर एकाने लिहिलंय, झुरळाचा मृतदेह कुटुंबाला सोपविण्यात आला की कॅटरिंगला?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world