जाहिरात

PM Modi : 'पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या जन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते...'; संसदेत भाजप खासदाराच्या दाव्याने खळबळ

ओडिसाचे भाजप खासदाराच्या दाव्यात देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

PM Modi : 'पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या जन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते...'; संसदेत भाजप खासदाराच्या दाव्याने खळबळ

Pradeep Purohit : ओडिसाचे भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांनी संसदेत असं काही वक्तव्य केलं ज्यावर वाद उफाळला आहे. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या जन्मात छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन लोकसभेत गोंधळ पाहायला मिळाला. सोशल मीडियावरही वापरकर्त्यांनी खासदारांची शाळाच घेतली. अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान दिलेल्या या वक्तव्यानंतर विरोधी पक्षाकडून भाजपवर टीका केली जात आहे. भाजपकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसावर राजकारण केलं जात असल्याचं म्हटलं जातं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बारगडचे खासदार प्रदीप पुरोहितच्या वक्तव्यावरुन देशभरात संताप...
प्रदीप पुरोहित हे ओडिसाच्या बारगडचे भाजप खासदार आहेत. सध्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू आहे. यामध्ये भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांनी लोकसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या गेल्या जन्मी मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज असल्याचा दावा केला आहे. या वक्तव्यानंतर संसदेत गोंधळ उडाला. सोशल मीडियावरही यावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. 

Nagpur Violence : नागपूर दंगल रोखता आली असती का? पोलिसांचं नेमकं काय चुकलं?

नक्की वाचा - Nagpur Violence : नागपूर दंगल रोखता आली असती का? पोलिसांचं नेमकं काय चुकलं?

पुरोहित नेमकं काय म्हणाले? 
पुरोहित यांनी संसदेत एका संताच्या भेटीचा उल्लेख केला. ते म्हणाले की, एका संताने त्यांना सांगितलं की, नरेंद्र मोदी गेल्या जन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते. मी ज्या भागातून येतो तेथे एक गंधमर्दन डोंगराळ भाग आहे. तेथे गिरीजा नावाचे बाबा राहतात. एकेदिवशी आमच्यात बोलणं सुरू होतं, त्यावेळी ते म्हणाले...देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या जन्मात छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यामुळे आज ते भारताला जगातील सर्वात शक्तिशाली देश बनविण्यासाठी काम करीत आहे. 
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com