
Nestle : गरीब आणि विकसनशील देशांमध्ये नेस्ले या कंपनीकडून विकल्या जाणाऱ्या लहान मुलांच्या दुधात जास्त प्रमाणात साखर घातली जात आहे. मात्र युरोप आणि ब्रिटेनमधील याच पदार्थांमध्ये साखर नसल्याचं समोर आलं आहे. नेस्लेच्या सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या लहान मुलांच्या दोन पदार्थांमध्ये साखरेचं प्रमाण जास्त आढळलं आहे. मात्र ब्रिटन, जर्मनी, स्वित्झर्लंड आणि अन्य विकसित देशांमध्ये हेच पदार्थ साखरेशिवाय विकले जात आहेत. पब्लिक आयच्या रिपोर्टमध्ये हा धक्कादायक खुलासा झाला आहे.
या रिपोर्टमध्ये जगातील सर्वात मोठी कंपनी नेस्लेबद्दल दिलेल्या माहितीनुसार, ही कंपनी दूध आणि लहान मुलांशी संबंधित उत्पादनात स्थुलता आणि गंभीर आजार रोखण्यासाठी लागू केलेल्या नियमावलीकडे दुर्लक्ष करीत साखर आणि मधासारखे पदार्थ मिसळत आहेत. आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकी देशांमधील उत्पादनांमध्ये नेस्लेकडून नियमांचं उल्लंघन करण्यात आलं आहे.
भारतात विकल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये साखरेचं प्रमाण किती?
या रिपोर्टनुसार, भारतात विकल्या जाणाऱ्या नेस्लेमध्ये लहान मुलांशी संबंधित उत्पादनात परमाणशी 3 ग्रॅम साखर आढळली. धक्कादायक म्हणजे कंपनीच्या पॅकेटवर सारखेसंबंधित माहिती देण्यात आलेली नाही. स्विस तपास संघटन पब्लिक आय आणि IBFAN यांनी आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेत विकणाऱ्या जाणाऱ्या बेबी फूड्स उत्पादनांचे नमुने बेल्जियमच्या प्रयोगशाळेत परीक्षणासाठी पाठवण्यात आले होते, त्यावेळी नेस्ले काही ठराविक देशांमधील लहान मुलांच्या उत्पादनात साखर घातल असल्याचं समोर आलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world