जाहिरात

New Labour Law: कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! आता ओव्हरटाइमसाठी मिळणार 'डबल' पगार

New Labour Law 2026: नवीन कामगार कायद्यांतर्गत कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आता शिफ्ट संपल्यानंतर केलेल्या अतिरिक्त कामासाठी दुप्पट पगार मिळणार आहे.

New Labour Law: कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! आता ओव्हरटाइमसाठी मिळणार 'डबल' पगार

New Labour Law 2026 : ऑफिस किंवा फॅक्टरीमध्ये शिफ्ट संपल्यानंतरही काम करत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नवीन लेबर लॉ (New Labour Law) अंतर्गत सरकारने कर्मचाऱ्यांच्या बाजूने मोठा निर्णय घेतला आहे. आता कोणत्याही कर्मचाऱ्याने त्याच्या ठराविक वेळेपेक्षा जास्त काम केल्यास, कंपनीला त्याला 'डबल वेज' म्हणजेच सामान्य पगाराच्या दुप्पट दराने पैसे द्यावे लागणार आहेत.

ओव्हरटाइमचे गणित आता बदलले 

कंपन्यांकडून होणारे कर्मचाऱ्यांचे शोषण थांबवण्यासाठी ओव्हरटाइम मोजण्याच्या पद्धतीत मोठे बदल करण्यात आले आहेत. जर तुम्ही शिफ्टनंतर 15 ते 30 मिनिटे अतिरिक्त काम केले, तर तो 30 मिनिटांचा ओव्हरटाइम मानला जाईल. जर काम अर्ध्या तासापेक्षा जास्त असेल, तर तो पूर्ण 1 तासाचा ओव्हरटाइम मोजला जाईल. पूर्वी कंपन्या 1-2 तासांचे अतिरिक्त काम सहज दुर्लक्षित करत असत, परंतु आता प्रत्येक मिनिटाचा हिशोब ठेवावा लागणार आहे.

(नक्की वाचा-  Aurangpura Renamed: छत्रपती संभाजीनगरमधील औरंगपुराचं नाव बदललं; महापालिकेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर)

कामाचे तास आणि मर्यादा

सरकारने कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा विचार करून कामाच्या तासांची मर्यादाही निश्चित केली आहे. आठवड्याला एकूण 48 तास कामाची मर्यादा असेल. तुम्ही आठवड्यातून 4 दिवस काम करा किंवा 5 दिवस, 48 तासांपेक्षा जास्त कामासाठी ओव्हरटाइम अनिवार्य असेल. ओव्हरटाइम पकडूनही एका दिवसातील एकूण कामाची वेळ 12 तासांपेक्षा जास्त असू नये. एका तिमाहीत (3 महिने) जास्तीत जास्त 125 ते 144 तासांपर्यंतच ओव्हरटाइम करता येईल.

New Labour Law

'डबल' पगाराची गणना कशी होणार?

ओव्हरटाइमचा हा दुप्पट मोबदला कर्मचाऱ्याच्या मूळ पगार (Basic Salary) + महागाई भत्ता (DA) यांच्या आधारावर मोजला जाईल. कोणतेही कारण सांगून कंपनी ओव्हरटाइमचे पैसे नाकारू शकणार नाही. तसे केल्यास कंपनीवर भारी दंड आणि कायदेशीर कारवाई होऊ शकते.

(नक्की वाचा-  Pune News: लग्नासाठी बनला 'पोलीस', फ्लेक्स लावत केली चमकोगिरी अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला)

2 दिवसांत हिशोब पूर्ण करावा लागणार

 नवीन लेबर कोडमधील सर्वात मोठा दिलासा म्हणजे 'फुल अँड फायनल सेटलमेंट'. जर एखाद्या कर्मचाऱ्याने राजीनामा दिला किंवा त्याला कामावरून काढले, तर कंपनीला त्याची सर्व थकबाकी (ओव्हरटाइमसह) फक्त 2 वर्किंग डेज (कामाचे दिवस) मध्ये द्यावी लागेल.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com