जाहिरात

Cylinder Booking Rules: गॅस सिलिंडर बुकिंगचे नियम बदलले? केंद्र सरकारने परिपत्रक जारी करत स्पष्ट सांगितलं

New LPG Cylinder Booking Rules 2026: पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, एलपीजी सिलिंडर बुकिंगच्या जुन्या नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सध्याची बुकिंग व्यवस्था पूर्वीप्रमाणेच सुरू राहील.

Cylinder Booking Rules: गॅस सिलिंडर बुकिंगचे नियम बदलले? केंद्र सरकारने परिपत्रक जारी करत स्पष्ट सांगितलं

New LPG Cylinder Booking Rules : सोशल मीडियावर एलपीजी (LPG) सिलिंडर बुकिंगच्या नियमांबाबत सुरू असलेल्या चर्चांवर केंद्र सरकारने मोठा खुलासा केला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने (MoPNG) स्पष्ट केले आहे की, LPG रिफिल बुकिंगच्या कालमर्यादेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

काही रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात होता की, उज्ज्वला (PMUY) लाभार्थ्यांसाठी 45 दिवस, तर इतर ग्राहकांसाठी 25 ते 35 दिवसांचे अंतर अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, सरकारने या बातम्यांना 'अफवा' ठरवले आहे. गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगच्या नियमांबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, केंद्र सरकारने आज अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून सर्व शंकांचे निरसन केले आहे.

(नक्की वाचा-  Ashok Kharat: गणितात मठ्ठ, भाषांचीही बोंब, भोंदूबाबाचा दहावीची रिझल्ट आला समोर, नावंही बदललं!)

काय होत्या अफवा?

सोशल मीडियावरील पोस्ट्समध्ये असा दावा केला जात होता की, PMUY (उज्ज्वला) योजनेचा सिलिंडर 45 दिवसांनंतरच नवीन बुकिंग करता येईल, तर सिंगल सिलिंडर असलेल्या ग्राहकांसाठी बुकिंसाठी 25 दिवसांचे तर डबल सिलिंडर ग्राहक ग्राहकांसाठी 35 दिवसांचे अंतर करण्यात आले आहे.  मात्र, मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, "असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही आणि जुनेच नियम लागू राहतील."

(नक्की वाचा-  Alcohol Prices to Rise: मद्यप्रेमींच्या खिशाला कात्री! बिअर आणि दारुच्या किमती वाढणार? काय आहे कारण?)

सध्याचे अधिकृत नियम काय आहेत?

  • शहरी भाग (Urban Areas): 25 दिवस.
  • ग्रामीण भाग (Rural Areas): 45 दिवस.

हे नियम सर्व प्रकारच्या कनेक्शनसाठी (PMUY किंवा Non-PMUY) सारखेच आहेत.

देशात एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, असे आश्वासन सरकारने दिले आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे पुरवठा विस्कळीत होण्याच्या भीतीपोटी नागरिक 'पॅनिक बुकिंग' करत होते. यामुळे यंत्रणेवर ताण येत असल्याने, केवळ गरजेनुसारच सिलिंडर बुक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com