Operation Sindoor : भारताची कारवाई फक्त दहशतवाद आणि दहशतवाद्यांविरोधात : परराष्ट्र सचिव

Operation Sindoor : पाकिस्तानचा या हल्ल्याच्या कटात सहभाग असल्याचे देखील पुरावे आहेत. पहलगाममधील हल्ल्यामुळे देशभरात आक्रोश पाहिला गेला, असंही विक्रम मिसरी यांनी म्हटलं.  

जाहिरात
Read Time: 2 mins

Operation Sindoor : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. भारताने केलेल्या लष्करी कारवाईत पाकिस्तानातील जवळपास 70 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती आहे. याबाबत भारतील संरक्षण मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत, याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांच्यासोबत कर्नल सोफिया कुरैशी आणि विंग कमांडर ग्योमिका सिंह या सहभागी होत्या. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला भारतावर आजवर झालेल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यांची माहिती देणार व्हिडीओ दाखवण्यात आला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला पहलगाम हल्ल्याचा उल्लेख केला. विक्रम मिस्त्री यांनी म्हटलं की, पहलगाम दहशतवादी हल्ला अमानूष होता. या हल्ल्यात 26 निष्पाप लोकांचा बळी गेला. ज्यामध्ये नेपाळचा एक नागरिक देखील होता. 26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारतात झालेला हा सर्वाधिक जीवितहानीचा दहशतवादी हल्ला ठरला.

कुटुंबासमोरच इतर सदस्यांना मारलं गेलं. जिवंत सोडलेल्या लोकांना हल्ला कसा जाला हे जाऊन सांगण्यास सांगितलं होतं. जम्मू काश्मीरमधील पर्यटन संपवण्यासाठी हा कट होता. जम्मू काश्मीरचा विकास रोखण्यासाठीचा हा हल्ला होता. जम्मू काश्मीरमधील शांती भंग करण्यासाठी हा कट रचण्यात आला होता, असं परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी म्हटलं.

(नक्की वाचा-  Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'चं 26/11 हल्ला कनेक्शन; दहशतवादी कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डाही उद्ध्वस्त)

जम्मू-काश्मीरच्या विकासात अडथळा आणून तेथील परिस्थिती दहशतवादाच्या पोषणासाठी योग्य राहावी, अशी योजना होती. या हल्ल्याच्या पद्धतीतून भारतात धार्मिक तेढ वाढवण्याचा हेतूही स्पष्ट होतो. पण भारत सरकार आणि जनतेने हा प्रयत्न निष्फळ ठरवला.

Advertisement

पहलगाम हल्ल्याच्या तपासात पाकिस्तानचे संबंध समोर आले आहेत. साक्षीदार आणि इतर तपास यंत्रणांच्या आधारे हल्लेखोरांची ओळखही पटली आहे. पाकिस्तानचा या हल्ल्याच्या कटात सहभाग असल्याचे देखील पुरावे आहेत. पहलगाममधील हल्ल्यामुळे देशभरात आक्रोश पाहिला गेला, असंही विक्रम मिसरी यांनी म्हटलं.  

भारताने या हल्ल्याननंतर पाकिस्तानसोबतच्या संबंधांबाबत कठोर पावले उचलले. मात्र त्यानंतरही पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. भारतावर यापुढेही दहशतवादी हल्ले होऊ शकतात. त्यामुळे भारताला कठोर पाऊल उचलणे गरजेचं होते, असं विक्रम मिसरी यांनी म्हटलं.

Advertisement

(नक्की वाचा-  Operation Sindoor : पाकिस्तानात 100 किमी आत घुसून बदला! हल्ल्यासाठी 'ती' 9 ठिकाणे का निवडली?)

विक्रम मिसरी यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

  • पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा हात उघड झाला आहे, त्याची रूपरेषा पाकिस्तानच्या ट्रॅक रेकॉर्डशी जुळते. 
  • पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनले आहे. दहशतवादी येथे लपण्यासाठी येतात.
  • 15 दिवस उलटूनही पाकिस्तानने कोणतीही कारवाई केलेली नाही.
  • आज भारताने सीमापार दहशतवादी हल्ले रोखण्याचा आणि त्यांना प्रत्युत्तर देण्याचा आपला अधिकार वापरला आहे.
  • आम्ही दहशतवादाविरुद्ध कारवाई केली असून आमची कृती चिथावणीखोर नाही.
  • आम्हाला गुप्तचर माहिती होती की आणखी हल्ले होऊ शकतात.