मुंबई आणि अहमदाबादमध्ये नुकताच ब्रिटीश रॉक बँड 'कोल्डप्ले' (Coldplay) चे खास कार्यक्रम झाले. या कार्यक्रमाच्या तिकीट खरेदीसाठी तरुणाईची झुंबड उडाली होती. देशभरातून भारतीय या दोन शहरात या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी आले होते. समाज माध्यमांवरही या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. 'कोल्ड प्ले'च्या प्रभावाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी देखील घेतली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (28 जानेवारी) ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये 'उत्कर्ष ओडिशा-मेक इन ओडिशा कॉन्क्लेव 2025' या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. त्यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी भारतामध्ये 'कॉन्सर्ट इकॉनॉमी' हे क्षेत्र वाढत असून त्यामध्ये बराच वाव असल्याचं सांगितलं. भारताला संगीत, न्यूत्यामधून एखादी कथा सांगण्याची मोठी परंपरा असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
इव्हेंट आणि कॉन्स्टर्सच्या प्रमाणात वाढ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले की, 'गेल्या 10 वर्षांमध्ये देशात इव्हेंट आणि कॉन्सर्टचं प्रमाण वाढलं आहे. तुम्ही मुंबई आणि अहमदाबादमध्ये झालेल्या कोल्डप्ले कार्यक्रमाची अद्भुत फोटो पाहिले असतील. भारतामध्ये लाईव्ह कॉन्सर्टची प्रचंड क्षमता आहे. जगभरातील दिग्गज कलाकर इथं उपस्थित आहे. ते भारताकडं आकर्षित होत आहेत. मला आशा आहे की राज्य सरकार तसंच खासगी क्षेत्र यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि कौशल्याच्या विकासावर लक्ष देतील.'
#WATCH | Bhubaneswar | At Utkarsh Odisha – Make in Odisha Conclave 2025, PM Narendra Modi says, "You must have seen fabulous pictures of Coldplay concert organised in Mumbai and Ahmedabad. It shows that India has a massive scope for live concerts. Big artists from around the… pic.twitter.com/Gw9UMZ8EV2
— ANI (@ANI) January 28, 2025
लाईव्ह कार्यक्रमाचे फायदे सांगताना पंतप्रधानांनी सांगितलं की, 'कॉन्सर्ट इकोनॉमीमुळे पर्यटन क्षेत्राला चालना मिळते. तसंच रोजगार निर्मिती मिळते. राज्य तसंच खासगी क्षेत्रांनी पायाभूत सुविधा आणि कॉन्सर्ट इकॉनॉमी संबंधीच्या कौशल्याचा विकास करण्यावर भर द्यावा असं मी आवाहन करतो. इव्हेंट मॅनेजमेंट, आर्टिस्ट ग्रुमिंग, सुरक्षा आणि अन्य व्यवस्थांना वाव आहे.'
( नक्की वाचा : 99 लाख वेटिंग, 10 लाख तिकीट! काय आहे Coldplay ज्यासाठी भारतीय फॅन्स करतायत पाण्यासारखा पैसा खर्च )
कोल्डप्ले बँडनं 'Music of the Spheres' या कार्यक्रमाच्या अंतर्गत भारताचा दौरा केला. त्यामध्ये त्यांनी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये तीन कार्यक्रम घेतले. 18, 19 आणि 21 जानेवारी रोजी हे कार्यक्रम झाले. तर दुसऱ्या टप्प्यातील कार्यक्रम अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. 25 आणि 26 जानेवारी रोजी अहमदाबादमध्ये कोल्डप्लेचा शो झाला. या पाचही कार्यक्रमांना तुडूंब प्रतिसाद मिळाला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world