जाहिरात

Operation Sindoor News: पाकिस्तानची खुमखुमी.. बॉर्डरवर सैन्याची जमवाजमव; संरक्षण मंत्रालयाचा मोठा खुलासा

Ministry Of Defence Press Conference: परराष्ट्र मंत्रालयाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी कर्नल सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग यांच्यासह विक्रम मिस्त्री यांनी महत्त्वाची अपडेट दिली. 

Operation Sindoor News: पाकिस्तानची खुमखुमी.. बॉर्डरवर सैन्याची जमवाजमव; संरक्षण मंत्रालयाचा मोठा खुलासा

Operation Sindoor India Vs Pak News: भारतीय लष्कराने केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईनंतर पाकिस्तानकडून हल्ले सुरु आहेत. गेल्या तीन दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये हल्ले प्रतिहल्ले  सुरु असून पाकिस्तानच्या कुरघोड्या चांगल्याच वाढल्या आहेत. याबाबतच आज भारतीय संरक्षण दल आणि परराष्ट्र मंत्रालयाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी कर्नल सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग यांच्यासह विक्रम मिस्त्री यांनी महत्त्वाची अपडेट दिली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय म्हणाल्या कर्नल सोफिया कुरेशी?

'पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात कुरघोड्या  सुरु झाल्या आहेत. पाकिस्तानने उधमपूर पठाणकोट भूज येथे नुकसान करण्यात प्रयत्न केले. तसेच श्रीनगर अनंतापूर येथील एअर बेस आणि आरोग्य केंद्रावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय हवाई मार्गाचा पाकिस्तानने दुरूपयोग केला. तसेच कुपवाडा राजौरी पूंछ येथे तोफांनी हल्ला केला. पण भारतानं पाकिस्तानी सैन्याला धडा शिकवला,' असं सोफिया कुरेशी म्हणाल्या. 

तसेच 'पाकिस्तान सैन्याने पश्चिम विभागात हल्ले सुरु केले आहेत. त्यांनी भारतीय सैन्याला टार्गेट केले आहे. गोळीबार सुरु आहे. आंतराराष्ट्रीय सेना, एलओसीवर  सतत गोळीबार सुरु आहे ज्याचा भारतीय सैन्याने प्रतिकार केला. पाकिस्तानने हायस्पीड मिसाईलही पंजाबच्या हवाई अड्ड्यावर सुरु केले. निंदनीय म्हणजे नागरिकांवरही हल्ले करण्याचा प्रयत्न आहे. पाकिस्तानकडून मुद्दाम निशाणे केल्यानंतरही भारतीय सैन्याने मात्र त्यांच्या उपकरणांना टार्गेट केले जात आहे. या कारवाईत भारताने कमीत कमी नुकसान होईल याकडे लक्ष दिले, असेही त्यांनी अधोरेखित केले.

ट्रेंडिंग बातमी - Ratnagiri news: पाकिस्तान जिंदाबादचे स्टेटस ठेवणाऱ्या तरुणाला चोप, रत्नागिरीतली घटना

दरम्यान, 'पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय हवाई उड्डाणांचाही गैरवापर केला आहे. पाकिस्तानने चुकीची माहितीचा आधार घेत काही हवाई अड्डे तसेच शस्त्रसाठा नष्ट केल्याचाही खोटा दावा केला आहे. भारतीय सैन्याने प्रभावीपणे उत्तर देत पाकिस्तानी सेनेला नामोहरण केले. आत्तापर्यंत भारताकडून पाकिस्तानच्या प्रत्येक कृतीला चोख आणि योग्यपणे उत्तर देण्यात आले आहे,' असेही यावेळी सांगण्यात आले. 

नक्की वाचा - India Pakistan News : पाकिस्तानला मिळालं IMF कडून कर्ज? तब्बल 1 अब्ज डॉलर मिळाल्याचा पाकिस्तानच्या पीएमचा दावा  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com