PAN Card Rules: बँकिंग, टॅक्स फाइलिंग, गुंतवणूक आणि व्यवसायाशी संबंधित प्रत्येक मोठ्या आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्ड (PAN Card) हे एक अतिशय महत्त्वाचे कागदपत्र मानले जाते. पण पॅन कार्ड तयार करण्याच्या प्रक्रियेत आता मोठा बदल होणार आहे. 1 एप्रिलपासून केवळ आधार कार्डच्या आधारे पॅन कार्ड तयार करणं शक्य होणार नाही. नवीन नियमांनुसार आता पॅन कार्डसाठी अर्ज करताना काही अतिरिक्त कागदपत्रांचीही आवश्यकता भासणार आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही 1 एप्रिलनंतर नवीन पॅन कार्ड बनवण्याची योजना आखत असाल तर या बदलांबाबत माहिती जाणून घेणे गरजेचे आहे.
पॅन कार्ड तयार करण्यासाठी आधार कार्डव्यतिरिक्त ही कागदपत्रंही आवश्यक
1 एप्रिलपासून पॅन कार्डकरिता अर्ज करण्याच्या नियमात बदल होत आहेत. जर तुम्ही 31 मार्चपर्यंत अर्ज केला तर केवळ आधार कार्डच्या आधारे पॅन कार्ड तयार होऊ शकते. पण 1 एप्रिलपासून पॅन कार्डसाठी अर्ज करताना तुम्हाला आधार कार्डसोबत अन्य काही कागदपत्रंही जमा करावी लागतील. या कागदपत्रांमध्ये जन्म दाखला (Birth Certificate), मतदार ओळखपत्र (Voter ID), पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मॅट्रिकचे प्रमाणपत्र किंवा मॅजिस्ट्रेटने जारी केलेले प्रतिज्ञापत्र (Affidavit) यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त पॅन कार्डवर तुमचे नाव पूर्णपणे आधार कार्डवर नोंदवलेल्या नावाप्रमाणेच असणे अनिवार्य असेल.
(नक्की वाचा: Income Tax Rules 2026: 1 एप्रिलपासून बदलणार इनकम टॅक्सचे गणित, Old Or New Tax Regime; तुमच्यासाठी काय ठरेल फायदेशीर?)
IMPORTANT UPDATE!!
— CSCeGov (@CSCegov_) March 17, 2026
PAN Application Rules Changing From 1st April 2026.
Apply Now Using Aadhaar Only Till 31st March 2026.
महत्वपूर्ण अपडेट!!
PAN बनवाने का अच्छा मौका 31 मार्च 2026 तक सिर्फ आधार से PAN बनवाएं.
For any queries, write us at abhirendra.pal@csc.gov.in… pic.twitter.com/JdpWQkR498
पॅन कार्ड बनवण्याचे जुने फॉर्म बंद होणार
पॅन कार्ड तयार करण्यासाठी सध्या जे फॉर्म वापरले जात आहेत, ते 1 एप्रिलपासून बंद होतील. सरकार नवीन पॅन अर्ज फॉर्म (New PAN Application Form) जारी करणार आहे. 1 एप्रिल 2026 नंतर जुन्या फॉर्मद्वारे नवीन पॅन कार्ड बनवता येणार नाही किंवा जुन्या पॅन कार्डमध्ये कोणतीही सुधारणा (PAN Card Correction) करता येणार नाही. अशा स्थितीत जर तुम्हाला नवीन अर्ज करायचा असेल किंवा जुन्या कार्डमध्ये काही बदल (PAN Card Update) करायचा असेल तर तुम्हाला नवीन फॉरमॅटचाच वापर करावा लागेल.
April 1 Rules Change: तुमच्या एका चुकीमुळे लागू शकतो मोठा दंड; 1 एप्रिलपूर्वी जाणून घ्या 5 नवीन नियम
पॅनकार्डवरील नावाबाबत मोठी अपडेट1 एप्रिलपासून पॅन कार्डमधील नावाबाबतचा नियमही बदलणार आहे. आता नवीन पॅन कार्डवर तेच नाव असणे आवश्यक आहे जे आधार कार्डवर नोंदवलेले आहे. त्यामुळे जर तुमच्या आधार कार्डवरील नावात काही चूक असेल तर ती त्वरित अपडेट करून घ्या.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world