Islampur Rename as Ishwarpur: सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव बदलून आता 'ईश्वरपूर' असे करण्यात आले आहे. राज्य सरकारने केलेल्या नामकरण प्रस्तावाला केंद्र सरकारने अखेर मान्यता दिली आहे. त्यामुळे आता इस्लामपूर शहर 'ईश्वरपूर' या नावाने ओळखले जाईल.
सांगली जिल्ह्यातील राजकारणासाठी महत्त्वाचे असलेले इस्लामपूर शहर आता इतिहासजमा झाले आहे. महायुती सरकारने या शहराचे नामकरण करून ते ईश्वरपूर केले आहे.
(नक्की वाचा- Satara News: "माझ्यावर 4 वेळा बलात्कार केला..." पोलीस अधिकाऱ्यावर आरोप करत डॉक्टर तरुणीची आत्महत्या)
नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी इस्लामपूरचे नाव 'ईश्वरपूर' करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. राज्य सरकारच्या या प्रस्तावाला केंद्र सरकारने आता मान्यता दिली आहे. यामुळे सांगली जिल्ह्यातील हे शहर अधिकृतपणे 'ईश्वरपूर' या नावाने ओळखले जाणार आहे.
(नक्की वाचा- Pune News: पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नाव बदललं, महसूल विभागाचा ऐतिहासिक निर्णय)
महायुती सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील अनेक शहरे आणि जिल्ह्यांच्या नामांतराची प्रक्रिया सुरू झाली होती. यामध्ये इस्लामपूरचे नाव बदलण्याची मागणी देखील जोर धरू लागली होती, त्यानुसार महायुती सरकारने ही प्रक्रिया पूर्ण केली. महायुती सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आता राज्यातील नामांतराच्या यादीत आणखी एका शहराची भर पडली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world