PM Modi Speech : केरळच्या तिरुवनंतपुरम येथील विळिंगम बंदराच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधी पक्षावर निशाणा साधला. विळिंगम बंदराच्या उद्घाटनप्रसंगी काँग्रेस खासदार शशी थरुर देखील उपस्थित होते. "अनेकांची आता झोप उडणार आहे", असं शशी थरुर यांचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
विळिंगम बंदराच्या उद्घाटनानंतर एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना उद्देशून म्हटलं की, "मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की, तुम्ही INDIA आघाडीचे एक मजबूत आधारस्तंभ आहात. शशी थरूर देखील इथेच बसले आहेत. त्यामुळे आजचा कार्यक्रम अनेकांची झोप उडवणारा आहे."
(NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण हिंदीतून मल्याळममध्ये भाषांतर अचून नव्हते. तरीदेखील मेसेज जिथे पोहोचायला हवा होता तिथे पोहोचला आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले."
तिरुअनंतपुरमचे चार वेळा काँग्रेस खासदार राहिलेले शशी थरूर यांनी अलीकडेच 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदी केलेल्या वक्तव्याचं कौतुक केलं होतं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या पंतप्रधान मोदींच्या राजनैतिक कृतींबद्दल थरूर यांच्यावर त्यांच्या पक्षातील सहकाऱ्यांनीही टीका केली होती.
(नक्की वाचा- Vizhinjam Port : विळिंजम बंदराचं PM मोदींच्या हस्ते उद्घाटन, देशासाठी कसं ठरेल गेमचेंजर?)
शशी थरुर यांचं ट्वीट
गुरुवारी रात्री शशी थरुर यांनी विमानतळावर स्वागत करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. "दिल्ली विमानतळावर उशीर झाल्यानंतकरही, मी माझा मतदारसंघ असलेल्या तिरुवनंतपुरम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्यासाठी विमातळावर वेळेत पोहोचलो."
(नक्की वाचा- MHADA Offer : म्हाडाची 'बुक माय होम' भन्नाट ऑफर, नागरिकांना आवडेल ते घर खरेदीची संधी)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन, काँग्रेस खासदार शशी थरूर, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी, केंद्रीय मंत्री सुरेश गोपी आणि केरळ भाजप प्रमुख राजीव चंद्रशेखर यांच्या उपस्थितीत विळिंजम बंदराचे उद्घाटन केले.