जाहिरात
Story ProgressBack

हरयाणात आता ओबीसी मुख्यमंत्री, कोण आहेत भाजपचे नायबसिंह सैनी?

Read Time: 3 min
हरयाणात आता ओबीसी मुख्यमंत्री, कोण आहेत भाजपचे नायबसिंह सैनी?
दिल्ली:

हरयाणात ओबीसी (OBC) समुदयाचे नेते नायबसिंह सैनी (Nayab Singh Saini) यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडलेली आहे.  मनोहरलाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांनी आज सकाळी राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे मंत्रीमंडळाचा राजीनामा असतो. त्यामुळे नवा मुख्यमंत्री, नवं मंत्रीमंडळ हरयणात सत्तेवर येतं आहे. विशेष म्हणजे आधी चौटालांची जेजेपी आणि भाजपा यांचं युती सरकार सत्तेवर होतं. पण लोकसभेच्या जागा वाटपावरुन दोघांमध्ये बिनसलं आणि भाजपानं सत्तेचा स्वतंत्र डाव टाकण्याचं ठरवलं. त्यामुळे खट्टर हे आता लोकसभेच्या रिंगणात असतील तर हरयाणाची (Haryana) सूत्रं ही नायबसिंह सैनी यांच्याकडे. 

कोण आहेत नायबसिंह सैनी?
नायबसिंह सैनी हे सध्या कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. ते भाजपचे प्रदेशाध्यक्षही आहेत. आतापर्यंत हरयाणात भाजपा नॉन जाट असं राजकारण करत आलेला आहे. त्यामुळे खट्टर मुख्यमंत्री तर प्रदेशाध्यक्षपदी जाट किंवा ओबीसी नेता असं सूत्रं ठरलेलं होतं. आता ते उलटं होताना दिसतं आहे. नायबसिंह सैनी हे पंजाबी खत्री समाजाचे आहेत. त्यामुळे आता ओबीसी मुख्यमंत्री हरयाणात असेल. त्याचा फायदा लोकसभेला भाजपाला होईल असा अंदाज आहे. नायबसिंह सैनी हे मनोहरलाल खट्टर यांच्या जवळचे मानले जातात. सैनी पाचच महिन्यांपूर्वी प्रदेशाध्यक्ष बनवले गेले होते. याचाच अर्थ अवघ्या पाच महिन्याच्या कालावधीतच ते मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलेले आहेत. 

मंत्रीही राहिले नायबसिंह सैनी
नायबसिंह सैनी आता जरी खासदार असले तरी सुद्धा ते 2014 मध्ये अंबाला जिल्ह्यातल्या नारायणगड सीटवरुन विधानसभेची निवडणूक लढले. 24 हजार मतांनी त्यांचा विजय झाला. नंतर खट्टर यांच्या मंत्रीमंडळात ते मंत्रीही झाले. त्यानंतर 2019 मध्ये पक्षानं त्यांना लोकसभेची निवडणूक लढवायला सांगितली, त्यातही त्यांना यश आलं. सैनींना 6 लाख 88 हजार, 629 मतं मिळाली. सैनींच्या काँग्रेस प्रतिस्पर्ध्याला त्यांच्या निम्मीही मतं मिळाली नाहीत. 

वेगानं मुख्यमंत्री झाले सैनी?
चौटालांच्या जेजेपीसोबत जागा वाटपावरुन मतभेद झाल्यानंतर भाजपात सूत्रे वेगानं हलली. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना राजीनामा द्यायला सांगितलं गेलं. ते राज्यपालांकडे गेले तोपर्यंत दिल्लीहून दोन पर्यवेक्षक अर्जून मुंडा आणि तरुण चुग हरयाणात पोहोचले. पुन्हा खट्टर यांनाच मुख्यमंत्री केलं जाईल अशीही जोरदार चर्चा रंगली. केंद्रीय पर्यवेक्षक आल्यानंतर भाजपच्या आमदारांची बैठक बोलवली गेली. त्यात नायबसिंह सैनी यांच्या नावावर मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब केलं गेलं. जशा वेगानं सैनींना मुख्यमंत्री केलं गेलं, त्याच वेगानं सैनी हरयाणाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचल्याचं दिसतं आहे. 2014 ला ते आमदार झाले, नंतर मंत्री झाले, नंतर खासदार झाले आणि आता थेट मुख्यमंत्री. 

जातीचं समिकरण साधणार सैनी

नायबसिंह सैनी यांना मुख्यमंत्री करताना जातीय समिकरण लक्षात ठेवल्याचं दिसतं आहे. अलिकडे राहुल गांधी ठिकठिकाणी ओबीसीचं कार्ड वापरत आहेत. त्याला भेदण्यासाठी भाजपनं हरयाणात ओबीसी मुख्यमंत्री दिल्याचं दिसतं आहे. हरयाणात ओबीसींचा दबदबा आहे. जाटांची संख्या जास्त आहे. सैनी खत्री समाजाचे असले तरी ज्या कुरुक्षेत्रमधून ते खासदार झालेले आहेत तो जाट बहुल आहे. जाटांमध्ये पॉप्युलर असलेल्या नेत्याला मुख्यमंत्री केल्यामुळे हरयाणात जातीय समिकरण साधण्यात भाजपला यश आल्याचं दिसतं आहे.

डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination