जाहिरात

UP News : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधूवर दु:खाचा डोंगर, बेपत्ता झालेल्या पतीचा संशयास्पद मृत्यू

लग्नाच्या पहिल्याच दिवशी नवरदेवाच्या मृत्यूने नववधूसह कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील फतेहपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बंजारिया गावात शुक्रवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली.

UP News : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधूवर दु:खाचा डोंगर, बेपत्ता झालेल्या पतीचा संशयास्पद मृत्यू

Uttar Pradesh News : लग्नानंतर सुखी संसाराची स्वप्न बघण्याआधीत नवविवाहितेच स्वप्नांचा चुराडा झाला आहे. लग्नाच्या पहिल्याच दिवशी नवरदेवाच्या मृत्यूने नववधूसह कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील फतेहपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बंजारिया गावात शुक्रवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळी पसरली आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, 22 वर्षीय अंकितचा विवाह रामनगरमधील हसनापूर गावातील सुधाशी 30 एप्रिल रोजी झाला होता. 1 मे रोजी नवरीला आपल्या सासरी आली. मात्र त्याच रात्री नवरदेव अचानक गूढ पद्धतीने बेपत्ता झाला.

(नक्की वाचा- Ladki Bahin Yojna: 'लाडकी बहीण' योजनेचा सामाजिक न्याय विभागाला फटका; शेकडो कोटींचा निधी वळवला)

कुटुंबीयांनी रात्रभर अंकितचा शोध घेतला पण त्यांना कोणताही पत्ता लागला नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह गावाबाहेर असलेल्या 11000 व्होल्टच्या हाय टेन्शन लाईनच्या खांबांच्या वायरला अडकलेला आढळला. विजेचा धक्का बसल्याने अंकितचा मृत्यू झाला. 

(नक्की वाचा-  Crime News : पैशांची हाव, वकिलाने थेट न्यायालय आणि पोलिसांनाच फसवलं; काय आहे प्रकरण?)

घटनेची माहिती मिळताच फतेहपूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वीज विभागाच्या मदतीने तार कापली आणि मृतदेह खाली उतरवला. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. अंकितच्या काकांनी सांगितले की, तो संध्याकाळी 6 वाजेपर्यंत घरी होता, नंतर कुठेतरी गेला. आम्ही रात्रभर त्याला शोधले पण तो सापडला नाही. सकाळी गावाबाहेर गेलो तेव्हा तो विजेच्या खांबावर तारेला लटकलेला दिसला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आत्महत्या, अपघात की इतर काही कारण, या सर्व पैलूंचा तपास केला जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: