जाहिरात

India VS Pakistan : पाकिस्तानचं शेपूट वाकडंच; सलग 4 दिवस LOC वर शस्त्रसंधीचं उल्लंघन

भारतील लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानी सैन्याने सलग चौथ्या रात्रीही शस्त्रसंधीचे उल्लंघन करत विनाकारण गोळीबार केला.

India VS Pakistan : पाकिस्तानचं शेपूट वाकडंच; सलग 4 दिवस LOC वर शस्त्रसंधीचं उल्लंघन
This was the first time that the Pakistan Army violated the ceasefire in the Poonch sector (File photo)

Pakistan Violates Ceasefire : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेही पाकिस्तान दणका दिला आहे. भारताने  1960 मधील सिंधू जल करार स्थगित करत राजनैतिक संबंध कमी करण्यासंबंधी अनेक निर्णय घेतले. यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने सीमाभागात शस्त्रसंधीचं उल्लंघन करत मध्यरात्री गोळीबार केला आहे. सलग चार दिवसांपासून अधून-मधून पाकिस्तानकडून हा गोळीबार केला जात आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पाकिस्तानी लष्कराच्या पोस्ट कुपवाडा आणि पुंछ जिल्ह्यांच्या समोरच्या भागात नियंत्रण रेषेवर विनाकारण लघुशस्त्र गोळीबार सुरू केला आहे. भारतीय जवानांनी देखील या हल्ल्याला तात्काळ आणि प्रभावी प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानकडून सलग चार दिवस शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. 

(नक्की वाचा-  Pahalgam attack: युद्ध झालं तर 'पाक'ड्यांचा फडशा किती दिवसात? कुणाची सैन्य ताकद किती?)

भारतील लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानी सैन्याने सलग चौथ्या रात्रीही शस्त्रसंधीचे उल्लंघन करत विनाकारण गोळीबार केला. 27-28 एप्रिलच्या रात्री, कुपवाडा आणि पूंछ जिल्ह्यांसमोरील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांनी लहान शस्त्रांनी गोळीबार सुरू केला. भारतीय लष्कराने देखील पाकिस्तानच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. 

गेल्या मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जण ठार झाल्यानंतर भारतीय आणि पाकिस्तानी सैन्यात गोळीबार सुरू झाला. पुलवामा घटनेनंतर जम्मू आणि काश्मीरमधील सर्वात भीषण दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाशी संबंधित दहशतवादी गटाची भूमिका समोर आल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध आणखी बिघडले आहेत.

(नक्की वाचा- Pahalgam attack: 'भारताने पाकिस्तानचं पाणी बंद केल्याचा दावा खोटा' मोठ्या नेत्याचा मोठा आरोप, भाजपचं टेन्शन वाढणार?)

भारताकडून पाकिस्तानविरोधात कडक पावले

पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने बुधवारी 1960 मधील सिंधू जल करार स्थगित केला. पाकिस्तानसोबतचे राजनैतिक संबंध कमी करण्याची घोषणा केली. भारताने सिंधु पाणी करार स्थगित करणे, पाकिस्तानी नागरिकांसाठी भारतीय व्हिसा बंद, पाकिस्तानी दुतावासांना भारत सोडण्याचे आदेश, अटारी वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद राहणार, भारतातील पाकिस्तानी उच्चायोग बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: