जाहिरात

VIDEO: मिरा-भाईंदरमधील रस्त्यावर 'झॉम्बी'? मुंबईसह परिसरात घबराट; काय आहे प्रकरण?

Mira-Bhayandar Viral Video: मिरा-भाईंदर परिसरात एका तरुणाचा 'झॉम्बी'प्रमाणे विचित्र हालचाली करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. हा तरुण 'झोंबी ड्रग्स'च्या प्रभावाखाली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

VIDEO: मिरा-भाईंदरमधील रस्त्यावर 'झॉम्बी'? मुंबईसह परिसरात घबराट; काय आहे प्रकरण?

रमेश शर्मी, मिरा भाईंदर

Zombie Drug: पाश्चात्य देशांमध्ये थैमान घालणाऱ्या आणि मानवी मेंदूवर घातक परिणाम करणाऱ्या 'झॉम्बी ड्रग्स' (Zombie Drug) चा आता मिरा-भाईंदर परिसरात शिरकाव झाल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. रात्रीच्या वेळी भररस्त्यात एका तरुणाने केलेल्या विचित्र आणि अनियंत्रित हालचालींचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मुंबईलगतच्या या शहरात घबराट पसरली आहे.

काय आहे नक्की प्रकार?

मिळालेल्या माहितीनुसार, मिरा-भाईंदरच्या एका मुख्य रस्त्यावर रात्री उशीरा एक तरुण अत्यंत विचित्र अवस्थेत आढळून आला. तो तरुण एखाद्या झॉम्बीप्रमाणे स्वतःवरचा ताबा गमावून, शरीराचे झटके देत आणि विचित्र आवाज काढत हालचाली करत होता. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी हा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. 

(नक्की वाचा- Political News: ठाकरेंच्या शिवसेनेत मोठे बदल होण्याची शक्यता; '2003' ची पुनरावृत्ती?)

हा तरुण कोणत्याही सामान्य नशेत नसून त्याने 'झॉम्बी ड्रग्स' (ज्याला 'झायलेझिन' किंवा 'ट्रँक' असेही म्हणतात) घेतले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

'झॉम्बी ड्रग्स' म्हणजे काय? 

हे ड्रग घेतल्यावर व्यक्ती शुद्ध हरपते, तासनतास एकाच जागी गोठल्यासारखी उभी राहते किंवा हिंसक हालचाली करते. यामुळे शरीरावर जखमा होतात आणि त्वचा कुजल्यासारखी दिसू लागते, म्हणून याला 'झोंबी ड्रग' म्हटले जाते. हे ड्रग थेट मेंदू आणि मज्जासंस्थेवर हल्ला करते, ज्यामुळे मृत्यूचा धोका सर्वाधिक असतो.

(नक्की वाचा-  Nashik News: शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने सपासप वार, 'कायद्याच्या बालेकिल्ल्यात' तणावाचे वातावरण)

पोलिसांकडून तपास सुरू

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस सतर्क झाले आहेत. संबंधित तरुण नक्की कोण आहे आणि त्याने कोणत्या अंमली पदार्थाचे सेवन केले होते, याचा शोध पोलीस घेत आहेत. अलीकडेच पोलिसांनी कोट्यवधींचे एमडी (MD) ड्रग्ज जप्त केले होते. आता हे नवीन प्रकारचे सिंथेटिक ड्रग कुठून आले, याचा तपास गुन्हे शाखेकडून केला जात आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com