जाहिरात

Amravati News : पोटात दुखतं म्हणून डॉक्टरकडे गेली, मुलीच्या पोटातून काढला केसांचा गोळा; कुटुंबीय हादरले

अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील या दहा वर्षीय मुलीला गेल्या तीन-चार महिन्या पासून पोटात जळजळ होणे व सतत उलट्यांचा त्रास होत होता.

Amravati News : पोटात दुखतं म्हणून डॉक्टरकडे गेली, मुलीच्या पोटातून काढला केसांचा गोळा; कुटुंबीय हादरले

शुभम बायस्कार, प्रतिनिधी

Amravati News : अमरावती जिल्ह्यातील एका दहा वर्षीय बालिकेला गेल्या तीन-चार महिन्यांपासून अन्नपचनाचा त्रास व्हायचा. सारख्या मळमळ व उलट्या व्हायच्या, अखेर पालकांनी मुलीला अमरावती येथील रुग्णालयात नेलं. येथे तपासणीअंती धक्कादायक माहिती समोर आली. मुलीच्या गेल्या दोन ते वर्षांचा परिणाम म्हणून तिला आता त्रास होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं, शेवटी बालरोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. उषा गजभिये यांनी शस्त्रक्रिया करीत मुलीच्या पोटातून केसांचा गोळा काढून मुलीची आणि पालकांची सुटका केली. 

अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील या दहा वर्षीय मुलीला गेल्या तीन-चार महिन्या पासून पोटात जळजळ होणे व सतत उलट्यांचा त्रास होत होता. आई-वडिलांनी अनेक डॉक्टरांकडे नेलं. सोनोग्राफी एक्स-रे सर्व तपासण्या केल्या. काही डॉक्टरांनी अॅसिडिटी असल्याचे उपचार करून सोडून दिले. मात्र या मुलीचा त्रास कमी होत नसल्याने अखेर तिच्या पालकांनी अमरावती येथील बालरोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ.उषा गजभिये यांच्याकडे या मुलीला उपचारासाठी आणले. डॉक्टरांनी या मुलीशी संवाद साधून चौकशी केली असता सदर मुलीने केस खाल्ले असावे असा संशय डॉ. उषा गजभिये यांना आला. डॉक्टरांनी इतर सर्व तपासण्या करून लगेच तिच्या पोटावर शस्त्रक्रिया केली. यावेळी या बालिकेच्या पोटातून  केसांचा गोळा तिच्या पोटातून काढण्यात आला. 

झोपलेल्या चिमुरडीला राहत्या घरातून उचललं, तुळजापुरातून सुटका'; 5 जणांच्या टोळीचा असा झाला पर्दाफाश 

नक्की वाचा - झोपलेल्या चिमुरडीला राहत्या घरातून उचललं, तुळजापुरातून सुटका'; 5 जणांच्या टोळीचा असा झाला पर्दाफाश 

या बालिकेला गेल्या तीन-चार वर्षांपासून केस खाण्याचे व्यसन जडले होते आणि त्यातूनच ती घरी कुणाचे लक्ष नसताना संधी मिळेल तेव्हा केस खायची. आई वडिलांनी तिला याबाबत अनेकदा हटकले सुद्धा. मात्र तिचे केस खाणे सुरूच होते आणि यातून तिच्या पोटात केसांचा गोळा तयार झाला. आता या बालिकेची प्रकृती ठणठणीत आहे. केस खाणे, धागे खाणे, नखं खाणे हे मानसिक आजाराचे लक्षण असू शकते. वेळीच पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देऊन त्यावर वेळीच उपचार करावा, त्यांना मानसोपचारतज्ज्ञांकडे घेऊन जावं असं आवाहन डॉ गजभिये यांनी केलं आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com