Operation Sindoor : पाकिस्तानात 100 किमी आत घुसून बदला! हल्ल्यासाठी 'ती' 9 ठिकाणे का निवडली?

India Attack : भारतीय हवाई दलाने (IAF) 7 मे रोजी पहाटे PoK आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले केले. भारताविरुद्ध हल्ले घडवून आणणाऱ्या दहशतवादी तळांचा शोध घेऊन त्यांच्यावर लक्ष्यभेदी कारवाई केली गेली. 

जाहिरात
Read Time: 3 mins

Operation Sindoor : भारतीय सशस्त्र दलांनी PoK आणि पाकिस्तानमधील 9 ते 10 वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे डझनभर दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे. सीमेपासून 100 किमी आतपर्यंतच्या ठिकाणं लक्ष्य करण्यात आली आहेत. डझनभर दहशतवादी ठिकाणांची ओळख पटवून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनांनुसार कारवाई करण्यात आली आहे.  भारतीय हवाई दलाने (IAF) 7 मे रोजी पहाटे PoK आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले केले. भारताविरुद्ध हल्ले घडवून आणणाऱ्या दहशतवादी तळांचा शोध घेऊन त्यांच्यावर लक्ष्यभेदी कारवाई केली गेली. 

हल्ला झालेली मुख्य दहशतवादी ठिकाणं

बहावलपूर- आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे 100 किमी आत आहे. जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी संघटनेचं मुख्यालय आहे. पाकिस्तानच्या दक्षिण पंजाबमधील बहावलपूरला भारताने सर्वात मोठे लक्ष्य बनवले. कारण हे शहर मसूद अझहरच्या नेतृत्वाखालील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय म्हणून सर्वत्र ओळखले जाते. या दहशतवादी संघटनेने 2001 च्या संसदेवरील हल्ला आणि 2019 च्या पुलवामा हल्ला अशा अनेक  हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे किंवा त्यांच्याशी संबंधित आहेत.

मुरीदके – मुरीदके हे लाहोरच्या उत्तरेस सुमारे 40 किलोमीटर अंतरावर आहे. हे दीर्घकाळापासून लष्कर-ए-तोयबा आणि त्याचीच शाखा असलेल्या जमात-उद-दावाचे केंद्र आहे. 26/11 मुंबई हल्ल्याचे दहशतवादी याच ठिकाणहून ट्रेनिंग घेऊन आले होते. 200 एकरांवर पसरलेल्या, मुरीदकेच्या दहशतवाद्यांच्या बालेकिल्ल्यात प्रशिक्षण क्षेत्रे, शिकवण केंद्रे आणि इतर पायाभूत सुविधा आहेत. म्हणून भारताने मुरीदकेला लक्ष्य केलं. 

कोटली LeT कॅम्प – नियंत्रणरेषेपासून 15 किमी आत, राजौरी समोर आहे. कोटली हे पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे. आत्मघाती हल्लेखोरांचे हे एक प्रमुख प्रशिक्षण केंद्र म्हणून वारंवार पुढे आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोटलीमध्ये एकाच वेळी 50 हून अधिक दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याची क्षमता आहे.

Advertisement

(नक्की वाचा- Operation Sindoor: भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानातील 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त; वाचा 10 मोठे अपडेट्स)

गुलपूर – नियंत्रणरेषेपासून (LoC) 35 किमी आत, पूंछ-राजौरी भागात आहे. 20 एप्रिल 2023 रोजी पूंछमधील हल्ला व जून 24 रोजी यात्रेकरूंच्या बसवरील हल्ल्याची मुळे इथेच आहेत. 2023 आणि 2024 मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी आणि पूंछ येथे झालेल्या कारवायांसाठी गुलपूरचा वापर वारंवार फॉरवर्ड लाँचपॅड म्हणून करण्यात आला होता असे मानले जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणाचा वापर त्या भागातील भारतीय सैन्यावर आणि नागरी वस्तींवर हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांसाठी स्टेजिंग पोस्ट म्हणून केला जात होता.

सवाई LeT कॅम्प – PoJK मधील टंगधार सेक्टरमध्ये, 30 किमी आत आहे. सोनमर्गमध्ये 20 ऑक्टोबर 2024, गुलमर्गमध्ये 24 ऑक्टोबर 2024, पहलगामध्ये  22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या हल्ल्यांचा संबंधांमुळे इथे हल्ला करण्यात आला.

Advertisement

बिलाल कॅम्प – जैश-ए-मोहम्मदचे हे लॉन्चपॅड आहे.

(नक्की वाचा-  Pahalgam Terror Attack : घुसून मारलं, दहशतवाद्यांच्या तळांवर भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर' फत्ते)

बर्नाला कॅम्प – नियंत्रणरेषेपासून 10 किमी आत राजौरी समोर आहे. आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेजवळ असल्याने हे घुसखोरीचे प्रवेशद्वार मानले जातात.

सरजल कॅम्प – JeM चा कॅम्प आंतरराष्ट्रीय सीमेपासून 8 किमी आत सांबा-कठुआ समोर हा कॅम्प आहे. आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेजवळ असल्याने हे घुसखोरीचे प्रवेशद्वार मानले जातात.

महमूना कॅम्प – आंतरराष्ट्रीय सीमेपासून 15 किमी आत, सियालकोटजवळ हे ठिकाण आहे. हिजबुल मुजाहिद्दीन (HM) चा प्रशिक्षण कॅम्प आहे. भारतीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की या भागातून दहशतवाद्यांना अजूनही सीमेपलीकडून प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले जात आहे.

Advertisement