जाहिरात
This Article is From Apr 15, 2026

Political News: ठाकरेंच्या शिवसेनेत मोठे बदल होण्याची शक्यता; '2003' ची पुनरावृत्ती?

Shivsena UBT News: शिवसेना ठाकरे गटात मोठ्या संघटनात्मक बदलांची शक्यता असून, आदित्य ठाकरे यांची 'कार्याध्यक्ष' पदी नियुक्ती होण्याची चर्चा आहे.

Political News: ठाकरेंच्या शिवसेनेत मोठे बदल होण्याची शक्यता; '2003' ची पुनरावृत्ती?
Mumbai:

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये येत्या काळात मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची पक्षाच्या 'कार्याध्यक्ष' पदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. या निर्णयामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत एका नव्या पर्वाची सुरुवात होणार असल्याचे बोलले जात आहे.

जून महिन्यातील कार्यकारिणी बैठक ठरणार निर्णायक

पक्षाची महत्त्वपूर्ण कार्यकारिणी बैठक जून महिन्यात नियोजित आहे. या बैठकीत आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला जाण्याची शक्यता आहे. 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा केला जातो. याच मुहूर्तावर आदित्य ठाकरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा होऊ शकते.

(नक्की वाचा-  Nashik News: शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने सपासप वार, 'कायद्याच्या बालेकिल्ल्यात' तणावाचे वातावरण)

2003 सालच्या इतिहासाची पुनरावृत्ती 

आदित्य ठाकरे यांची ही संभाव्य नियुक्ती शिवसेनेच्या इतिहासातील एका जुन्या घटनेची आठवण करून देणारी आहे. 2003 मध्ये महाबळेश्वर येथील अधिवेशनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड केली होती. ज्या पद्धतीने बाळासाहेबांच्या हयातीत उद्धव ठाकरेंनी पक्षाची धुरा सांभाळली, त्याच धर्तीवर आता उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांना पक्षाचे महत्त्वाचे अधिकार बहाल करू शकतात. उद्धव ठाकरेंनी कार्याध्यक्ष झाल्यानंतर स्वतःची नवी फळी तयार केली होती. आता आदित्य ठाकरे देखील त्यांच्या सोयीनुसार आणि भविष्यातील आव्हानांनुसार आपली 'कोअर टीम' तयार करतील, असे समजते.

(नक्की वाचा-  Solapur News: टीव्ही आणि सोन्याच्या अंगठीची हाव, गरीबाच्या लेकीचा झळ, अन् 4 महिन्याच्या संसाराचा भयंकर शेवट)

पक्षाच्या कार्यकारिणीत बदल होणार?

गेल्या काही वर्षांत आदित्य ठाकरे यांनी स्वतःला एक अभ्यासू आणि सक्रिय नेता म्हणून सिद्ध केले आहे. पक्षाच्या कठीण काळात त्यांनी राज्यभर दौरे करून शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य फुंकले. आता कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्यास, पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर त्यांचे पूर्ण नियंत्रण असेल. 

केवळ आदित्य ठाकरेच नव्हे, तर पक्षाच्या कार्यकारिणीत अनेक तरुण चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. जुन्या आणि नव्या फळीचा मेळ घालून पुढची दिशा ठरवण्याची ठाकरेंची रणनीती असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Listen to the latest songs, only on JioSaavn.com