
Petrol Diesel Price Today 22 October 2025: जर आज तुम्ही गाडी फुल्ल करण्याचा विचार करीत असाल तर पेट्रोल पंपांवर पोहोचण्यापूर्वी आपल्या शहराचा रेट नक्की पाहा. 22 ऑक्टोबर 2025 रोजी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे रेट जारी केले आहेत. दररोज सकाळी ६ वाजता देशभरात इंधनाचे रेट अपडेट होतात. याचा थेट परिणाम नागरिकांच्या खिशावर होतो. इंधन भरण्यापूर्वी तुमच्या शहरात पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol And Diesel Prices In India) लेटेस्ट रेट नक्की तपासा.
देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर
देशातील चार मोठ्या शहरांमध्ये आज कोणताही बदल झालेला नाही
शहर | पेट्रोल प्रति लीटर | डिझेल प्रति लीटर |
दिल्ली | ₹94.77 | ₹87.67 |
मुंबई | ₹103.50 | ₹90.03 |
कोलकाता | ₹105.41 | ₹91.02 |
चेन्नई | ₹100.91 | ₹92.49 |
देशातील इतर शहरांमध्ये इंधनाच्या किमतीत काही बदल पाहायला मिळू शकतो. जर तुम्ही दुसऱ्या शहरात जाणार असाल तर टाकी फुल्ल करण्यापूर्वी एकदा इंधनाचे रेट तपासून घ्या.
दररोज पेट्रोल आणि डिझेलचे रेट का बदलतात?
इंधनाच्या किमती केवळ तेल कंपन्या ठरवित नाही. यावर अनेक गोष्टींचा परिणाम पाहायला मिळतो.
उदा.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती
डॉक्टरच्या तुलनेत रुपयाचा भाव
केंद्र आणि राज्य सरकारांकडून लावलेला टॅक्स
रुपयांचं मूल्य कमकुवत असेल किंवा कच्चं तेल महाग असेल तर पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढतात.
आपल्या शहरातील रेट कसा तपासायचा?
आज डिजिटल युगात तेलाची किंमत जाणून घेणं अत्यंत सोपं आहे. तुम्ही SMS पाठवूनही पेट्रोल-डिझेलच्या लेटेस्ट किमती जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईल (IOC): RSP <स्पेस> <शहराचा कोड> टाइप करा आणि या 9224992249 क्रमाकांवर पाठवा.
भारत पेट्रोलियम (BPCL): RSP टाइप करुन 9223112222 या क्रमांकावर पाठवा
हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL): HPPRICE टाइप करुन 9222201122 या क्रमांकवर पाठला.
याशिवाय या कंपन्यांच्या अधिकृत वेबसाइट आणि मोबाइल अॅप्सच्या मदतीने तुम्ही अवघ्या काही सेकंदात रेट चेक करू शकता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world