जाहिरात

पाकिस्तानचा LOC वर गोळीबार; भारताच्या प्रत्युत्तरात अनेक पाकिस्तानी सैनिक ठार : सूत्र

Operation Sindoor : भारतील सैन्याने बुधवारी 7 मे रोजी रात्री उशीरा पाकिस्तानाताली दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला चढवला. या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये 62 दहशतवादी मारले गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

पाकिस्तानचा LOC वर गोळीबार; भारताच्या प्रत्युत्तरात अनेक पाकिस्तानी सैनिक ठार : सूत्र

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. या हल्ल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने LOC वर गोळीबार सुरु केला. भारताने देखील पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईत अनेक पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. तर अनेक पाकिस्तानी सैनिक जखमीही झाले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीर भागातील नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर अंदाधुंद गोळीबार आणि तोफांचा मारा केला. ज्यामध्ये 3 नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर सात जण जखमी झाले, अशीही माहिती लष्कराने दिली आहे. 

(नक्की वाचा-  Operation Sindoor : पाकिस्तानात 100 किमी आत घुसून बदला! हल्ल्यासाठी 'ती' 9 ठिकाणे का निवडली?)

ऑपरेशन सिंदूर'मध्ये 62 दहशतवाद्यांचा मारले

भारतील सैन्याने बुधवारी 7 मे रोजी रात्री उशीरा पाकिस्तानाताली दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला चढवला. या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये 62 दहशतवादी मारले गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर ही कारवाई केली आहे. 1971 च्या युद्धानंतर भारताने पहिल्यांदाच पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशनमध्ये लष्कर, नौदल आणि हवाई दलाने संयुक्त हल्ला केला.

भारताने हल्ला केलेली दहशतवादी ठिकाणे

1. बहावलपूर- आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे 100 किमी आत आहे. जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी संघटनेचं मुख्यालय आहे.

2. मुरीदके – सीमेलगत, सांबासमोर सुमारे 30 किमीवर लष्कर-ए-तय्यबा (LeT) चा तळ आहे. 26/11 मुंबई हल्ल्याचे दहशतवादी याच ठिकाणहून ट्रेनिंग घेऊन आले होते.

3. गुलपूर – नियंत्रणरेषेपासून (LoC) 35 किमी आत, पूंछ-राजौरी भागात आहे. 20 एप्रिल 2023 रोजी पूंछमधील हल्ला व जून 24 रोजी यात्रेकरूंच्या बसवरील हल्ल्याची मुळे इथे आहेत.

4. सवाई LeT कॅम्प – PoJK मधील टंगधार सेक्टरमध्ये, 30 किमी आत आहे. सोनमर्गमध्ये 20 ऑक्टोबर 2024, गुलमर्गमध्ये 24 ऑक्टोबर 2024, पहलगामध्ये  22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या हल्ल्यांचा संबंधांमुळे इथे हल्ला करण्यात आला. 

(नक्की वाचा- Operation Sindoor: भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानातील 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त; वाचा 10 मोठे अपडेट्स)

5. बिलाल कॅम्प – जैश-ए-मोहम्मदचे हे लॉन्चपॅड आहे.

6. कोटली LeT कॅम्प – नियंत्रणरेषेपासून 15 किमी आत, राजौरी समोर आहे. LeT चा आत्मघातकी तळ असून सुमारे 50 दहशतवाद्यांची क्षमता आहे.

7. बर्नाळा कॅम्प – नियंत्रणरेषेपासून 10 किमी आत राजौरी समोर आहे.

8. सरजल कॅम्प – JeM चा कॅम्प आंतरराष्ट्रीय सीमेपासून 8 किमी आत सांबा-कठुआ समोर हा कॅम्प आहे.

9. महमूना कॅम्प – आंतरराष्ट्रीय सीमेपासून 15 किमी आत, सियालकोटजवळ हे ठिकाण आहे. हिजबुल मुजाहिद्दीन (HM) चा प्रशिक्षण कॅम्प आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com