PM Modi : काय आहे गुंतवणुकीसाठीची 50-50 आयडिया, पंतप्रधान मोदींनीही केला भाषणात उल्लेख

PM Modi At NDTV World Summit: जागतिक गुंतवणूक तज्ज्ञ मार्क मोबियस (Mark Mobius) यांचे भारतावर प्रेम असून त्यांनी भारताच्या प्रगतीबाबत प्रचंड आशावाद व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी त्यांच्या भाषणात मोबीयस यांचे कौतुक केले. जाणून घ्या कोण आहेत हे मार्क मोबीयस

जाहिरात
Read Time: 2 mins

पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Narendra Modi) यांनी सोमवारी म्हणजेच 21 ऑक्टोबर रोजी एनडीटीव्ही वर्ल्ड समिटचे(NDTV World Summit 2024)  उद्घाटन केले. जगभरातील गुंतवणूकदार भारताकडे आकर्षित होत असल्याचे त्यांनी म्हटले. आपल्या भाषणामध्ये त्यांनी मार्क मोबीयस (Mark Mobius) याचा विशेष उल्लेख केला. पंतप्रधानांनी मोबीयस यांच्या 50-50 संकल्पनेचे कौतुक केले. 

जागतिक गुंतवणूक तज्ज्ञ मार्क मोबियस (Mark Mobius) यांचे भारतावर प्रेम असून त्यांनी भारताच्या प्रगतीबाबत प्रचंड आशावाद व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांनी त्यांच्या भाषणात मोबीयस यांचे कौतुक केले. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पंतप्रधानांनी म्हटले की, मोबीयस हे भारताकडे आकर्षित होणाऱ्या गुंतवणुकीसंदर्भात प्रचंड आशावादी आहेत आणि याला फार महत्त्व आहे. मोबीयस यांनी जागतिक गुंतवणूकदारांना 50 टक्के गुंतवणूक भारतामध्ये करण्यास सांगितली आहे. ही एक मोठी बाब आहे.  

( नक्की वाचा : NDTV World Summit : 'तुम्ही इतकी धावपळ का करता?' PM मोदींनी दिलं अनेकांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर )

125 दिवसांत निर्देशांकात 6-7 टक्क्यांची वाढ

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले की, जागतिक फंडांना भारताच्या ताकदीचा फायदा उचलण्याची सुवर्णसंधी आहे. आमचे सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर आले असून या सरकारने 125 दिवस पूर्ण केले आहे. या 125 दिवसांत आलेला अनुभव सांगताना पंतप्रधानांनी सांगितले की भारत सगळ्या क्षेत्रांमध्ये काम करत असून अभूतपूर्व पद्धतीने मार्गक्रमण करत आहे. गेल्या 125 दिवसांत सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 6-7%ची वाढ झालेली आहे. 

नक्की वाचा : NDTV World Summit : भारताच्या प्रगतीचा जगाला फायदा, PM मोदींनी मांडलं नव्या भारताचं व्हिजन )

50-50 आयडिया काय आहे ?

मार्क मोबीयस यांनी जागतिक गुंतवणूकदारांना 3 वर्षांहून अधिक काळापर्यंत अमेरिका आमि भारतात 50-50 टक्के गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. वेळेसोबत परिस्थिती बदलेले आणि इतर देशही आकर्षक वाटू लागतील असे मोबीयस यांनी म्हटले. मोबीयस यांनी भारताबद्दल बोलताना म्हटले की भारतातील आर्थिक प्रगती ही अल्पकाळासाठी नसून ती दीर्घ काळासाठीची आहे आणि ती अनेक वर्ष सुरू राहील. यामुळे भारतात गुंतवणूक करणे गरजेचे आहे.