पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सर्वात भयानक व्हिडिओ आता समोर आला आहे. हा व्हिडिओ त्या दिवशी तेथे फिरण्यासाठी गेलेल्या एका पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या व्हिडिओमध्ये गोळी लागताच लोकं खाली पडताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 22 एप्रिल रोजी जेव्हा पर्यटक 'मिनी स्वित्झर्लंड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन खोऱ्यात सुट्ट्यांचा आनंद घेत होते, तेव्हा दहशतवाद्यांनी गोळीबार करून 26 जणांची हत्या केली होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हा व्हिडिओ आतापर्यंतचा सर्वात भयानक आणि अंगावर काटा आणणारा व्हिडीओ आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबाराचे अनेक व्हिडिओ यापूर्वीही समोर आले आहेत. पण आता जो व्हिडिओ समोर आला आहे, तो आतापर्यंतचा सर्वात भयानक असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबाराने पर्यटक जमिनीवर कोसळताना दिसत आहेत. शिवाय गोळाबार होतानाचा आवाज ही त्यात स्पष्ट पणे ऐकू येत आहे. लोक पळत आहेत. काही पर्यटक पळतानाही त्या व्हिडीओत दिसत आहेत.
काश्मीरच्या 'मिनी स्वित्झर्लंड'मध्ये गोळीबार सुरू झाल्यावर लोक धावताना दिसत आहेत. पहलगाम हल्ल्याचे एकामागून एक व्हिडीओ आता समोर येत आहेत. 28 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये बैसरन खोऱ्यातील मैदानात पर्यटकांमध्ये दहशतवादी येऊन गोळीबार करताना दिसत आहेत. ज्यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, त्यावेळी तेथे असलेले लोक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे धावताना दिसत आहेत. त्यांच्या ओरडण्याचाही आवाज ही त्यात दिसत आहे. काय सुरू आहे हे क्षणभर समजत नाही. पणनंतर त्याचे गांभिर्य यात दिसत आहे.
ट्रेंडिंग बातमी - Pahalgam attack: पाकिस्तानी 'जोकर' बरळले, आफ्रिदी- भुट्टोला ओवैसींनी धुधू धुतले!
या अंधाधुंद गोळीबारात 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता. दहशतवाद्यांनी 22 एप्रिल रोजी पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात पर्यटकांवर अंदाधुंद गोळ्या झाडल्या होत्या. या भ्याड हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. अनेक जण जखमी झाले होते. मृतांमध्ये एका नेपाळी नागरिकाचाही समावेश आहे. या हल्ल्याची जबाबदारी 'द रेझिस्टन्स फ्रंट'ने घेतली होती. जी पाकिस्तानस्थित बंदी घालण्यात आलेल्या लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधीत आहे.