चारधाम यात्रेसाठी भाविक मोठ्या प्रमाणात उत्तराखंडकडे प्रयाण करत आहेत. त्यामुळे उत्तराखंडमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला भेटत आहे. मात्र जर तुम्हीही चारधाम यात्रेचे नियोजन करत असाल तर थोडं थांबा. या यात्रेला जाण्यापूर्वी काही गोष्टी करणे हे अनिवार्य आहेत. त्या तुम्ही केल्या नाहीत तर या यात्रेत तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यात्रेला जाण्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी https://registrationandtouristcare.uk.gov.in/
या संकेतस्थळावर जावे लागेल. तिथे सध्या चारधाम यात्रेची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. ती करणे प्रत्येकाला अनिवार्य आहे. उत्तराखंडच्या मुख्य सचिवांनी याबाबत सर्वांना सुचित केले आहे.
चारधाम यात्रा नुकतीच सुरू झाली आहे. त्यानंतर देशभरातून भाविक मोठ्या संख्येने उत्तराखंडमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे मोठ्या चारधाममध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. गर्दी मुळे प्रशासनाला वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागले आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता दर्शनाची प्रक्रीया सुरळीत पणे पार पडावी यासाठी उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रेसाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. महत्वाचे म्हणजे ज्या तारखेसाठी संबंधित धामांच्या ठिकाणी दर्शनाची नोंदणी केली असेल त्या तारखेलाच दर्शनाची परवानगी असेल.
वृद्ध आणि अगोदरपासूनच वैद्यकीय स्थिती अस्तित्वात असलेल्या भाविकांनी त्यांची यात्रा सुरू करण्यापूर्वी स्वतःची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. तसेच उत्तराखंड सरकारच्या वैद्यकीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने जारी केलेल्या https://health.uk.gov.in/pages/display/140-char-dham-yatra-health-advisory या लिंकवरील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असेही उत्तराखंड प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world